Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचा शपथविधी.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJanuary 31, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला असून सुनेत्रा अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपालांच्या उपस्थितीत त्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. या ऐतिहासिक क्षणाने राज्याच्या राजकारणात महिलांच्या नेतृत्वाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.

शपथविधीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार म्हणाल्या की, हा क्षण अत्यंत भावनिक असून मोठी जबाबदारी स्वीकारताना आदरणीय अजितदादांची आठवण सतत सोबत आहे. त्यांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक तसेच समाजातील वंचित घटकांसाठी दिलेला संघर्ष, कर्तव्यनिष्ठा आणि लोकाभिमुखतेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजितदादांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचे सावट असले, तरी त्यांच्या विचारांची ऊर्जा आपल्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा हेच आपले सर्वात मोठे बळ असल्याचे नमूद करत, शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध राहील, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असे सांगत जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे, शासन-प्रशासन अधिक संवेदनशील व लोकाभिमुख बनवणे आणि महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, हाच आपला संकल्प असल्याचे सुनेत्रा अजितदादा पवार यांनी यावेळी नमूद केले

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदादांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार; मोदी-शाह उपस्थित राहणार.
Next Article श्री रतिलाल विठ्ठल गोसालिया स्कूलमध्ये शेकोटी उत्सव रंगला आनंदात; शिक्षक, पालक आणि बालकांनी साजरी केली पारंपरिक सोहळा.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

संभाजीनगरमध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा; ५९ जातींची एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार.

August 13, 2026

ॲट्रॉसिटी खटल्यांसाठी राज्यात पाच अनन्य विशेष न्यायालये; शासनाचा निर्णय.

August 10, 2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त भटुंबरे येथे भव्य रक्तदान शिबिर.

August 7, 2026

पंढरपूरला स्वतंत्र पोलीस उपमुख्यालयासाठी अप्पर पोलीस अधीक्षक पदास मंजुरी; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.

July 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?