प्रतिनिधी : रोहित चौधरी
पिंपरी चिंचवड : शासनाचे कार्यक्रम जणू काही आपले खाजगी कार्यक्रमच असल्या प्रमाणेच शासकिय अधिकारी काम करत आहेत. सिलंबम खेळाच्या राष्ट्रीय संघटने वरील मुख्य व्यक्तीवर विनयभंगाचे गुन्हे दाखल असल्या कारणाने राष्ट्रीय संघटने वर बंदी घालण्यात आली असताना देखील पुणे जिल्हा क्रीडा विभागा कडून त्याच संघटनेशी संलग्न असलेल्या व्यक्ती मार्फत पुणे जिल्हा स्तरीय शालेय सिलंबम स्पर्धा घाई घाईत आयोजित करण्यात आल्या.

विशेष म्हणजे दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ रोजी पुणे जिल्हा स्तरीय शालेय सिलंबम स्पर्धा आयोजनाचा लेखी प्रस्ताव दिला असून देखील विशिष्ट एका संघटनेला किंवा व्यक्तीला यामध्ये झुकत माप देऊन दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी* स्पर्धा घाई घाईत आटोपल्या जातात. यावर हरकत म्हणुन दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी पत्र दिले. त्या बाबत माहिती विचारली असता आम्ही टपाल बघत नाही. टपाल मधील पत्रांना आम्ही गांभीर्याने घेत नाही, आम्ही त्याला बांधील नाही. असे देखील क्रीडा अधिकारी कासगवडे साहेब दर्डवून सांगतात.
इतर सिलंबम क्रीडा संघटनांचे प्रस्ताव घेतले जाते नाहित, प्रस्ताव द्यायला जाणाराला, “तूम्ही येऊ नका सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत” असे पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कासगवडे साहेब सांगतात. परंतु काही दिवसा नंतर तत्काळ कार्यालयात या आपल्याला विभागीय स्पर्धा घ्यायच्या आहेत असा फोन त्यांच्या कार्यालयामधून महेश चावरे करतात. पिंपरी चिंचवड मधील शालेय स्पर्धा झालेल्या नाहीत. *दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी लेखी प्रस्ताव दिला असून अद्याप पिंपरी चिंचवड मधील शालेय सिलंबम स्पर्धा आयोजनास परवानगी दिलेली नाही.* तरी विभागीय शालेय स्पर्धा घेण्याची घाई केली जाते. पिंपरी चिंचवड शालेय स्पर्धा आयोजना बाबत निवेदन दिले असता सगळ्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या म्हणुन परवानगी नाकारली जाते.

अचानक व्हॉट्स ॲप ग्रूप वर दिनांक १८ मार्च २०२५ रोजी विभागीय स्पर्धेचे पत्र टाकल जात आणि तत्काळ जिल्हा स्तरीय शालेय सिलंबम स्पर्धा उरकून घ्या जास्त कोणाला सांगू नका तुमचे तुमचे खेळाडू खेऊन रेकॉर्डला दाखवा असे महेश चावरे सांगतात.
कार्यालयात गेलं असता स्पर्धा रद्द जा तुम्ही अस सांगितलं जात. जणू काही एक प्रकारची थट्टाच लावली आशा पद्धतीने सर्व प्रकार चालू आहे.
इतर संघटना विभाग आणि राज्य स्तरीय शालेय सिलंबम स्पर्धेची मागणी करण्याचे पत्र देत असता, गरज नाही आता स्पर्धाच होणार नाही असे कसगवडे साहेब सांगतात.

तसेच चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये देखील विभागीय शालेय सिलंबम स्पर्धा घाई घाईत उरकण्यात आल्या. इतर जिल्ह्यातील जिल्हा स्तरीय स्पर्धा खेळलेल्या खेळाडूंना याची माहिती दिली गेली नाही त्यामुळे इतर जिल्ह्यातील खेळाडूंचे नुकसान झाले. त्यांना विभागीय शालेय सिलंबम स्पर्धेत सहभागी होता आले नाही. त्यामूळे चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड साहेब यांच्या कार्यपद्धती मध्ये देखील संभ्रम आहे.
वरील सर्व प्रकारावरून जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होत आहे. अशा मनमानी किंवा एकतर्फी तसेच तडकाफडकी निर्णयांमुळे क्रीडा शिक्षकांचा गोंधळ उडत आहे आणि वर्षानुवर्ष सराव करणाऱ्या खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे.

पिंपरी चिंचवड सिलंबम खेळाडूंचे क्रीडा अधिकाऱ्यांच्या गलथान कामामुळे नुकसान झाले आहे, परीक्षाकाळात जिल्हा स्थरीय स्पर्धा घ्यायला सांगितले पण पिंपरी चिंचवड सिलंबम संघटनेने डिसेंबर महिन्यात स्पर्धा आयोजनाबाबत निवेदन दिले होते, पण पुणे क्रीडा अधिकारी कसगावडे यांनी सिलंबम स्पर्धा रद्द झाल्या आहेत असं कारण सांगून जिल्हा स्पर्धा परवानगी नाकारली, पण दिनांक 18 मार्च रोजी महेश चौरे क्रीडा अधिकारी यांच्या कडून 22 तारखेच्या आत जिल्हा स्पर्धा घ्यायला सांगितले पण शाळांमध्ये मुलांच्या परीक्षा असल्याने व स्पर्धा आयोजन साठी फक्त 3 दिवसाचा अवधी दिल्याने सदर आयोजनात अडचणी येत आहेत, पिंपरी चिंचवड च्या स्पर्धा जर डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात परवानगी दिली असती तर सर्व मुलांना स्पर्धा खेळता आली असती पण परीक्षा काळात स्पर्धा घोषित केल्याने पिंपरी चिंचवड च्या सिलंबम खेळाडूंचे नुकसान झाले आहे, सदर विषयाबद्दल क्रीडा अधिकारी विलास चौरे यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांनी विभागीय स्पर्धा अहिल्यानगर क्रीडा विभागाने आयोजित केल्या आहेत त्यात आमचा हस्तक्षेप नाही असे कारण सांगून जबाबदारी काडून घेतली आहे, त्यामुळे पिंपरी चिंचवड सिलंबम संघटनेने सदर विषयाची तक्रार महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक कार्यालय बालेवाडी, क्रीडा आयुक्तांनकडे लेखी स्वरूपात केली आहे, या विषयामध्ये क्रीडा आयुक्तांनी लक्ष घालून संबंधीत अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी हि पिंपरी चिंचवड सिलंबम संघटनेची मागणी आहे, व सदर विभागीय स्पर्धा तत्काळ रद्द करावी हि मागणी आहे
