- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: shauryavartanews2025@gmail.com
देहूरोड : मावळ तालुक्यातील देहूरोड परिसरात मंगळवारी रात्री धक्कादायक गोळीबाराची घटना घडली असून रमेश रेड्डी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी तब्बल नऊ राऊंड गोळीबार केला. यापैकी एक गोळी त्यांच्या डोक्यात लागल्याने ते गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले. त्यांना तातडीने देहूरोड येथील आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला. काही काळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर…
|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे || पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १७ मधील वाल्हेकरवाडी येथे आज दि. २३ एप्रिल २०२६ रोजी अंदाजे १,१६४ चौ. मीटर क्षेत्रफळाच्या अनधिकृत बांधकामावर मोठी निष्कासन कारवाई करण्यात आली. यापूर्वीही शहरातील विविध भागांत अनधिकृत बांधकामांवर अनेक कारवाया करण्यात आल्या असल्या, तरी प्रभाग १७ मधील ही आतापर्यंतची पहिली मोठी आणि महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. मा. आयुक्त श्री. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये आणि मा. अतिरिक्त आयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. ‘ब’ क्षेत्रीय अधिकारी श्री. राजाराम सरगर यांच्या अधिपत्याखाली झालेल्या या कारवाईत बीट निरीक्षक, एमएसएफ जवान, पोलीस…
पिंपरी-चिंचवड : गुन्हे शाखा युनिट ०१ ने पेट्रोलिंगदरम्यान शिताफीने कारवाई करत निगडी परिसरातून बेकायदा धारदार लोखंडी पालघनसारखे हत्यार बाळगणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १९ एप्रिल २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ०१ चे अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार विजय शेळकंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार राजनगर ओटास्किम, निगडी येथील महानगरपालिकेच्या सुलभ शौचालयाच्या पाठीमागे, स्पाईन रोडलगतच्या सर्व्हिस रोडवर एक तरुण संशयास्पदरीत्या धारदार हत्यारासह फिरत असल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून प्रणय बाबासाहेब बनकर (वय १९…
मुंबई : पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सन २०१७ मधील अत्यंत गंभीर आणि मन हेलावून टाकणाऱ्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सत्र न्यायालय, मुंबई (कोर्ट क्र. ५४) येथील सत्र न्यायाधीश महेश के. जाधव यांनी सेशन केस क्र. ७९/२०१८ मध्ये हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी नितीन कारभारी पठारे याने फिर्यादी अफसाना अमजद कुरेशी (वय ३४) व त्यांच्या मुलांना घरातच कैद करून ठेवत सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच किरकोळ कारणांवरून त्यांच्यावर वारंवार मारहाण केली जात होती. दिनांक २८ सप्टेंबर २०१७ रोजी फिर्यादीचा अवघ्या तीन वर्षांचा मुलगा आहील याच्या हातून कप फुटल्याच्या किरकोळ…
पिंपरी-चिंचवड : प्रेमसंबंधात अडसर ठरत असलेल्या प्रेयसीच्या अवघ्या ६ वर्षांच्या मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या करून फरार झालेल्या आरोपीला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अथक पाठलाग करून अखेर अटक केली आहे. या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा क्रमांक २७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), २३८, ६१(२) आणि ३(५) अंतर्गत ६ वर्षीय मुलाच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला बसरिन मेहबुब शेख (वय २७, रा. पुस, ता. अंबाजोगाई, जि. बीड) हिचे फरार आरोपी राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. दोघे मूळचे अंबाजोगाई येथील शेजारी असून…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || चिंचवड : चिंचवड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने वाहनचोरीच्या मालिकेचा यशस्वी छडा लावत एक विधिसंघर्षित बालक ताब्यात घेतला असून त्याच्याकडून चोरीच्या तब्बल ६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस आले असून परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक १३६/२०२६, कलम BNS ३०३(२) अंतर्गत तपास सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. या तपासातून संबंधित विधिसंघर्षित बालकाने सदर वाहन चोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. पुढील चौकशीदरम्यान संबंधित बालकाने एकूण ६ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.…
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 01 ने उल्लेखनीय कामगिरी करत वर्षभरापासून फरार असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या ताब्यातून धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून त्याच्यावर आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 01 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे तसेच पोहवा विजय शेळकंदे, पोशि खेडकर आणि पोशि चिखलकर हे पाहिजे, फरार व तडीपार आरोपींचा शोध घेत होते. बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने तपास सुरू केला. दरम्यान, निगडी येथील भक्ती-शक्ती पुलाखाली…
पुणे जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; बार्टीमार्फत जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद.
|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे || पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समतादूत प्रकल्पांतर्गत तसेच सहायक आयुक्त, समाजकल्याण पुणे यांच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ८ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहाचे उद्घाटन ८ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आले. सप्ताहभर पथनाट्य, प्रबोधनपर कार्यक्रम, विविध स्पर्धा तसेच शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये संत गाडगेबाबा महाराज आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
|| प्रतिनिधी : प्रभु कांगणे || पिंपरी-चिंचवड :शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने प्रभावी व धडाकेबाज कारवाई करत ३ आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून २ गावठी पिस्टल, २ जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल असा एकूण २ लाख २ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगर पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत काही संशयित इसम अवैध शस्त्रांसह फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तपास पथकाने तातडीने हालचाली करत एच.ए. ग्राउंड, संत तुकारामनगर येथे सापळा रचला. योग्य वेळी कारवाई करत दीपक भास्कर बर्फे (वय २६,…
|| प्रतिनिधी : छाया खंदारे || भोसरी : औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरात रोजगाराच्या शोधात येणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी अनेक युवक-युवती फसवणुकीचे बळी ठरत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. ही समस्या लक्षात घेऊन महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ भोसरी व चाकण येथे सुरू करण्यात आले आहे. भोसरी येथील संविधान चौकाजवळील फुगे प्रायमा येथे या केंद्राचे उद्घाटन गुरुवारी महापौर लांडगे यांच्या हस्ते झाले. या वेळी विविध मान्यवर आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाबाबत माहिती देताना महापौर लांडगे म्हणाले, की आर्थिक…