|| प्रतिनिधी : आशुतोष कातवरे ||
वडगाव मावळ – तळेगाव दाभाडे शहरात शुक्रवारी (दि. ३१) एका तरूणाचा खून करण्यात आला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आर्यन बेडेकर (वय १९, रा. सिद्धार्थ नगर, तळेगाव दाभाडे) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव स्टेशन भागात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करीत आर्यनची हत्या केली आणि घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास सुरू आहे.
