Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
पिंपरी चिंचवड

आरटीई प्रवेशासाठी ४० हजारांची लाच; शिवसेना पदाधिकारी माउली जगताप एसीबीच्या जाळ्यात, गुन्हा दाखल.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comMay 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||

पिंपरी-चिंचवड : शिक्षण हक्क कायदा ( RTE ) अंतर्गत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका व्यक्तीस रंगेहात पकडले. आकुर्डी येथील फकीरभाई पानसरे पिंपरी-चिंचवड उर्दू प्राथमिक शाळेत गुरुवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात ज्ञानेश्वर उर्फ माउली जगताप (रा. नंदनवन कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. माउली जगताप हे शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष असून, शिवसेना कामगार सेनेतही ते पदाधिकारी आहेत. तसेच ते पिंपरी-चिंचवड शहरातील माजी युवा सेना शहर प्रमुख म्हणूनही कार्यरत होते. सध्या ते एका खासदारांचे निकटवर्ती असल्याची माहिती पुढे येत आहे.

तक्रारदार (वय ३०) यांनी आपल्या मुलीच्या आरटीई प्रवेशासाठी १६ मार्च रोजी ऑनलाइन अर्ज केला होता. अर्जाची पडताळणी करण्यासाठी २७ एप्रिल रोजी ते संबंधित शाळेत गेले असता, त्यांचा अर्ज ‘रिजेक्ट’ झाल्याचे सांगण्यात आले. याचवेळी माउली जगताप यांनी संपर्क साधत प्रवेश निश्चित करून देण्याचे आमिष दाखवले आणि त्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आरोपीने शाळेच्या पहिल्या मजल्यावर लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

या कारवाईनंतर आरटीई प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आले असून, पालकांना मध्यस्थांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडले जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या प्रकरणातून आणखी मोठा गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक केली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदेहूरोडमध्ये धक्कादायक गोळीबार; रमेश रेड्डी यांची हत्या, परिसरात तणाव.
Next Article दक्षिण महाळुंगेतील थरारक गुन्हा; तीन वर्षीय बालकाची निर्घृण हत्या, अल्पवयीन आरोपी १२ तासांत जेरबंद.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळीकांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद.

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?