सध्या बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाची मोठी चर्चा आहे. काल १४ फेब्रुवारी रोजी हा बहुप्रतिष्ठित चित्रपट प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित या चित्रपटाची सिनेरसिकांसह शिवप्रेमींना उत्सुकता होती.

चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सलग दुसऱ्या दिवशीही छावाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली.
फिल्मीबिट डॉटकॉमने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटाने शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) ३१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शनिवार म्हणजेच आज संध्याकाळपर्यंत चित्रपटाने ५० कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. बॉक्स ऑफिसवर छावाची विजयी आणि विक्रमी घोडदौड सुरु आहे. रविवारपर्यंत हा सिनेमा १०० कोटींचा पल्ला गाठेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

सॅकनिल्कचा अहवालच्या अहवालानुसार, छावा चित्रपटाच्या संध्याकाळच्या शोमध्ये ५२.५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुपारी ही टक्केवारी ४७.०६ टक्के होती असे म्हटले जात आहे. एकंदर, पहिल्या दिवसाच्या तुलनेमध्ये दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत छावाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ४०.५१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे म्हटले जात आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनीत छावा चित्रपटाची चर्चा सुरु आहे. रसिकांसह समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर हा ऐतिहासिक चित्रपट आधारलेला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. लवकरच छावा १०० कोटी कलेक्शन करेल असे म्हटले जात आहे.
