Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा.
पुणे

कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJuly 2, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बहिणीने यापूर्वी अनेकदा पंढरपूरची वारी केली आहे. मीही यंदा वारीत जाईन, असा हट्ट धरणाऱ्या एका वीसवर्षीय युवकाने संत तुकाराम महाराज पालखीत सहभागही घेतला.

रोजच्या भजन-कीर्तनात उत्साहाने सहभाग घ्यायचा. रात्री उशिरापर्यंत सर्वासमोर नाचायचा. अकलूज जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या बोऱ्यात सापडून त्या उत्साही अन् चपळ युवकाचा अंत झाला. विशेष म्हणजे, त्याचा मृतदेह नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या नातवाकडे पाहून त्याची आजी एकच टाहो फोडला. टाहो फोडणाऱ्या आजीचा आवाज ऐकून पुलावरून जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय थांबले. त्यांचेही डोळे पाणावले.

कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का… माझ्या लेकीला काय उत्तर देऊ.. असे हुंदके देत रडणाऱ्या त्या आजीकडे पाहण्याशिवाय वारकऱ्यांच्या हातात काहीच नव्हते. सहा वाजता नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या आपल्या नातवाचा मृतदेहही दिसेना. त्यामुळे आजी एकटीच हुंदके देत नदीच्या किनारी बसून राहिली. प्रशासनालाही मृतदेह शोधून काढण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांच्या दिंडी क्रमांक १२ मधील वारकरी संतापले. रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली. अर्धा तासाहून अधिक वेळ त्यांनी रास्ता रोखून धरला.

घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले. मृतदेह शोधून काढण्याचा शब्द दिल्यानंतर वारकरी रस्त्यावरून उठले आणि पुढच्या प्रवासाला निघाले. दिंडी क्रमांक १२ मधील काही वारकरी त्या रडणाऱ्या आजीसोबत थांबले.

एकुलता एक मुलगा

ही दुर्दैवी घटना अंबड तालुक्यातील (जिल्हा जालना) झिरपी गावातील रहिवासी प्रयागबाई प्रभाकर कराबे यांच्या बाबतीत घडली आहे. नदीत वाहून जाणाऱ्या युवकाचे नाव गोविंद कल्याण फोके (वय २०, रा. झिरपी) असे आहे.

गोविंद हा फरागबाई कराबे यांच्या लेकीचा मुलगा असून तो यंदाच्या वारीत पहिल्यांदाच सहभागी झाला. गोविंद हा नर्मदा कल्याण फोके यांचा एकुलता एक मुलगा असून, फोके परिवारातील सर्वजण शेती करतात. १८ जूनपासून श्री देवराबुवा हादगावकर दिंडी क्रमांक १२ (संत तुकाराम महाराज पालखी रथामागे) मध्ये तो सहभाग झालेला होता.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदोघांनी ७ जणांना लुटलं अन् गळ्यावर कोयता ठेवून मुलीचं शोषण; पंढरीच्या वारीत नेमकं काय घडलं ? आरोपीचं रेखाचित्र समोर
Next Article महिला किर्तनकाराला दगडाने ठेचून मारणारे नराधम सापडले, ‘या’ एका गोष्टीसाठी केलेली हत्या
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

नवले पुलावर चिमुरडीसाठी न्यायाची हाक; रास्तारोकोदरम्यान पोलिस-आंदोलकांमध्ये तणाव, कॉलर पकडल्याचा आरोप.

May 3, 2026

80 हजारांची लाच घेताना लोहगाव पोलीस ठाण्यात PSI रंगेहात पकडला; ACB ची धडाकेबाज कारवाई.

May 2, 2026

पुणे जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; बार्टीमार्फत जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद.

April 17, 2026

पुण्यातील वॉटरपार्कमध्ये भीषण अपघात; स्लाइडवरून पडल्याने महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी.
सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह; शिरूर पोलिसांकडून वॉटरपार्क प्रशासनावर गुन्हा दाखल

April 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
गुन्हेगारी

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

By shauryavartanews2025@gmail.comMay 22, 20260

प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे  पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात मोठी…

“सुरक्षेच्या नावाखाली नराधमाचा डाव; चिमुरडीच्या धैर्यामुळे सिक्युरिटी गार्ड गजाआड”

May 10, 2026

महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई, ३६ लाखांच्या दुचाकींसह दोन सराईत चोरटे जेरबंद.

May 7, 2026

🚨 गुन्हे शाखा युनिट-१ ची धडाकेबाज कारवाई: ४ आरोपी अटकेत, ९ देशी कट्ट्यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त.

May 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?