Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » चिंचवडमध्ये भरधाव मोटारीची तीन दुचाकींना धडक ! सहा जण जखमी , एकाची प्रकृती गंभीर
पिंपरी चिंचवड

चिंचवडमध्ये भरधाव मोटारीची तीन दुचाकींना धडक ! सहा जण जखमी , एकाची प्रकृती गंभीर

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comFebruary 16, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||

पिंपरी चिंचवड : चिंचवडमधील दळवीनगर येथील लोहमार्ग उड्डाणपुलावर रात्री उशिरा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या मोटारीने समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे, या दुर्घटनेत एक दुचाकी पुलावरून खाली कोसळली.

चिंचवडवरून खंडोबा माळ चौकाकडे जाणाऱ्या सोमेश्वर श्रीधर काळे यांच्या दुचाकीला भरधाव मोटारीने जोरात धडक दिली. या अपघातात काळे आणि त्यांचे मित्र अक्षय सुरेश बाटे हे गंभीर जखमी झाले. मात्र, अपघात एवढ्यावरच थांबला नाही. धडकेनंतरही मोटार चालकाने गाडी न थांबवता पुढे जाऊन राजेंद्र वराडे, शुभदा वराडे, चैतन्य पुराणिक आणि पद्मजा पुराणिक यांच्या दुचाकींनाही धडक दिली. यामुळे वराडे आणि पुराणिक दांपत्य जखमी झाले.

या अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की एका दुचाकीवरील स्वारांचा तोल सुटून ती थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळली. सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही, मात्र सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले

अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले आणि जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मोटार चालक समर्थ कुलकर्णी याला ताब्यात घेतले. अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.

मद्यपान करून वाहन चालवण्याचा संशय

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी चालक समर्थ कुलकर्णी याने मद्यप्राशन करून वाहन चालवले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय चाचणीसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. निगडी पोलिस ठाण्यात सोमेश्वर काळे यांनी फिर्याद दिली असून, या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकुदळवाडीतील भंगार व्यावसायिकांना सभोवतालच्या गावांत ”नो एन्ट्री”
Next Article वाकड मधील धक्कादायक घटना ! वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने संपविले जीवन.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

साने चौकात कोयता गँगचा धुमाकूळ; तरुणावर जीवघेणा हल्ला, परिसरात दहशत.

June 22, 2026

कार रस्त्यात थांबवल्याच्या कारणावरून पोलीस भरती प्रशिक्षकास मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा.

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?