Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीला डॉक्टर पतीने संपवले; दरोड्याचा रचला डाव, पण.
गुन्हेगारी

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीला डॉक्टर पतीने संपवले; दरोड्याचा रचला डाव, पण.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJanuary 30, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

बुलढाणा : मागील अकरा दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील दाभाडी दरोड्याच्या तपासाचा धक्कादायक निष्कर्ष निघालाय! हा दरोडा बायकोच्या विश्वासावरील दरोडा, नातेसंबधावरील दरोडा निघाला आहे. अनैतिक संबंधापायी डॉक्टर असलेल्या नराधम पतीने अगोदर पत्नीची हत्या केली, नंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घरात दरोड्याचा ‘देखावा’ तयार केला आणि स्वतःही गुंगीच्या गोळ्या घेत जखमी झाल्याचं सोंग वठविले.


मात्र गुन्हेगार अट्टल असला तरी काहीनाकाही चुका करतो, मग या कथित दरोड्यातील आरोपी तर साधा पशु वैदकीय चिकित्सक, तो खाकीची काय फसवणूक करणार? चाणाक्ष आणि अनुभवी पोलिसांनी ही बाब ओळखली.

यापूर्वी डॉक्टरच्या मोबाईलमधील नको ते क्लीपिंग, व्हिडीओमधून सर्व प्रकार उघडकीस आला होता. काल बुधवारी रात्री उशिरा बोराखेडी पोलिसांनी आरोपी डॉ. गजानन टेकाडे (४५) याला ठाण्यात आणले. त्याला पोलिसी हिसका दाखविताच डॉक्टर पोपटासारखा बोलायला लागला. गजानन याने आपणच बायको (माधुरी टेकाडे) हिची अगोदर भरपूर झोपेच्या गोळ्या औषधीतून पाजून नंतर तिची उशीने नाक तोंड दाबून हत्या केल्याचे या पांढरपेक्षा आरोपीने कबूल केले. पत्नीच्या जवळच्या नातेवाईक असलेल्या युवतीसोबत अनेक वर्षांपासून असलेल्या अनैतिक संबंधातून आपण हे कृत्य केल्याचे टेकाडे याने सांगितले. यानंतर त्याने बोराखेडी पोलिसांना आपण केलेल्या खऱ्याखुऱ्या हत्येची आणि बनावट दरोड्याची हकीकत तपशीलवार पणे सांगितली. प्रकरणी आरोपी विरुद्ध हत्या करण्याच्या कारणसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मोताळा तालुक्यात नव्याने खळबळ उडाली. बोराखेडी पोलिसांनी आरोपी डॉक्टर गजानन टेकाडे याला अटक केली आहे.

दाभाडी प्रकरण म्हणजे दरोडा असल्याचा बनाव करण्याचा आरोपी डॉक्टरने आटोकाट प्रयत्न केला. एवढेच काय जळगाव खान्देश येथे उपचार घेताना शुद्धीवर आल्यावरसुद्धा त्याने पोलिसांना जबाब देण्यास टाळाटाळ केली. मात्र आरोपीच्या नकारमागील कारण, बोराखेडी पोलिसांनी अचूक हेरले. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने हा दरोडा नव्हे तर ‘अगदी वेगळा प्रकार आहे’ हे ओळखले. यामुळे दरोड्याच्या संथ तपासावरून होणाऱ्या टीकेकडेदेखील दुर्लक्ष केले. तसेच शांत चित्ताने आणि संयम ठेवत तपास पूर्ण केला. यापरिणामी ‘कानून के हाथ बहुत लंबे होते है’ हे नव्याने सिद्ध झाले आहे.

काल बुधवारी रुग्णालयातून सुट्टी होताच रात्री बोराखेडी पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेत बोरखेडी पोलीस ठाण्यात आणले. त्याला ‘बाजीराव दाखविताच’ टेकाडे याने भडाभडा आपल्या पापाचा घडा वाचला. २९ जानेवारीला डॉ. गजानन टेकाडे याचे घरात दरोडा पडल्याचे वरकरणी दिसून आले. मात्र ते सुनियोजित हत्याकांड असल्याचे सिद्ध झाले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचौदा वर्षाच्या मुलाची आत्महत्या, वडिलांच्या रिव्हॉल्व्हरने स्वत:च्या डोक्यात घातली गोळी
Next Article उजनीच्या पात्रात बोटीची अनेक इंजिने चोरीला गेली..एका शेतकऱ्यानं मग जीपीएसच लावलं..
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

लोहगडावर अपघात नव्हे तर खून; भावी पत्नीने मित्राच्या मदतीने दरीत ढकलून केला खून.

June 23, 2026

साने चौकात कोयता गँगचा धुमाकूळ; तरुणावर जीवघेणा हल्ला, परिसरात दहशत.

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?