Author: shauryavartanews2025@gmail.com

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरामध्ये एका दगडखाणीत एका हात पाय आणि मुंडके कापून टाकलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. गोडाऊन चौक येथून काहीशा अंतरावर असलेल्या दगड खाणीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच दिघी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत व्यक्तीजवळ एक मोबाईल आढळून आल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे. सिताराम ढाले राहणार नांदगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव वय 42 वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती सध्या भोसरीतच राहात होती. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सिताराम प्रभू ढाले हा गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता.…

Read More

हिंगोली : हिंगोलीमध्ये शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरी कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघात ८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला. अपघातानंतर काही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली- नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव येथे ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील शेतकरी महिला मजूर या ट्रॅक्टरमधून प्रवास करत होत्या. सर्व महिला मजूर हळद काढण्यासाठी ट्रॅक्टरमधून जात होत्या त्यावेळी अचानक अपघात झाला. ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला असल्याचे सांगितले जात आहे.…

Read More

सातारा : कोयना बिनतारी संदेश यंत्रणा विभागात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मलकापुरात घडली. सत्वशीला सुहास पवार (वय-३७, रा. सातारा) असे मृत्यू झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांना चक्कर आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिक माहितीनुसार, कराड तालुक्यातील शहापूर माहेर व सातारा सासर असलेल्या सत्वशीला पवार या मागील वर्षीपासून कराड शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. सद्यःस्थितीत त्या कोयना बिनतारी संदेश यंत्रणा या विभागात प्रतिनियुक्तीवर कर्तव्य बजावत होत्या. यापूर्वी त्यांनी उपअधीक्षक कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कर्तव्य बजावले होते. त्या मलकापूरमध्ये वास्तव्यास होत्या.…

Read More

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. आमदार गोरखे यांचे पीए असलेले संतोष भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आमदार अमित गोरखे यांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. दिनानाथ रुग्णालयानं रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप देखील गोरखे यांनी केला आहे. आमदार गोरखे यांच्या आरोपांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. नेमका काय आहे अमित गोरेखे यांचा आरोप ? दिनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. ज्या महिलेचा मृत्यू…

Read More

बीड : सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात मोठा राडा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात अटकेत असलेले वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वाल्मीक कराड आणि संतोष घुले सकाळी साडेनऊच्या आसपास नाष्टा करायला बरेकमधून बाहेर पडले होते, यावेळी जुनी दुश्मनी उफाळून आली. गीत्ते गँगचा सदस्य महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्याकडून ही मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचे संकेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील दिले आहेत. वाल्मिकवरील हल्ल्यानंतर आता गीत्ते गँगचा म्होरक्या शशिकांत उर्फ बबन गीत्तेनं फेसबूक पोस्ट करत थेट जीवे मारण्याची धमकी…

Read More

नाशिक : अजून तुझं वय लहान आहे, मोठं झालं की लग्न लावून देतो, असं कुटुंबियांनी सांगून सुद्धा प्रेमात धोका मिळाला म्हणून एक १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. या प्रकरणी तिच्या १९ वर्षीय प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या शरणपूर रोडवर हा धक्कादायक प्रकार घडला. मृत मुलगी ही लहानपणापासून बेथेलगनगर परिसरात आपल्या मावशीकडे राहत होती. काही दिवसांपूर्वी या मुलीची ओळख वेदांत पाटील नावाच्या तरुणाशी झाली. आधी मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती मृत मुलीच्या मावशीला मिळाली. त्यानंतर मावशीने मुलीची समजूत काढली. तुझं लग्नाचं वय झालं की दोघांचं लग्न लावून…

Read More

जळगाव : जळगावमध्ये ट्रकचालकाकडून 50 रुपयांची लाच घेणं वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला चांगलंच महागात पडलंय. ट्रकचालकाला अडवत लाच घेणाऱ्या ट्रकचालकानं 50 रुपयाची नोट पुढं करताच आमची 50 रुपयाची इज्जत आहे का, किमान 100 तरी करा म्हणत हटून बसलेल्या वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओनंतर जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी 50 रुपयांची लाच घेणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासह त्याला साथ देणाऱ्या अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्याना निलंबीत केल्याची घटना घडल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. कुणी वाहतूक नियमांचं उल्लंघन करू नये यासाठी तैनात असलेल्या पोलिसानेच 50- 100 रुपयांसाठी नियम धाब्यावर बसवून आपला खिसा गरम करणं म्हणजे…

Read More

बीड : रविवारी मध्यरात्री अडीच वाजता बीडच्या अर्धामसला गावातील मशिदीत मोठा स्फोट घडला आहे. मध्यरात्री अशाप्रकारे स्फोट घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पण हा स्फोट घडल्यानंतर अवघ्या तीन ते चार तासांत पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे गावात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र पोलिसांच्या तत्परतेमागं एक सरपंच असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित सरपंचामुळेच पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावणं शक्य झालं. कारण ज्यावेळी हा स्फोट घडला, त्यावेळी अर्धमसला गावच्या माजी सरपंचांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांनी दिली. शिवाय त्यांनी पुढच्या २० मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. त्यांना गावातील…

Read More

प्रतिनिधी : रोहित चौधरी पिंपरी चिंचवड : शासनाचे कार्यक्रम जणू काही आपले खाजगी कार्यक्रमच असल्या प्रमाणेच शासकिय अधिकारी काम करत आहेत. सिलंबम खेळाच्या राष्ट्रीय संघटने वरील मुख्य व्यक्तीवर विनयभंगाचे गुन्हे दाखल असल्या कारणाने राष्ट्रीय संघटने वर बंदी घालण्यात आली असताना देखील पुणे जिल्हा क्रीडा विभागा कडून त्याच संघटनेशी संलग्न असलेल्या व्यक्ती मार्फत पुणे जिल्हा स्तरीय शालेय सिलंबम स्पर्धा घाई घाईत आयोजित करण्यात आल्या. विशेष म्हणजे दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ रोजी पुणे जिल्हा स्तरीय शालेय सिलंबम स्पर्धा आयोजनाचा लेखी प्रस्ताव दिला असून देखील विशिष्ट एका संघटनेला किंवा व्यक्तीला यामध्ये झुकत माप देऊन दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी* स्पर्धा घाई घाईत आटोपल्या…

Read More

नाशिक : पुर्ववैमन्यास आणि परिसरात वर्चस्व राहण्यासाठी पाच हल्लेखोरांनी दोन सख्ख्या भावांचा धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण करून निर्घृणपणे खून केल्याने रंगपंचमीला गालबोट लागला. ही घटना बुधवारी (दि.१९) रात्री 9.30 वाजेदरम्यान नाशिक-पुणे रोडवरील बोधले नगर परिसरात असलेल्या आंबेडकरवाडी परिसरात घडली. मृत उमेश जाधव हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा नाशिक शहर उपाध्यक्ष आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांची नावे निष्पन्न केली असून, पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. उमेश उर्फ मन्ना जाधव (वय ३२) व भाऊ प्रशांत जाधव (वय ३०) अशी मयत झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. सागर गरड (सर्व जण रा. आंबेडकर वाडी, नाशिक…

Read More