Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
गुन्हेगारी

वैष्णवीने बाळ होणार आहे सांगितल्यावर शशांकने घेतला चारित्र्यावर संशय, म्हणाला, हे मूल माझं नाही

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comMay 21, 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_131072
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) यांनी 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली यावरुन अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

वैष्णवीने सहा महिन्यांपूर्वी सासरच्यांकडून आपला हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ केल्याची तक्रार बावधन पोलीस ठाण्यात दिली होती. आपल्याला नवरा शशांक हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे यांच्याकडून मारहाण होत असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर आता वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे हे फरार झाले आहेत. तर शशांक हगवणे याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी दाखल करुन घेतलेल्या एफआयआरमधून आणखी सविस्तर माहिती समोर आली आहे. शशांक हगवणे हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी हिने ऑगस्ट 2023 मध्ये गरोदर असल्याचा बातमी पती शशांक याला सांगितली. तेव्हा शशांकने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला. हे बाळ माझे नाही दुसऱ्या कोणाचे तरी असेल असे म्हणून पती शशांक व सासरच्या लोकांनी तिच्यासोबत भांडण करुन तिला मारहाण केली होती. शशांक याने वैष्णवी हीस जबरदस्तीने शिवीगाळ व मारहाण करुन माझ्या घरातून चालती हो, नाहीतर मी तुला हाकलून देईन, असे म्हणत घरातून बाहेर काढले. त्यानंतर वैष्णवी ही माहेरी आल्यानंतर तिने तिच्यासोबत होत असलेल्या छळवणुक व हुड्यासाठी पैशाची मागणी याबाबतची माहिती तिच्या आईवडीलांना दिली होती. त्याचबरोबर सासरच्या कुटुंबियांकडुन मानसिक त्रास सहन न झाल्याने दि. 27 नोव्हेंबर 2023 रोजी वैष्णवीने जाचाला कंटाळून औषध (रेंट पॉईझन) जेवणातून खावून स्वःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

51 तोळं सोनं, चांदीची भांडी अन् फॉर्च्युनर कार ,

वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी दुपारी साडे-चारच्या सुमारास बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला होता. राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली. एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करुन दिलं, अशी माहिती एफआयरमधून समोर आली आहे.

लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली होती. ती दिली नाहीत म्हणुन त्याचा राग मनात धरुन सून वैष्णवीस घालूनपाडून बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेत सासू लता, नणंद करीश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दिर सुशील हगवणे यांनी शारीरीक व मानसिक त्रास देणं सुरु केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

वैष्णवी हागवणेंच्या आत्महत्येनंतर या प्रकरणातील दोन आरोपी फरार आहे. सासरे राजेंद्र हागवणे, दीर सुशील हागवणे फरार आहेत. वैष्णवीची सासू, नणंद आणि पती शशांक यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने आज (21 मे) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अटक आरोपींची कसून चौकशी करीत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘मला आधी आईचे दागिने द्या,’ मुलाने आपल्याच आईचा अंत्यविधी रोखला, नंतर थेट चितेवरच झोपला,
Next Article पावसाचे ढग धडकी भरवणार, समुद्रात अक्राळविक्राळ लाटा उसळणार; पुढील 48 तासांसाठी राज्यात अतिदक्षतेचा इशारा
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक

June 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?