Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»प्रत्येकवेळी सरकार म्हणतं, ‘पीडितांच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभे…’; इंद्रायणी पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंनी महायुतीच्या सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले
पुणे

प्रत्येकवेळी सरकार म्हणतं, ‘पीडितांच्या पाठी आम्ही खंबीरपणे उभे…’; इंद्रायणी पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंनी महायुतीच्या सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 16, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मावळ तालुक्यात कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील (Indrayani River) पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेले होते. यापैकी चार पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. रविवारी रात्री उशीरापर्यंत एनडीआरएफकडून (NDRF Team) बचावकार्य सुरु होते. सध्या याठिकाणी बचावकार्य थांबवण्यात आले असून ड्रोनद्वारे नदीत आणखी कोणी नागरिक अडकला आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारच्या दुर्घटना घडल्यानंतर सरकार एकाच छापाच्या प्रतिक्रिया देते. मात्र, त्यापूर्वी सरकार काय करते, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं?

काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत. नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.

हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला ? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, ‘बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे…’ पण मुळात हा प्रसंग का येतो ? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही ? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत ? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग ?

पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं.

आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपुण्यात डेमू ट्रेनच्या डब्यात लागली आग, प्रचंड धूर अन् प्रवाशांची पळापळ.
Next Article चिंचवडे नगरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग – शेजारील दुकाने, गोडाऊन आणि इमारती धोक्यात; शेखर अण्णा चिंचवडे यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

नवले पुलावर चिमुरडीसाठी न्यायाची हाक; रास्तारोकोदरम्यान पोलिस-आंदोलकांमध्ये तणाव, कॉलर पकडल्याचा आरोप.

May 3, 2026

80 हजारांची लाच घेताना लोहगाव पोलीस ठाण्यात PSI रंगेहात पकडला; ACB ची धडाकेबाज कारवाई.

May 2, 2026

पुणे जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; बार्टीमार्फत जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद.

April 17, 2026

पुण्यातील वॉटरपार्कमध्ये भीषण अपघात; स्लाइडवरून पडल्याने महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी.
सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह; शिरूर पोलिसांकडून वॉटरपार्क प्रशासनावर गुन्हा दाखल

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?