Author: shauryavartanews2025@gmail.com

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी-चिंचवड :  महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात आज (रविवारी) सकाळी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत सुमारे 42 टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. यामध्ये 13 टन ओला कचरा आणि 29 टन सुका कचरा संकलित करण्यात आला. तसेच शहरातील एकूण 43 कि.मी. लांबीचा दुतर्फा रस्त्याची स्वच्छता या अभियानात करण्यात आली. भारताचे स्वच्छतादूत महाराष्ट्र भूषण तथा पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे महास्वच्छता अभियान आज संपूर्ण महाराष्ट्रभर घेण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड, निगडी, थेरगाव, पिंपरी परिसरात हे…

Read More

 || प्रतिनिधी : क्षितिजा देव || पुणे : स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी गुणाट गावातून अटक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरोपीचा शोध सुरू होता, आणि अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. दोन दिवस ऊसाच्या शेतात लपून बसलेल्या आरोपीला जेवण मिळत नव्हते. त्यामुळे तो रात्रीच्या वेळी आपल्या नातेवाईकांकडे पाणी पिण्यासाठी जात होता. पोलिसांनी याच माहितीच्या आधारे त्याचा मागोवा घेतला. अखेर, रात्री एक वाजता तो कॅनॉलजवळ झोपलेला असताना शोधमोहीम राबवणाऱ्या पोलिसांना दिसला. त्यानंतर तातडीने त्याला ताब्यात घेऊन पुण्याला रवाना करण्यात आले आहे. सध्या त्याला लष्कर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. पुढील चौकशीसाठी त्याला पुण्यात…

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || चिंचवड :  पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत गेल्या चाळीस वर्षापासून वेताळनगर,मोरया नगर, झोपडपट्टी रहिवासी आहोत स्थानिक नागरिक झोपडपट्टी रहिवासी व काही घरामध्ये व्यवसाय करित असलेली बिगर निवासी झोपडी आहेत काही पात्र अपात्र असून सदर झोपडीचे सेवा आकार व इतर करांचे बील तसेच नवीन फोटोपास, मनपा मिळकत कर पावती देखील त्याच्याकडे उपलब्ध आहेत. वेताळनगर झोपडपटटीचे पुर्नवसन योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत त्यांचे पुर्नवसन झालेले नसल्यामुळे तेथील रहिवासी सदर ठिकाणी वास्तव्यास आहेत. निवासी झोपडया व व्यवसाय करित असलेल्या बिगर निवासी झोपड्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका झोपडप‌ट्टी पुनर्वसन विभाग यांच्या सव्र्व्हेक्षण नुसार अधिकृत आहेत सदर झोपडयाची बिगर…

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारलेल्या विकी कौशलचं सध्या मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. विकी कौशलनं या सिनेमात संभाजी महाराजांची भूमिका दमदार पद्धतीनं साकारली आहे. हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या विकी कौशलचं मराठी देखील तितकंच उत्तम आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात हे सर्वांना दिसलं. विकी कौशल यांनी यावेळी त्याच्या मनोगताची सुरुवात ‘जय भवानी, जय शिवराय’ नं करत सर्वांची मनं जिंकली. काय म्हणाला विकी? विकी कौशल यावेळी बोलताना म्हणाला की, ‘खरं सांगू तर मी खूप नर्व्हस फिल करतोय. मी दहावीपर्यंत मराठी शिकली आहे. मी मराठी…

Read More

|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे || पिंपरी : पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रांचच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने हिंजवडी परिसरातील कासारसाई येथे एका व्हिलामध्ये कारवाई करत चार परदेशी महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. एजंट महिला ग्राहकांना कासारसाई, लोणावळा परिसरात व्हिला बुक करण्यास सांगत त्यानंतर परदेशी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला माहिती मिळाली की, एक परदेशी महिला एजंट ग्राहकांना व्हॉट्सअप कॉल करून लोणावळा परिसरात व्हिला बुक करण्यास सांगते. त्यानंतर परदेशी महिलांना तिथे घेऊन जात त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेते. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावला असता, संबंधित परदेशी महिलेने एका…

