Author: shauryavartanews2025@gmail.com

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने अवैध दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २,००,४८० रुपयांची विनापरवाना विदेशी दारू जप्त केली आहे. या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखालील पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार दाभाडे सरकार चौक परिसरातील चऱ्होली येथील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध विदेशी दारू साठवून विक्री केली जात असल्याचे निष्पन्न…

Read More

पिंपरी-चिंचवड : वाल्हेकर वाडी, चिंचवडगाव रोड येथील रानमळा हॉटेल समोर बळवंत कॉलनी परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज वितरण ट्रान्सफॉर्मर (डीपी) ला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत डीपी पूर्णपणे जळून खाक झाली असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महावितरण (एमएसईबी) अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. तसेच, वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्याचे आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. दरम्यान, एमएसईबी कर्मचाऱ्यांबरोबर स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र,…

Read More

पिंपरी-चिंचवड : हिंजवडी परिसरात पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करणाऱ्या सोनसाखळी चोरट्यांचा पर्दाफाश करण्यात हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जप्त करण्यात आले आहे. दिनांक ७ मार्च रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला मॉर्निंग वॉकसाठी गेल्या असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने ओढून घेतले. यावेळी महिलेला ढकलून जखमी करण्यात आले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळ…

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कारभारात बाह्य कन्सल्टन्सी संस्थांमुळे वाढत चाललेल्या आर्थिक बोजाविरोधात नगरसेवक धर्मपाल बशवंतराव तंतरपाळे यांनी महापौर रविभाऊ लांडगे यांना ठोस निवेदन सादर केले आहे. मनपाच्या स्थापत्य विभागात सध्या सीईआयएल व पेव्हटेक कन्सल्टिंग इंजिनिअरिंग या दोन बाह्य संस्था कार्यरत असून, त्यांना मोठ्या प्रमाणात अधिकार देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे महानगरपालिकेच्या स्वतःच्या अभियंत्यांना डावलले जात असल्याची गंभीर बाबही त्यांनी मांडली आहे. निवेदनानुसार, साध्या रस्त्यांच्या कामांसाठीदेखील संबंधित बाह्य संस्थांची मंजुरी आवश्यक ठरत असल्याने कामकाजात अनावश्यक विलंब होत असून खर्चातही मोठी वाढ होत आहे. पूर्वी आयआरएस व एसजीएस या संस्थांकडून केवळ…

Read More

पुणे : राज्यातील गड-किल्ल्यांवर दरवर्षी हजारो शिवप्रेमी आणि पर्यटक भेट देत असतात. दुर्गम डोंगररांगा, कडे-कपारी आणि कठीण चढाईमुळे अनेकदा अपघातांच्या घटना घडतात. अशा वेळी जीव धोक्यात घालून अपघातग्रस्तांना सुरक्षितस्थळी पोहोचविणारे आपत्ती व्यवस्थापनातील स्वयंसेवक, मावळे आणि स्थानिक कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. या धाडसी कार्यकर्त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर स्मारक, सिंहगड रोड येथे आयोजित कार्यक्रमात गड-किल्ल्यांवरील आपत्कालीन बचाव कार्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या विविध संस्था व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये शिवदुर्ग रेस्क्यू टीम, शिवजन्मभूमी रेस्क्यू टीम (जुन्नर), हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम तसेच राजगड पुरातत्त्व विभागातील बापू साबळे, विशाल पिलावरे, दीपक पिलावरे, किल्ले विसापूर येथील रोहित…

Read More

महाबळेश्वर : आंबेनळी घाटातील बावली टोक येथे गुरुवारी (दि. १२) पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास एका वॅग्नर कारचा भीषण अपघात होऊन वाहन तब्बल ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमने धाडसी बचावकार्य करून सुटका केली. अपघाताची माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य संकेत सावंत व ऋषिकेश जाधव यांनी तातडीने टीमला कळवले. त्यानंतर अजित जाधव, अनिकेत वागदरे, संकेत सावंत व ऋषिकेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचाव पथकाने आवश्यक सुरक्षा साहित्य व रोपच्या सहाय्याने…

Read More

|| प्रतिनिधी : प्रभू कांगणे || चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रावेत बंधाऱ्यात सांडपाणी व मैला सोडण्याचा गंभीर प्रकार सुरू असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना उपशहर प्रमुख सागर एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे लेखी निवेदन देत तात्काळ संयुक्त पाहणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या रावेत बंधाऱ्याच्या परिसरात काही भागांतून बेकायदेशीर नाले जोडण्यात आले असून त्यामधून सांडपाणी थेट बंधाऱ्यात मिसळत आहे. परिणामी बंधाऱ्यातील पाणी दूषित होत असून याच पाण्यावर पुढील शुद्धीकरण प्रक्रिया करून शहरवासीयांना पुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत धोकादायक…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या वाल्हेकरवाडी परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत असून, उलट बांधकामे अधिक वेगाने सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रभाग क्रमांक १७ मध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर इमारती उभारल्या जात असून, त्यातील फ्लॅट विक्रीही सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या बांधकामांकडे संबंधित विभाग, बीट मार्शल व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे उघड दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. गोरगरीबांवर कारवाई, मोठ्यांना मोकळे रान सामान्य नागरिकांनी लहान शेड टाकले…

Read More

|| प्रतिनिधी : जुबेर शेख || पिंपरी-चिंचवड : 23 जानेवारी 2026 – सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसालिया इंग्लिश व मराठी मिडीयम स्कूलमध्ये आज पारंपरिक शेकोटीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेच्या प्रांगणात रंगलेला हा उत्सव केवळ बालकांसाठी नव्हे तर शिक्षक आणि पालकांसाठीही आनंदाचा सोहळा ठरला. शाळेतील लहान मुले शेकोटी व रानमेव्याचा आनंद घेण्यात गढून गेली. हुरड्याचा खेळ, पारंपरिक गाणी, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण सजीव केले. बालकांनी उत्साहाने शेकोटीच्या गाणी गायली, रंगीत पोशाखात नृत्य सादर केले आणि त्यांच्या आनंदाने उपस्थितांची मने भारावून गेली. पालकांनाही या कार्यक्रमात सक्रिय सहभागी म्हणून पाहता आले. त्यांनी आपल्या मुलांच्या उत्साहात सहभागी होऊन कार्यक्रमाला अधिक…

Read More

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला असून सुनेत्रा अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपालांच्या उपस्थितीत त्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. या ऐतिहासिक क्षणाने राज्याच्या राजकारणात महिलांच्या नेतृत्वाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे. शपथविधीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार म्हणाल्या की, हा क्षण अत्यंत भावनिक असून मोठी जबाबदारी स्वीकारताना आदरणीय अजितदादांची आठवण सतत सोबत आहे. त्यांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक तसेच समाजातील वंचित घटकांसाठी दिलेला संघर्ष, कर्तव्यनिष्ठा आणि लोकाभिमुखतेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून न्यायप्रिय, समताधिष्ठित…

Read More