Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
पिंपरी चिंचवड

ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यालयावर अतिक्रमणाचा गाजलेला आरोप; “हे केवळ राजकीय डावपेच, मी घाबरणार नाही” – मोरेश्वर भोंडवे यांचे परखड प्रत्युत्तर.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 29, 2025Updated:June 29, 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : दिलीप सोनकांबळे ||

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीच्या सेक्टर २९ मधील जागेवर अनधिकृतपणे कार्यालय बांधल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून काही प्रसारमाध्यमांतून करण्यात येत आहे. मात्र हे सर्व आरोप हेतुपुरस्सर राजकीय सूडातून करण्यात आल्याचा ठपका खुद्द भोंडवे यांनी ठेवला आहे.

“जागा दोन एकर नव्हे, एक एकरच”

भोंडवे म्हणाले, “जागा दोन एकर असल्याचे सांगितले जात आहे, प्रत्यक्षात ती केवळ एक एकर आहे. प्राधिकरणाकडून महानगरपालिकेला जागा हस्तांतरित झाली होती. जागेवर पंधरा फूट खोल खड्डे होते. नागरिकांच्या वर्गणीतून ते भरले. बजेट नसल्यानेच आम्ही स्वतः पुढाकार घेतला.”

“हे माझे ऑफिस नाही”

“हे कार्यालय माझे खासगी नाही. विकास नगर, वाल्हेकर वाडी, माऊली, तीर्थरूप, सिलेस्टिल सिटी येथील सुमारे साडेपाचशे ज्येष्ठ नागरिकांचे हे कार्यालय आहे. रोज योगा, चित्रकला, भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होतात. पावसात किंवा उन्हात बसायला जागा नव्हती म्हणून पत्र्याचे शेड उभारले,” असे भोंडवे यांनी स्पष्ट केले.

या ठिकाणी दररोज विविध उपक्रम होत असतात.

रोज सकाळी सुमारे शंभर ते दीडशे ज्येष्ठ महिला आणि पुरुष योगाभ्यासासाठी येथे उपस्थित राहतात. संध्याकाळच्या वेळेत झुंबा डान्स क्लास, चित्रकला वर्ग, भजन-कीर्तन आणि अध्यात्मिक प्रवचन असे अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. या परिसरात दुसरे कुठलेही सार्वजनिक मैदान उपलब्ध नसल्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी हेच एकमेव ठिकाण झाले आहे. त्यामुळे येथे बॅडमिंटन, फुटबॉलसारखे खेळही खेळले जातात आणि परिसरातील नागरिकांना एकत्र येण्याचे व विरंगुळा मिळवण्याचे हक्काचे स्थान म्हणून या केंद्राचा उपयोग होतो.

विरंगुळा केंद्रातील पत्र्याचे शेड आणी ज्येष्ठांचे कार्यालय हे दोण्ही अधिकृत; महापालिकेच्या मंजुरीचे दस्तऐवज उपलब्ध

विरंगुळा केंद्राच्या ठिकाणी उभारण्यात आलेले दोन पत्र्याचे शेड आणि ज्येष्ठांचे कार्यालय हे पूर्णपणे अधिकृत असून, त्यासाठी आवश्यक असलेले प्लॅन सॅक्शनचे कागदपत्रे महानगरपालिकेकडे सादर करण्यात आलेले आहेत, अशी माहिती संबंधित पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. या शेड आणि ज्येष्ठांचे कार्यालया च्या अनधिकृततेबाबत काही ठिकाणी अपप्रचार केला जात असल्याचे लक्षात आले असून, संबंधित सर्व बांधकामे महानगरपालिकेच्या अधिकृत मंजुरीनुसारच करण्यात आलेली आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची छायांकित प्रत महापालिकेला देण्यात आलेली आहे. स्थानिक नागरिकांनी या सुविधांमुळे सार्वजनिक उपक्रमांना मोठा हातभार लागल्याचे समाधान व्यक्त केले आहे.

“आठवडा बाजार अधिकृत”

त्यांनी स्पष्ट केले की, “या ठिकाणी आठवडा बाजार अनधिकृत नाही. तो महानगरपालिकेत नोंदणीकृत आहे. नागरिकांच्या गरजेसाठी सुरू ठेवला जातो.”

“माझा राजकीय द्वेषातून बदनामीचा प्रयत्न”

या प्रकरणाला राजकीय हेतू असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. “ज्यांनी आरोप केले, ते काही दिवसांपूर्वीच माझ्या वाढदिवसाला बुके घेऊन आले होते. मी या प्रभागातील साडेतीन हजार ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करतो. ते बघवत नाही म्हणून हे आरोप होत आहेत,” असा आरोपही त्यांनी केला.

“कोण ब्लॅकमेल करणार मला?”

“हा प्रकार ब्लॅकमेलिंगचाच एक भाग असू शकतो. ज्याने पत्र दिले त्याच्या मागे कोण आहे हे पाहणारच. मी कोणाला घाबरणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये चिंता

या बातम्यांमुळे कार्यालयाशी जोडलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. “वर्षानुवर्षे आम्ही वर्गणी काढली, आता कोणी राजकारणासाठी हे पाडायचा डाव मांडतोय,” असे एका ज्येष्ठ सदस्याने सांगितले. आणखी एक सदस्य म्हणाले, “हे आमच्या आयुष्याचा आधार आहे. आम्हाला कुठे बसायचे?”

“सत्यासमोर कोणी उभं राहू शकत नाही”

भोंडवे म्हणाले, “ज्यांनी आरोप केले, त्यांनी कोणताही पुरावा सादर करावा. ही जमीन माझ्या वैयक्तिक वापरासाठी घेतल्याचा एकही पुरावा दाखवावा. मग आम्हीही विचार करू. अन्यथा हे सर्व राजकीय डावपेच आहेत.”

मानहानीची कारवाईचा इशारा

मानहानीची कारवाई करणार का, यावर त्यांनी “सध्या बोलणार नाही, मात्र योग्य वेळ आली की निर्णय घेऊ,” असेही स्पष्ट केले.

 

(यासंदर्भात अधिक माहिती अथवा प्रतिक्रिया घेण्यासाठी मोरेश्वर भोंडवे यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा.)

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleश्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकराजा शाहू महाराज जयंती, महाकवी कालिदास दिन व जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन उत्साहात साजरे.
Next Article दोघांनी ७ जणांना लुटलं अन् गळ्यावर कोयता ठेवून मुलीचं शोषण; पंढरीच्या वारीत नेमकं काय घडलं ? आरोपीचं रेखाचित्र समोर
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळीकांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद.

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?