Author: shauryavartanews2025@gmail.com

|| प्रतिनिधी : आशुतोष कातवरे || मावळ : तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्यालयासमोर किरकोळ वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना समोर आली आहे. आर्यन शंकर बेडेकर (वय-१९, रा. सिद्धार्थनगर, तळेगाव स्टेशन) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि.३१) दुपारी तळेगाव येथील सरस्वती विद्यालयासमोर घडली. मयत आर्यन बेडेकर याच्यावर त्याच्याच ओळखीचे शिवराज कोळी, संतोष कोळी, आशिष लोखंडे आणि पोळ्या लोखंडे यांनी हल्ला केला. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे तळेगाव परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन आणि संशयित यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून संशयितांनी आर्यनवर कोयता व धारदार शस्त्राने वार…

Read More

|| प्रतिनिधी :ज्योतिराम कांबळे || पंढरपूर  : भगवान विष्णुच्या कृष्ण अवतारानंतर ते पंढरीतील चंद्रभागेच्या तीरावर भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठ्ठलाच्या रुपात विराजमान झाले. ते रुसलेल्या रूक्मिणी मातेच्या शोधार्थ पंढरीत आले होते. तत्पूर्वी गायी गोपाळांसह गोपाळपुरानजीकच्या चंद्रभागेच्या पात्रातील विष्णुपद येथे त्यांनी विश्रांती घेतली व याठिकाणी गोपाळांसह गोपाळकाला केल्याची आख्यायिका आहे. यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात फिरताना त्यांना भक्त पुंडलिक दिसले आणि नंतर ते कर कटावर ठेवून विटेवर उभे राहिले. अठ्ठावीस युगांपासून पांडुरंग याठिकाणी उभे आहेत. याचे वर्णन विठ्ठलाच्या आरतीमध्ये सुध्दा आहे. यावेळी श्रीकृष्णाने अर्थात पा़डुरंगाने आपल्या सोबत आणलेल्या गायींचा वंश म्हणजेच गोवंश आजही चंद्रभागेच्या वाळवंटात आढळून येतो. अशा दीड दोनशे गायी गुरांचा वावर…

Read More

|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे || पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील कोथरुड परिसरात कोयता गँगने पालघन कोयत्याने एका तरुणावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की थोड्याच वेळात तरुणाचा मृत्यू झाला. हल्ला करणारे सर्व आरोपी अल्पवयीन असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव राहुल जाधव आहे. कोथरुड परिसरात दुचाकीवरुन जात असताना त्याच्यावर अल्पवयीन तरुणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केला. त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. त्यांनतर आरोपींची टोळी सागर कॉलनीतील गल्लीमध्ये आरडाओरड करत कोयते नाचवत पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे आरोपींच्या पैकी…

Read More

|| प्रतिनिधी : आशुतोष कातवरे || वडगाव मावळ – तळेगाव दाभाडे शहरात शुक्रवारी (दि. ३१) एका तरूणाचा खून करण्यात आला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आर्यन बेडेकर (वय १९, रा. सिद्धार्थ नगर, तळेगाव दाभाडे) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव स्टेशन भागात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करीत आर्यनची हत्या केली आणि घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास सुरू आहे.

Read More

भिगवण : भिगवण पोलिसांनी उजनीच्या पात्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना अखेर दिलासा दिला. कारण मच्छीमारांच्या बोटीची इंजिन गेल्या अनेक महिन्यांपासून चोरीला जात होती. एका शेतकऱ्याने वैतागून बोटीच्या इंजिनलाच जीपीएस लावला आणि गेल्या अनेक महिन्यांपासून बिनधास्तपणे चोरी करणारे चोर सापडले. आता ज्यांनी चोरी केली व पोलिसांना सापडले, त्यांच्याकडून भिगवण पोलिसांनी चार इंजिन आणि आठ लाख तीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. उजनीच्या पात्रात मच्छीमारांच्या बोटीची इंजिन चोरणारे दत्तू हिरामण घटे व रमेश हिरामण गव्हाणे (दोघेही रा. वरखडे ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली, तेव्हा त्यांच्याकडून भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंजिन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले…

