|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||
पिंपरी चिंचवड : नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कलरीपायट्टू स्पर्धेत पिंपरी चिंचवड कलरीपायट्टू असोसिएशनच्या खेळाडूंनी भव्य कामगिरी करत एकूण 11 पदके पटकावली. विशेष म्हणजे या यशामुळे सर्व 11 खेळाडूंची केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय कलरीपायट्टू स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

विजेत्या खेळाडूंमध्ये खालीलप्रमाणे कामगिरी झाली:
1. वर्तिका पाटील – 1 सुवर्ण, 1 कांस्य
2. श्रेया दंडे – 1 रौप्य
3. प्रिया सैनी – 1 कांस्य
4. निक्षिता पाटील – 2 कांस्य
5. तनिष्का ठोंबरे – 1 कांस्य
6. स्नेहल मर्दाने – 1 सुवर्ण, 1 कांस्य
7. वैदेही नवले – 1 रौप्य
8. ओमराजे जाधव – 1 कांस्य
9. सोहम मर्दाने – 1 रौप्य, 1 कांस्य
10. राज वायकोळे – 1 कांस्य
11. शिवदत्त सिंग – 1 कांस्य

संघाचे नेतृत्व पिंपरी चिंचवड कलरीपायट्टू संघटनेचे अध्यक्ष किरण अडागळे यांनी केले. विजेत्या संघाचे जिल्हा संघटनेचे पदाधिकारी संजय बनसोडे, रविराज चखाले, केतन नवले, स्मिता धिवार आणि गणेश चखाले यांनी अभिनंदन केले. यावेळी स्मिता धिवार यांनी महिला कोच म्हणून संघाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
या अभिमानास्पद यशामुळे संघाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
