- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: shauryavartanews2025@gmail.com
फुगेवाडी : फुगेवाडी येथे विषारी दारू प्राशनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या १८ जणांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देत माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्या वतीने एक महिन्याच्या शिधा किटचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. या दुर्दैवी दुर्घटनेमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिधा वाटप कार्यक्रमात श्री. गुल्लू शेठ आसवानी, माजी नगरसेवक माऊली थोरात, विशाल वाळुंजकर, मंगेश घाडगे, महेंद्र बाविस्कर, भाजपा मंडलाध्यक्षा अनिता वाळुंजकर , श्री यशवंत भोसले , डॉक्टर वाबळे , यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या विषारी दारू दुर्घटनेचा मुख्य आरोपी मंगलसिंग वीरका असल्याचा आरोप करण्यात आला असून त्याच्या घरातून…
मोहोळ प्रतिनिधी | ज्योतीराम कांबळे मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अनुसूचित जातीतील विवाहित महिलेवरील गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणात अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चर्मकार महासंघाने थेट पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करून पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याची जोरदार मागणी केली आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 420/2026 अंतर्गत दाखल या प्रकरणात बीएनएस तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हे नोंद असूनही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे पीडित कुटुंब भयभीत असून समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की,…
प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी ही धडक कारवाई केली. शेगाव दुमला येथे एका टेम्पो गाडी, ट्रॅक्टर आणि वाळू उपसा करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री असा 11 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आंबे गावातून 125 ब्रास वाळूचा साठा, ज्याची किंमत 7 लाख 50 हजार रुपये, जप्त करण्यात आला. याशिवाय आंबेगाव येथे एका टिप्परमध्ये 5 ब्रास वाळूसह 28 लाख 30 हजार…
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षा रक्षकानेच तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, १० वर्षीय चिमुरडीने दाखवलेल्या धैर्य आणि प्रसंगावधानामुळे आरोपीचा घृणास्पद डाव फसला असून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ८ मे) दुपारच्या सुमारास सोसायटीमध्ये शांतता असताना आरोपी दिनेश चौधरी (वय २५) याने तीन अल्पवयीन मुलींना बोलावले. “टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो,” असे सांगून त्याने मुलींना इमारतीच्या सातव्या मजल्यावर नेले. तेथे आरोपीने मुलींशी अश्लील वर्तन करत त्यांच्यावर बळजबरी…
पिंपरी-चिंचवड : दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने धडाकेबाज कारवाई करत सराईत दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ३६ लाख रुपये किमतीच्या २४ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि अहिल्यानगर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांची उकल या कारवाईमुळे झाली आहे. महाळुंगे एमआयडीसी परिसरातील उद्योग व कंपन्यांमधील वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी विशेष उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून तातडीने तपास मोहीम राबविण्यात आली. १४ एप्रिल २०२६ रोजी पानसे ऑटो प्रा. लि. कंपनीसमोरील पार्किंगमधून एमएच…
|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे || पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध अग्निशस्त्रांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान देहुरोड परिसरातील व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबाराच्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट-१ ने मोठी कारवाई केली आहे. मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कारवाई तीव्र करण्यात आली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी व त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही यशस्वी कारवाई केली. तपासादरम्यान अज़हरुद्दीन रफिक सुतार, वैभव अशोक शेटे, सौरभ धनंजय जाधव, अक्षय अशोक कांबळे या आरोपींना अटक…
|| प्रतिनिधी : क्षितीजा देव || पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या संतापजनक घटनेनंतर जनतेचा रोष उफाळून आला आहे. आरोपीने गायीचे वासरू दाखवण्याचा बहाणा करून मुलीला गोठ्यात नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्यानंतर हत्या केल्याचे समोर आले. गुन्ह्यानंतर आरोपीने मृतदेह शेणात लपवून पळ काढला होता. संध्याकाळी मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. गावातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसल्याने प्रकरणाचा उलगडा झाला. या घटनेनंतर नसरापूरसह संपूर्ण भोर तालुक्यात संतापाची लाट उसळली. राज्य सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याच्या निषेधार्थ शनिवारी सायंकाळी मुलीच्या कुटुंबीयांनी मृतदेह घेऊन पुण्यातील नवले…
|| प्रतिनिधी : अरविंद भोंगाळे || पुणे : दि. 01 मे 2026 रोजी अँटी करप्शन ब्युरो (ACB), पुणे यांनी मोठी कारवाई करत लोहगाव पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षकाला 80 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक मनोज मधुकर बरुटे (वय 38) यांनी तक्रारदाराकडून सुरुवातीला 70,000 रुपयांची लाच मागितली होती. ही मागणी वाढवून पडताळणीदरम्यान 80,000 रुपये करण्यात आली. तक्रारदार हा जमीन व्यवहाराचा व्यवसाय करत असून त्याच्याविरुद्ध दाखल अदखलपात्र (N.C.) गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच भविष्यात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात ही लाच मागण्यात आली होती. तक्रारदाराने याबाबत 30 एप्रिल 2026 रोजी ACB, पुणे येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार पंचासमक्ष पडताळणी करण्यात…
|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे || पिंपरी-चिंचवड : दक्षिण महाळुंगे एमआयडीसी परिसरात तीन वर्षांच्या निष्पाप बालकावर अत्याचार करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद करत गुन्ह्याचा छडा लावला. मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी दुपारच्या सुमारास संबंधित बालक घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केल्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली असता, शेजारील एका खोलीत पिशवीत बालकाचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक तपासात बालकावर अत्याचार करून त्याची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे उघड झाले.…
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी-चिंचवड : शिक्षण हक्क कायदा ( RTE ) अंतर्गत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका व्यक्तीस रंगेहात पकडले. आकुर्डी येथील फकीरभाई पानसरे पिंपरी-चिंचवड उर्दू प्राथमिक शाळेत गुरुवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात ज्ञानेश्वर उर्फ माउली जगताप (रा. नंदनवन कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. माउली जगताप हे शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष असून, शिवसेना कामगार सेनेतही ते पदाधिकारी आहेत. तसेच ते पिंपरी-चिंचवड शहरातील माजी युवा सेना शहर प्रमुख म्हणूनही कार्यरत होते. सध्या ते एका खासदारांचे निकटवर्ती…