Author: shauryavartanews2025@gmail.com

|| प्रतिनिधी : क्षितिजा देव || पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये बुधवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली होती. या सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय अभियंता महिलेवर कुरियर बॉय असल्याचे सांगत सोसायटीमध्ये प्रवेश केलेल्या नराधमाने बलात्कार केला. आरोपीने महिलेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी फोटो काढून ‘मी परत येईन’, असा मेसेज केला होता. या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट येत असून 48 तासानंतर पोलिसांच्या 20 पथकाने आरोपी कुरियर बॉयचा शोध घेत मुसक्या आवळल्या आहेत. कोंढवा परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये आरोपीने सुरुवातीला आपण कुरियर बॉय असल्याचे सांगत सोसायटीमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर पीडित महिलेच्या फ्लॅटवर पोहोचल्यानंतर…

Read More

(प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे) पंढरपूर :  भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या दिशेने शिर्डीहून पायी निघालेला विश्वसंत सद्गुरू साईबाबा पालखी सोहळा आता पंढरपूरच्या अगदी जवळ येऊन ठेपला आहे. आपल्या सावळ्या विठ्ठलाला भेटण्यासाठी व मनातील श्रद्धा व भक्ती व्यक्त करण्यासाठी हजारो भाविक विंचू, वीस–पंचवीस दिवसांचा प्रदीर्घ पायी प्रवास करत या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. साईबाबा पालखी सोहळ्याचे हे सलग 19 वे वर्ष असून, श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशीकानंदजी महाराज परमहंस, संस्थापक अध्यक्ष साईबाबा पालखी सोहळा, शिर्डी यांच्या आशीर्वादाने हा भक्तीमय सोहळा मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने पुढे सरकत आहे. तन, मन, धनाची पर्वा न करता आपल्या विठ्ठलमाऊलीच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा…

Read More

पुणे :  नेपाळ येथून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या नेपाळी गुरखा म्हणजेच साथी चे बोधेगाव बालमटाकळी गावात गावकऱ्यांना रात्री चोरा पासून इतर येणाऱ्या संकटापासून सावध करण्यासाठी रात्रभर शिट्टी व काठी वाजवून गस्त घालणाऱ्या साथी (गुरखा) चे…. दि२४/६/२०२४ रोजी बोधेगाव व बालमटाकळी या गावातील काही बडेबाप की औलादीने नाहक किरकोळ कारणावरून ह्या गुरखा साथीवर जिवघेणा हल्ला केला नव्हे जिवे मारण्याचा प्रयत्न केला.. काही पुढाऱ्यांनी झालेला प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला व करत आहेत. परंतु माणुसकी नावाची गोष्ट जिंवत आहे की नाही.. त्यांना जरी वाटत असले प्रकरण दबले आहे सर्व शांत झाले आहे परंतु जगात न्याय नावाची गोष्ट जिंवत आहे. *कानुन के हात बडे…

Read More

चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या रेगडी गावात अजूनही कोणत्याही बँक शाखेचा अभाव असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेगडी हे गाव परिसरातील प्रमुख बाजारपेठ असून येथे शासकीय आश्रम शाळा, पोलिस स्टेशन आणि अनेक शासकीय तसेच खाजगी संस्था कार्यरत आहेत. विशेष म्हणजे रेगडी गावाच्या सेवाक्षेत्रात सुमारे तेरा ते चौदा गावे येतात. मागील तीन-चार वर्षांपूर्वी रेगडी येथे जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह बँक मंजूर करण्यात आली होती, मात्र अद्याप शाखेची प्रत्यक्ष स्थापना झालेली नाही. या बँक शाखेच्या अभावी शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना व्यवहारासाठी दूरच्या ठिकाणी जावे लागत असून वेळ व पैशाची नाहक खर्ची पडत…

Read More

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील आश्रमात 27 जून 2025 रोजी रात्री एका महिला किर्तनकाराची आश्रमात घुसून निघृणपणे हत्या करण्यात आली होती. ह.भ.प संगीताताई पवार असं महिला किर्तनकाराचं नाव होतं. याच हत्ये प्रकरणी आता पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या दोन नराधमांना आता पोलिसांनी अटक केली आहे. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला होता. ज्यानंतर पोलिसांना काही ठोस पुरावे गोळा करत आरोपीचा शोध सुरू केला होता. नेमके कसे सापडले आरोपी ? याच हत्येप्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग देत आज (2 जुलै) हत्येतील दोन आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपी…

