Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
कोकण

पावसाचे ढग धडकी भरवणार, समुद्रात अक्राळविक्राळ लाटा उसळणार; पुढील 48 तासांसाठी राज्यात अतिदक्षतेचा इशारा

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comMay 21, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागांवर पावसाचं सावट पाहायला मिळालं. तर, काही भागांमध्ये मंगळवारी सायंकाळपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली. वादळी पावसानं मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला झोडपलं.

दरम्यान पावसाचं हे सावट अद्याप निवळलं नसून, हवामान विभागाकडून पुन्हा एकदा राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढचे तीन ते चार दिवस राज्यातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र भागाला ऑरेंज अलर्ट देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर, राज्याच्या उर्वरित भागांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रकिनारी भागांमध्ये नारिकांना अतिदक्षतेचा इशारा देत सावधगिरी म्हणून खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना मासेमारांना करण्यात आल्या आहेत. पुढील 48 तासांमध्ये किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा वारा वाहणार असून, वाऱ्याता सरासरी वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असून, समुद्रही खवळणार असल्यानं उसळणाऱ्या लाटा धडकी भरवू शकतात.

कोकणात रेड अलर्ट…

राज्यातील कोकण किनारपट्टी भागासाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केल्यानं इथं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रामुख्यानं तळकोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम- मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूरातील घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. फक्त कोकणच नव्हे, तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पुढच्या 48 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या जिल्ह्यांसाठी पावसाचा अतिदक्षतेचा इशारा देत हवामान विभागानं नागरिकांना सावध केलं आहे. तूर्तास करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार राज्यात 22 मेपर्यंत पावसाळी वातावरण कायम राहणार आहे. त्यानंतर मात्र हा पूर्वमोसमी पाऊस कमी होणार असून, तापमानात चढ- उतार पाहायला मिळतील.

फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात सध्या पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत असून अरबी समुद्र किनारी क्षेत्रासह बंगालच्या उपगरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यानं पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. वाऱ्यांचा हा वेग वादळी स्थिती निर्माण करण्यात कारणीभूत ठरत आहे हे प्राथमिक निरीक्षणही हवामान विभागानं वर्तवलं आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवैष्णवीने बाळ होणार आहे सांगितल्यावर शशांकने घेतला चारित्र्यावर संशय, म्हणाला, हे मूल माझं नाही
Next Article निरा डावा कालवा फुटला, घरांसह शेतात घुसलं पाणी; बारामती परिसरात सतर्कतेचा इशारा.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

रायगड हादरलं, सख्खा भावांनी मिळून केला जन्मदात्या आई-वडिलांचा खून, धक्कादायक कारण समोर.

November 4, 2025

भावाच्या घरी जायला निघाली, वाटेत बसची जोरदार धडक, मामाचा मृत्यू, माय-लेक जखमी, रायगडमध्ये भीषण अपघात

June 3, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?