Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » तर स्वारगेट बलात्काराची घटना घडलीच नसती; जर पुणे पोलिसांनी 3 दिवसांपूर्वीच… धक्कादायक खुलासा..
गुन्हेगारी

तर स्वारगेट बलात्काराची घटना घडलीच नसती; जर पुणे पोलिसांनी 3 दिवसांपूर्वीच… धक्कादायक खुलासा..

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comFebruary 27, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

तर स्वारगेट बलात्काराची घटना घडलीच नसती; जर पुणे पोलिसांनी 3 दिवसांपूर्वीच…; धक्कादायक खुलासा..

|| प्रतिनिधी क्षितिजा देव ||

पुणे : 26 वर्षीय तरुणीवर बलात्काराच्या घटनेनंतर पुण्याचा स्वारगेट बस स्थानक हादरला. मंगळवारी म्हणजेच 25 फेब्रुवारीला पहाटे शिवशाही बसमध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर नराधम आरोपी फरार असून पोलिसांची 8 पथकं आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.

स्वारगेट आगाराच्या आवारात भंगार शिवशाही बसेस उभ्या आहेत. या बसेसमध्ये अनैतिक कामं सुरु असल्याचा आरोप होऊ लागलाय. या बसेसमध्ये कंडोम, साड्या, चादर, ब्लँकेट, अंतर्वस्त्र आणि दारुच्या बाटल्या आढळल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. दरम्यान 3 दिवस आधीच यासंदर्भात पुणे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. काय म्हटलं होतं या तक्रारीत? पोलिसांनी याकडे वेळीच लक्ष दिलं असतं तर घटना टाळता आली असती का? सविस्तर जाणून घेऊया.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभाग स्वारगेट आगाराकडून पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली होती. 22 फेब्रुवारी रोजी ही लेखी तक्रार पुणे पोलिसांत देण्यात आली होती. यामध्ये खासगी एजंट आणि तृतीयपंथी आगारामध्ये येऊन प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात, असे पहिले पत्र आहे. तर दुसऱ्या पत्रातून बस स्थानक परिसरात असलेल्या अवैध रिक्षा पार्किंगकडे लक्ष वेधण्यात आले होते.

स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातआरोपीच्या शोधात पुणे पोलिसांचे 13 पथके रवाना करण्यात आले आहेत. त्यात विशेष शाखेचे 6 पथके आहेत. तर तरुणीवर अत्याचार करण्यात आलेली बस तपासणीसाठी नेण्यात आली आहे. बसमधील पुरावे आणि हाताचे ठसे फॉरेन्सिक तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

काय म्हटलंय पत्रात ?

स्वारगेट स्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथे महाराष्ट्रभरातून प्रवासी येजा करत असतात. रोज 40 ते 45 हजार प्रवासी येथे येजा करत असतात. दरम्यान काही एजंट बस स्थानक परिसरामध्ये घुसतात आणि रांगेत असलेल्या प्रवाशांना ओढून घेऊन जातात. प्रवाशांना खासगी गाडीतून प्रवास करण्यासाठी उद्यूक्त करतात, असे एसटी आगाराने पुणे पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. यासंदर्भात याआधीदेखील सांगण्यात आलंय. पण कोणतीही कारवाई न झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली. तसेच एसटी आगारात तृतीयपंथींची वर्दळ आणि दमदाटी वाढली आहे. ते मद्यपान करुन गलिच्छ आणि घाणेरडे पेहराव करुन आगारात वावरत असतात. यांच्याकडून वृद्ध, महिला, लहान मुलांना नाहक त्रास दिला जातो, त्यांच्याकडून जबरदस्ती पैसे घेत नाहक लूट केली जाते, असेही तक्रारीत म्हटले होते.

दुसऱ्या तक्रारीत अवैध पार्किंगचा प्रश्न निदर्शनास आणला गेला. स्वारगेट बस आगारात रोज 1700 बस येजा करतात. पण स्वारगेट स्थानकाच्या आत येण्याच्या आणि बाहेर जाण्याच्या मार्गावर अवैधरित्या रिक्षा पार्किंग केली जाते. हे रिक्षा चालक प्रवाशांसोबत उद्धट आणि उर्मटपणे वागतात. त्यांच्यामुळे विनाकारण वाहतूक कोंडी होते. त्यामुळे आगारात आणि बाहेर अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना हे पत्र लिहिण्यात आले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगजा मारणे काही सुधरेना ! पोलिसांनी आता ‘पुण्याच्या मालका’चं कंबरडं मोडलं; 10 वर्षातली मोठी कारवाई
Next Article पुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेली.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

लोहगडावर अपघात नव्हे तर खून; भावी पत्नीने मित्राच्या मदतीने दरीत ढकलून केला खून.

June 23, 2026

साने चौकात कोयता गँगचा धुमाकूळ; तरुणावर जीवघेणा हल्ला, परिसरात दहशत.

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?