Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

‘मला आधी आईचे दागिने द्या,’ मुलाने आपल्याच आईचा अंत्यविधी रोखला, नंतर थेट चितेवरच झोपला,

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comMay 16, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आई म्हणजे सर्वस्व असते. जगात आल्यापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत आई आपल्यासोबत असते. आईचं महत्त्वं काय हे ज्याच्या डोक्यावर मायेचं छत्र नसतं त्याच्याहून चांगलं कोणी सांगू शकणार नाही मुलांसाठी आई आपलं सर्वस्व पणाला लावते. पण जेव्हा तीच आई या जगातून जाते आणि मुलं तिच्या दागिन्यांसाठी भांडतात तेव्हा तिच्या आत्म्याला होणाऱ्या वेदना किती असह्य असतील याचा कोणी विचारही करु शकत नाही. राजस्थानात अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये कलयुगातील मुलाने दागिन्यांसाठी थेट आईचा अंत्यविधीच रोखला.

राजस्थानच्या कटपुतली-बेहरोर जिल्ह्यात एका मुलाने आईच्या चांदीच्या बांगड्या मिळाव्यात यासाठी अंत्यविधी रोखल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुरी देवी यांचं 3 मे रोजी निधन झालं होतं. त्यांना सात मुलं आहेत. सहा मुलं गावात एकत्र राहत असून, एक मुलगा ओमप्रकाश वेगळा राहतो. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ओमप्रकाश आणि त्याच्या सहा भावांमध्ये संपत्तीवर वाद सुरु आहे. भुरी देवी यांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब आणि गावकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले.

अंत्यविधीआधी गावकऱ्यांनी भुरी देवी यांच्या अंगावरी दागिने काढले आणि मोठा मुलगा गिरधारीच्या हातात सोपवले. यामध्ये चांदीच्या बांगड्याही होत्या. यामुळे ओमप्रकाशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. यामुळे ओमप्रकाशनेही पार्थिवाला खांदा दिला. पण जेव्हा मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानात पोहोचला तेव्हा एकच गोंधळ सुरु झाला. गावकरी चितेसाठी लाकडं रचच असताना ओमप्रकाशने आईच्या बांगड्या आणि इतर दागिने आपल्याकडे सोपवले जावेत अशी मागणी सुरु केली. ही आरडाओरड करत असताना तो इतका हट्टाला पेटला की, थेट चितेवर जाऊनही झोपला. गावकरी सांगत असतानाही तो मात्र माघार घेत नव्हता. यादरम्यान त्याच्यात आणि भावांमध्ये जोरदार वाद सुरु झाला.

जवळपास दोन तास ओमप्रकाश गोंधळ घालत होता. गावकरी, नातेवाईक विनंती करत असतानाही तो काहीच ऐकत नव्हता. अखेर आईचे दागिने आणून स्मशानातच त्याच्याकडे सोपवण्यात आले.

दागिने मिळाल्यावर ओमप्रकाश चितेवरुन हटला आणि अंत्यविधी करण्याचा मार्ग मोकळा केला. मात्र या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी आमि संताप आहे. अंत्यविधी करत असताना या पवित्र कामात कौटुंबिक वाद आणणं योग्य नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. भुरी देवी यांच्या पतीचं दोन वर्षांपूर्वीच निधन झालं. ओमप्रकाश सात भावांमध्ये पाचव्या क्रमांकाचा होता. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसाताऱ्यात अवकाळी पावसाचा कहर, वीज पडून गाय ठार, नारळानेही घेतला पेट
Next Article वैष्णवीने बाळ होणार आहे सांगितल्यावर शशांकने घेतला चारित्र्यावर संशय, म्हणाला, हे मूल माझं नाही
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

🥇 ताडीवाला रोडच्या चंद्रिकाचे सुवर्णपंख! आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक.

November 7, 2025

केदारनाथमध्ये पहाटे काळाचा घाला, हेलिकॉप्टर क्रैश, ७ जणांचा मृत्यू

June 15, 2025

विदर्भ खैरे कुणबी समाजाच्या वतीने प्रशांत वाघरे यांना “समाजभूषण पुरस्काराने” सन्मानित..

May 11, 2025

गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीन विद्यार्थी वैनगंगा नदीपात्रात बुडाले..

May 11, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?