Read More

तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बहिणीने यापूर्वी अनेकदा पंढरपूरची वारी केली आहे. मीही यंदा वारीत जाईन, असा हट्ट धरणाऱ्या एका वीसवर्षीय युवकाने संत तुकाराम महाराज पालखीत सहभागही घेतला. रोजच्या भजन-कीर्तनात उत्साहाने सहभाग घ्यायचा. रात्री उशिरापर्यंत सर्वासमोर नाचायचा. अकलूज जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या बोऱ्यात सापडून त्या उत्साही अन् चपळ युवकाचा अंत झाला. विशेष म्हणजे, त्याचा मृतदेह नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या नातवाकडे पाहून त्याची आजी एकच टाहो फोडला. टाहो फोडणाऱ्या आजीचा आवाज ऐकून पुलावरून जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय थांबले. त्यांचेही डोळे पाणावले. कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच…

Read More

देवदर्शनासाठी निघालेल्या ३ ते ४ कुटुंबातील सात भाविकांना २ अज्ञात व्यक्तींनी मिळून लुटलं. तसेच कोयत्याचा धाक दाखवत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचे तयार रेखाचित्र आता समोर आले आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीत एक भंयकर प्रकार घडला. तीन ते चार कुटुंब देवदर्शनासाठी निघाले होते. सध्या आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविक पंढरपूरची वाट धरतात. सात भाविक स्वामी चिंचोली येथे चहा पिण्यासाठी थांबले होते. यादरम्यान, २ अज्ञात आरोपी दुचाकीवरून आले आणि त्यांना लुटले. भाविकांच्या गळ्याला कोयता लावून त्यांनी त्यांच्याकडील महागडे ऐवज लुटले. नंतर…

Read More

|| प्रतिनिधी : दिलीप सोनकांबळे || पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीच्या सेक्टर २९ मधील जागेवर अनधिकृतपणे कार्यालय बांधल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून काही प्रसारमाध्यमांतून करण्यात येत आहे. मात्र हे सर्व आरोप हेतुपुरस्सर राजकीय सूडातून करण्यात आल्याचा ठपका खुद्द भोंडवे यांनी ठेवला आहे. “जागा दोन एकर नव्हे, एक एकरच” भोंडवे म्हणाले, “जागा दोन एकर असल्याचे सांगितले जात आहे, प्रत्यक्षात ती केवळ एक एकर आहे. प्राधिकरणाकडून महानगरपालिकेला जागा हस्तांतरित झाली होती. जागेवर पंधरा फूट खोल खड्डे होते. नागरिकांच्या वर्गणीतून ते भरले. बजेट नसल्यानेच आम्ही स्वतः पुढाकार घेतला.” “हे माझे ऑफिस नाही” “हे कार्यालय…

Read More

प्रतिनिधी : शुभम जाधव पिंपरी चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे गुरुवार, दिनांक 26 जून 2025 रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती, महाकवी कालिदास दिन आणि जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमास इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र नवकार महामंत्राने करण्यात आली. त्यानंतर सरस्वती पूजन व शाहू महाराज तसेच महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड. मा. श्री राजेंद्रकुमारजी शंकरलालजी…

Read More

देहूरोड :  दि. २५ जून २०२५ रोजी तळवडे येथील बांधकाम सुरू असलेल्या कंपनीच्या मागील बाजूस एका पुरुष आणि एका महिलेचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे देहूरोड पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर मृतदेह बांधकामस्थळाजवळ अंदाजे १५ फूट अंतरावर ऊताण्या स्थितीत आढळून आले असून, दोघांच्या तोंडावर, हातावर व पायावर दगडाने ठेचल्याच्या गंभीर जखमा आढळल्या आहेत. प्राथमिक माहितीच्या आधारे, सदर घटना ही अनैतिक संबंधातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, खुनाच्या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक व श्वानपथकाची मदत घेण्यात आली आहे.…

Read More