प्रतिनिधी : शुभम जाधव
पिंपरी चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे गुरुवार, दिनांक 26 जून 2025 रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती, महाकवी कालिदास दिन आणि जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमास इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पवित्र नवकार महामंत्राने करण्यात आली. त्यानंतर सरस्वती पूजन व शाहू महाराज तसेच महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड. मा. श्री राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा व सहाय्यक सेक्रेटरी मा. प्रा. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांनी शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाच्या मा. उपमुख्याध्यापिका सौ. मनीषा जैन यांनी प्रास्ताविकातून या दिवसांचे महत्त्व स्पष्ट केले. मा. प्राचार्या सौ. सुनिता नवले यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. तसेच मा. पर्यवेक्षक श्री राजेंद्र पितळीया आणि श्री संजीव वाखारे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरक मार्गदर्शन केले.
शिक्षक प्रतिनिधी सौ. सुवर्णा गायकवाड यांनी शाहू महाराजांचा जीवनप्रवास उलगडला, तर मा. श्री उत्तम बिर्जे यांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन केले.
विद्यार्थी चि. गुरुराज हिरेमठ याने महाकवी कालिदासांच्या कार्याचा परिचय करून दिला. चि. सुशांत वाघमारे आणि चि. प्रकाश गुर्जर यांनी शाहू महाराजांची वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत शिक्षक मा. श्री गणेश ढगे यांनी केले आणि कालिदासांच्या साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. आभार प्रदर्शन मा. पर्यवेक्षिका श्रीमती मनीषा कलशेट्टी यांनी केले.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसुधारणा, साहित्यप्रेम व नशामुक्तीचे प्रबोधन घडले.
