- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: shauryavartanews2025@gmail.com
|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे || सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले पुणे येथील पाच पर्यटक बुडाले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तिघेजण बचावले आहे, त्यांची प्रकृती गंभीर आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील शुभम सोनवणे आणि रोहित कोळी यांचा मृत्यू झाला. वीकेंडच्या निमित्ताने कोकणात पुन्हा एकदा पर्यटकांनी गर्दी केली आहे. पर्यटकांचा सर्वाधिक कल हा तारकर्ली देवबाग या भागात पाहायला मिळतो. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी सुद्धा पर्यटन मोठी गर्दी होत आहे. याच ठिकाणी पुणे येथील पर्यटक आले होते. ते आंघोळीसाठी समुद्रात जात होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना खबरदारी घेत जाण्याचा सल्ला दिला. परंतु…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : मनसे महायुतीसोबत येणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर आता आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. महायुतीमध्ये आम्हाला आताच काही मिळत नाही, राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर आम्हाला अजूनच काही मिळणार नाही, त्यामुळे मनसेने महायुतीमध्ये येऊ नये असं आठवले यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले आठवले ? महायुतीत आम्हाला आताच काही मिळत नाही, राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर आम्हाला अजूनच काही मिळणार नाही, त्यामुळे महायुतीत मनसेने येऊ नये असं आठवले यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मनसे महायुती येईल अशी चर्चा सध्या सुरु…
|| प्रतिनिधी : क्षितिजा देव || पिंपरी चिंचवड : सिलंबम स्पोर्ट्स फेडेरेशन च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच सिलंबम खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले, आंतरराष्ट्रीय सिलंबम महासंघाचे प्रशिक्षक मा. रवींद्रन, मा. प्रकाश, मा. सुचिता हे तीन प्रशिक्षक मलेशिया देशातून आपल्या पिंपरी चिंचवड येथे सिलंबम खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी आले होते, सदर प्रशिक्षण मिनाताई ठाकरे क्रीडा संकुल, यमुनानगर निगडी येथे झाले, या प्रशिक्षणाला पिंपरी चिंचवड मधील, सिलंबम खेळाडू, सिलंबम प्रशिक्षक, यांनी सहभाग नोंदवला, प्रशिक्षणामध्ये काठीची लढाई, काठी फिरविणे, तलवार फिरविणे, माडू फिरविणे अशा प्रकार चे प्रशिक्षण देण्यात आले, यावेळी सिलंबम स्पोर्ट्स फेडेरेशन चे अध्यक्ष मा. संजय बनसोडे यांनी मान्यवरांचे स्वागत…
|| प्रतिनिधी : अरविंद भोंगळे || पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय पुणे (Pune) दौऱ्यावर असून आज सायंकाळी ते पुण्यात पोहोचले. यावेळी, केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे त्यांच्या स्वागताला विमानतळावर पोहोचले होते. आज आणि उद्या असा दोन दिवसीय अमित शहा यांचा पुणे दौरा असून आज कोरेगाव पार्क येथील वेस्टिन हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. उद्या सकाळी 11 वाजता अमित शहांच्या उपस्थितीत पश्चिम गृह विभागाची बैठक होणार आहे. तसेच हडपसर येथील विठ्ठल तुपे सभागृहात दुपारी तीन वाजता जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला देखील सहकारमंत्री म्हणून अमित शहा (Amit shah) उपस्थित राहणार आहेत. गृहमंत्र्यांच्या…
|| प्रतिनिधी : जुबेर शेख || पुणे : अठ्ठ्यानवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून नवी दिल्ली येथे सुरू असून या संमेलनाच्या अध्यक्षा आहेत डॉ. तारा भवाळकर. संमेलनाच्या उदघाटन सत्राला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यावर जेव्हा ते बसण्यासाठी आपल्या आसनाकडे गेले, तेव्हा पंतप्रधान नरेंद मोदी आदराने उभे राहिले आणि त्यांनी लगबगीने पवारांसाठी खुर्ची सरकावली, तसेच त्यांच्या समोरील ग्लासात पाणीही ओतून दिले. पंतप्रधानांच्या या कृतीमुळे सभागृहात उपस्थितांनी टाळ्यांचा एकच गजर केला. साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीत सुरूवात होत असून त्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. अभिजात भाषेचा…
