Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»मारहाण केल्याप्रकरणी बाबुराव चांदेरेंवर गुन्हा दाखल ! काय म्हणाले अजित पवार ? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
पुणे

मारहाण केल्याप्रकरणी बाबुराव चांदेरेंवर गुन्हा दाखल ! काय म्हणाले अजित पवार ? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJanuary 26, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे ( प्रतिनिधी : क्षितिजा देव )

पुण्यात टोळक्यांची दहशत सुरु असतानाच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी एकाला मारहाण केल्याचे समोर आलं आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर आता या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हे खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे.

माजी नगरसेवक असलेले बाबुराव चांदेरे यांची कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत असतात. शनिवारी एका वादावरुन बाबुराव चांदेरे यांनी विजय रौंदळ नावाच्या व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बाबुराव चांदेरे यांनी त्या व्यक्तीला चापट मारत उचलून जमिनीवर आदळले. त्यानंतर ही व्यक्ती जखमी झाली आणि तिला डोक्याला व गुडघ्याला दुखावत झाली. यावेळी चांदेरे यांनी व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या व्यक्तीला देखील दमदाटी केली. त्यानंतर आता या प्रकरणात बाबुराव चांदेरे यांच्या विरुद्ध रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या सगळ्या प्रकारावरुन अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे.

https://shauryavartanews.in/wp-content/uploads/2025/01/VID_20250126204856.mp4

काय म्हणाले अजित पवार?

“मी ती छोटी व्हिडिओ क्लिप पाहिली. हे अतिशय चुकीचं आहे. कोणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही. तो अधिकार आपण कोणालाही दिलेला नाही. त्यामुळे मी त्याला सकाळी फोन केला होता. पण त्याने फोन डायव्हर्ट केला होता. त्याच्या मुलाशी मी बोललो. मुलगा म्हणाला की ते घरी नाहीत. मी त्याला म्हटलं की हे जे काही मी क्लिपमध्ये बघितलं ते मला अजिबात आवडले नाही. अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी केलेले मी खपवून पण घेणार नाही. मला त्याला बोलवून जाब विचारायचा आहे की याच्या पाठीमागचं कारण काय. समोरच्याने तक्रार दिली तर कारवाई होईल. ज्याला कोणाला लागलं आहे त्यांनी पण तक्रार दिली पाहिजे. तक्रार केल्यानंतर कारवाई होणारच,” असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, यापूर्वीही चांदेरे हे अनेकदा वादात अडकले आहेत. दोन वर्षापूर्वी बाबुराव चांदेरे यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण करीत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. त्यानंतर गेल्याच वर्षी बाबुराव चांदेरे यांनी पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलात आयोजित कब्बडी स्पर्धेत पंचावर हात उगारला होता. पंचांनी दिलेला निर्णय न पटल्याने बाबुराव चांदेरे संतप्त झाले आणि त्यांनी पंचाना शिवीगाळ करत हात उगारला होता. यापूर्वी त्यांच्या मुलावर अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleइंजिनिअर व्हायचं स्वप्न अपूर्ण राहिलं ! दोन्ही तरुणीचे मृतदेह अक्षरश: फावड्याने गोळा करावे लागले.
Next Article “26 जानेवारी” रयतच्या नागेश विद्यालयमध्ये साकारले देशातील सर्वात मोठे मानवी रचनेतील नाव.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

नवले पुलावर चिमुरडीसाठी न्यायाची हाक; रास्तारोकोदरम्यान पोलिस-आंदोलकांमध्ये तणाव, कॉलर पकडल्याचा आरोप.

May 3, 2026

80 हजारांची लाच घेताना लोहगाव पोलीस ठाण्यात PSI रंगेहात पकडला; ACB ची धडाकेबाज कारवाई.

May 2, 2026

पुणे जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; बार्टीमार्फत जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद.

April 17, 2026

पुण्यातील वॉटरपार्कमध्ये भीषण अपघात; स्लाइडवरून पडल्याने महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी.
सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह; शिरूर पोलिसांकडून वॉटरपार्क प्रशासनावर गुन्हा दाखल

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?