Read More

बुलढाणा : मागील अकरा दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील दाभाडी दरोड्याच्या तपासाचा धक्कादायक निष्कर्ष निघालाय! हा दरोडा बायकोच्या विश्वासावरील दरोडा, नातेसंबधावरील दरोडा निघाला आहे. अनैतिक संबंधापायी डॉक्टर असलेल्या नराधम पतीने अगोदर पत्नीची हत्या केली, नंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घरात दरोड्याचा ‘देखावा’ तयार केला आणि स्वतःही गुंगीच्या गोळ्या घेत जखमी झाल्याचं सोंग वठविले. मात्र गुन्हेगार अट्टल असला तरी काहीनाकाही चुका करतो, मग या कथित दरोड्यातील आरोपी तर साधा पशु वैदकीय चिकित्सक, तो खाकीची काय फसवणूक करणार? चाणाक्ष आणि अनुभवी पोलिसांनी ही बाब ओळखली. यापूर्वी डॉक्टरच्या मोबाईलमधील नको ते क्लीपिंग, व्हिडीओमधून सर्व प्रकार उघडकीस आला होता. काल बुधवारी रात्री उशिरा बोराखेडी पोलिसांनी आरोपी डॉ.…

Read More

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे पंढरपूरच्या माढ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माढा तालुक्यातील आढेगाव या गावात १४ वर्षीय मुलाने रिव्हॉल्व्हरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. मृत मुलाचे वडील सशस्त्र सीमा बलामध्ये कामाला आहेत. वडिलांचे रिव्हॉल्व्हर चालवून मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव श्रीधर गणेश नष्टे असे आहे. त्याचे वडील गणेश सदाशिव नष्टे हे सशस्त्र सीमा बल राजस्थान सेंटर येथे इंस्टेस्टर म्हणून कार्यरत आहेत. गणेश नष्टे, त्यांची पत्नी सारिका, दोन मुलं (श्रीधर आणि श्रेयस) हे आढेगावमध्ये वास्तव्याला आहेत. ही घटना टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र सीमा बलात…

Read More

प्रतिनिधी : आशुतोष कातावरे पुण्यातील भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या घाटात शंभर फूट खोल दरीत कार कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात शुभम शिर्के (22) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर यामध्ये अन्य 8 जण जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कसा आणि कधी झाला याविषयीची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, आज पहाटे 4:00 वाजताच्या सुमारास उंबर्डे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. महाड होऊन भोरच्या दिशेने भरधाव वेगात येणारी कार अनियंत्रित होऊन 100 फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये शुभम शिर्के या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर…

Read More

जामखेड : देशातील सर्वात मोठे मानवी रचनेतील ‘२६ जानेवारी’ नाव अहिल्यानगर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये प्रजासत्ताक दिनी साकार झाले आहे. भव्य मानवी रचनेतील ‘२६ जानेवारी ‘ नाव कलाशिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी हे सरकारले. या मानवी चित्राची लांबी २२० व रुंदी १९० फूट असून क्षेत्रफळ ४१८०० स्क्वेअर फुट आहे. या मानवी रचनेतील चित्रात भव्य २२५ फूट तिरंगा विद्यार्थ्यांनी हातात धरून फडकवला आहे. श्री नागेश व कन्या विद्यालय मधील २३०० विद्यार्थी विद्यार्थिनी व १७ महा बटालियन एनसीसीचे नागेश विद्यालयाचे एनसीसी कॅडेट, नागेश व कन्या विद्यालय सर्व शिक्षक सहभागी आहेत. १७ महाराष्ट्र बटालियन…

Read More

पुणे ( प्रतिनिधी : क्षितिजा देव ) पुण्यात टोळक्यांची दहशत सुरु असतानाच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी एकाला मारहाण केल्याचे समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर आता या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हे खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. माजी नगरसेवक असलेले बाबुराव चांदेरे यांची कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत असतात. शनिवारी एका वादावरुन बाबुराव चांदेरे यांनी विजय रौंदळ नावाच्या व्यक्तीला मारहाण…

Read More