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || रावेत : पिंपरी चिंचवडमध्ये एका ८० वर्षाच्या महिलेने नदीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन महिलेचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला आहे. या महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात ही घटना घडली आहे. या महिलेने पवना नदीवरील लंडन ब्रिजवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. नदीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पवना नदीमध्ये उडी मारुन स्वत:चा जीव संपवणाऱ्या या ८० वर्षाच्या महिलेची ओळख पटवण्याचे काम रावेत पोलीस करत…
|| प्रतिनिधी : जुबेर शेख || वाकड : ताथवडे येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात एका वर्गमित्राकडून वारंवार होणाऱ्या मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून तिने जीवन संपविल्याचे समोर आले आहे. सहिती कलुगोटाला रेड्डी (वय २०, रा. अक्षरा इलेमेंटा सोसायटी, ताथवडे) असे तिचे नाव आहे. ती आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. याप्रकरणी सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी (वय ५४) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव राजेंद्र डोंगरे (वय २०, रा. मयूर समृद्धी, आकुर्डी गावठाण) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस…
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी चिंचवड : चिंचवडमधील दळवीनगर येथील लोहमार्ग उड्डाणपुलावर रात्री उशिरा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या मोटारीने समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे, या दुर्घटनेत एक दुचाकी पुलावरून खाली कोसळली. चिंचवडवरून खंडोबा माळ चौकाकडे जाणाऱ्या सोमेश्वर श्रीधर काळे यांच्या दुचाकीला भरधाव मोटारीने जोरात धडक दिली. या अपघातात काळे आणि त्यांचे मित्र अक्षय सुरेश बाटे हे गंभीर जखमी झाले. मात्र, अपघात एवढ्यावरच थांबला नाही. धडकेनंतरही मोटार चालकाने गाडी न थांबवता पुढे जाऊन राजेंद्र वराडे, शुभदा वराडे, चैतन्य पुराणिक आणि पद्मजा पुराणिक यांच्या…
||प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : चिखली-कुदळवाडीमध्ये महानगरपालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमध्ये विस्थापित झालेल्या भंगार व्यापाऱ्यांनी आता महापालिका हद्दीलगत असलेल्या गावांकडे धाव घेतली. मात्र, सभोवतालच्या ग्रांमपंचायतींनी भंगार व्यावसायिकांना जागा न देण्याबाबत ठराव केले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांसमोर व्यावसाय पुनर्वसनाचे आव्हान आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थापन, इंद्रायणी नदी प्रदूषण, विकास आराखड्यातील रस्ते आणि आरक्षणांमध्ये अतिक्रमण केलेल्या मालमत्ता धारकांना सुरूवातीला महापालिका प्रशासनाने अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या. अतिक्रमण कारवाई सुरू झाल्यानंतर त्याला स्थानिक व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन विरोध केला. त्यानंतर न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या होत्या. मात्र, न्यायालयाने कायदा-सुव्यवस्था निर्माण होणार असेल, तर अशा अनधिकृत बांधकामांवर सरसकट…
सध्या बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाची मोठी चर्चा आहे. काल १४ फेब्रुवारी रोजी हा बहुप्रतिष्ठित चित्रपट प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित या चित्रपटाची सिनेरसिकांसह शिवप्रेमींना उत्सुकता होती. चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सलग दुसऱ्या दिवशीही छावाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. फिल्मीबिट डॉटकॉमने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटाने शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) ३१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शनिवार म्हणजेच आज संध्याकाळपर्यंत चित्रपटाने ५० कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. बॉक्स ऑफिसवर छावाची विजयी आणि विक्रमी घोडदौड सुरु आहे. रविवारपर्यंत हा सिनेमा १०० कोटींचा पल्ला गाठेल असा अंदाज वर्तवला जात आहे. सॅकनिल्कचा अहवालच्या अहवालानुसार,…