पुणे : नेपाळ येथून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या नेपाळी गुरखा म्हणजेच साथी चे बोधेगाव बालमटाकळी गावात गावकऱ्यांना रात्री चोरा पासून इतर येणाऱ्या संकटापासून सावध करण्यासाठी रात्रभर शिट्टी व काठी वाजवून गस्त घालणाऱ्या साथी (गुरखा) चे….

दि२४/६/२०२४ रोजी बोधेगाव व बालमटाकळी या गावातील काही बडेबाप की औलादीने नाहक किरकोळ कारणावरून ह्या गुरखा साथीवर जिवघेणा हल्ला केला नव्हे जिवे मारण्याचा प्रयत्न केला..

काही पुढाऱ्यांनी झालेला प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला व करत आहेत. परंतु माणुसकी नावाची गोष्ट जिंवत आहे की नाही..
त्यांना जरी वाटत असले प्रकरण दबले आहे सर्व शांत झाले आहे परंतु जगात न्याय नावाची गोष्ट जिंवत आहे. *कानुन के हात बडे लंबे होते है.* बोधेगाव मार्केट समोर झालेला प्रकार तिन ठिकाणी सि. सि. टि. व्ही मध्ये कैद झाला असून व एका गावकऱ्याचा मोबाईल मध्ये हल्लेखोर व त्यांची क्रियटा गाडी हातातील काठी व इतर हत्यारे व केलेले कृत्य सगळे कॅमेरा मध्ये कैद झाले आहे…
त्यांचा पापाचा घडा लवकरच भरणार असून पुराव्या सहीत प्रकरण सर्वांच्या समोर आणुन गुन्हेगारांना शिक्षा मिळेपर्यंत पाठपुरावा करून गुरखा साथीला न्याय देण्यासाठी मी समाज सेविका संगिता ताई ढवळे व माझी सहकारी टिम मागे हटणार नाही…

बोधेगाव व बालम टाकळी मध्ये असे प्रकार घडत असून व असले प्रकरण दाबण्याचे षढयंत्र कोणी करत असेल तर गावचे गावपण व व्यापार पेठ उद्धवस्त होण्यासाठी वेळ लागणार नाही. पुढे दिवसा ढवळ्या बडे बाप की औलाद रस्त्यावर खुण करतील व प्रकरणे दाबतील तरी माझी सर्वांना विनंती आहे असे नालायकाना कोणीही पाठीशी घालु नये… साथी गुरखा पुणे येथे हॉस्पिटल मध्ये ॲडमिट असून त्याची प्रकृती नाजुक आहे. त्याच्या खर्चाची जबाबदारी माणुसकी म्हणून आपली आहे आपल्याच गावचे रात्रीचे राखण ते करत होते. त्यांची कमाई किती आहे तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही. येथे त्यांचे नातेवाईक पाहुणे राऊळे बहीण भाऊ आई वडील शेजारी पाजारी नाहीत वरून ते भारतीय नाहीत त्याच्याकडे मोफत सवलतीचे कार्ड नाही त्यामुळे आपणास होईल तितकी मदत करा व आपले कर्तव्य पार पाडा. व्यापारी व ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी जास्तीत जास्त मदत करा…
!!आणि हो गुन्हेगाराला सुट्टी नाही!!
बडे बाप कि औलाद
समाज सेविका संगिता ताई ढवळे*& *टीम*🙏🏻🙏🏻🙏🏻