Read More

|| प्रतिनिधी : क्षितिजा देव || पुणे : पुण्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोत बलात्कराची घटना घडली आहे. एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय प्रवासी महिलेवर बलात्कार झाला आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच या बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मोठी कारवाई केली आहे. स्वारगेट हे पुण्यातील सर्वात वर्दळीचे ठिकाण आहे. इथं नेहमीच मोठी गर्दी असते. अशातच स्वारगेट बस स्थानकात बलात्काराची घटना घडल्याने संताप…

Read More

तर स्वारगेट बलात्काराची घटना घडलीच नसती; जर पुणे पोलिसांनी 3 दिवसांपूर्वीच…; धक्कादायक खुलासा.. || प्रतिनिधी क्षितिजा देव || पुणे : 26 वर्षीय तरुणीवर बलात्काराच्या घटनेनंतर पुण्याचा स्वारगेट बस स्थानक हादरला. मंगळवारी म्हणजेच 25 फेब्रुवारीला पहाटे शिवशाही बसमध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर नराधम आरोपी फरार असून पोलिसांची 8 पथकं आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. स्वारगेट आगाराच्या आवारात भंगार शिवशाही बसेस उभ्या आहेत. या बसेसमध्ये अनैतिक कामं सुरु असल्याचा आरोप होऊ लागलाय. या बसेसमध्ये कंडोम, साड्या, चादर, ब्लँकेट, अंतर्वस्त्र आणि दारुच्या बाटल्या आढळल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. दरम्यान 3 दिवस आधीच यासंदर्भात पुणे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. काय म्हटलं…

Read More

|| प्रतिनिधी : क्षितीजा देव || पुणे : पुण्याचे मालक असे रील्स सोशल मिडीयावर टाकून दहशत करणाऱ्या गजा मारणे टोळीचे कंबरडे पुणे पोलिसांनी पुरत मोडायचं ठरवल आहे. पुणे पोलिसांनी जोग मारहाण प्रकरणात गज्या मारणेसह टोळीवर मकोका दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ही कारवाई मारणे टोळीसाठी मोठा धक्का समजला जात आहे. कारवाईमध्ये मारहाण करणाऱ्या तिघांवर मकोका लावण्यात आला आहे. या टोळीला नेस्तनाबूत करण्याची पोलिसांची भूमिका आहे. एकूण 27 आरोपी आमच्या रडारवर आहेत. टोळीप्रमुखावरही कारवाई केली जाईल. कोणीही कायदा हातात घेऊ नका. त्या टोळीतील सदस्यांच्या मालमत्तांची माहिती डीडीआरकडून आणि त्यांच्या वाहनांची माहिती आरटीओकडून मागवली आहे. हे सगळे आरोपी त्या दिवशी…

Read More

|| प्रतिनिधी : जुबेर शेख || पिंपरी चिंचवड : रावेत, पुनावळे, काळेवाडी, चिंचवड, ठिकठिकाणी गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांना रेडिमिक्स सिमेंट काँक्रीट पुरवण्यासाठी बिल्डर, उद्योजक, स्थानिकांनी जागोजागी आरएमसी प्लांट थाटले आहेत. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक रेडिमिक्स, खडी, क्रश सॅण्ड, डबर घेऊन बेदरकार, सुसाट वाहतूक करणारे सिमेंट मिक्सर, डंपर रस्त्यावरून जणू ‘यमदूतच धावतोय’ असे बेभान धावत असतात. गेल्या तीन-चार वर्षांत या परिसरातील मुख्य रस्त्यांवर धुडगूस घालणाऱ्या या मालवाहू वाहनांनी अनेकांना चिरडले आहे, हायवा, सिमेंट मिक्सर यांसारखी मोठी वाहने अनेकदा वेगाने धावताना अनियंत्रित होतात. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. बेदरकार वाहतूक करणाऱ्या या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचे अभय राहिले…

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || देहूरोड : तक्रारी मागे घेण्यासाठी खंडणी मागितल्या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून ४० लाख रुपयांची मागणी करत धमकी दिली. हा प्रकार गुरुवारी (दि. २०) उघडकीस आला. प्रदीप वसंतराव चव्हाण (५४, रा. मातोश्री निवास, मेन बाजार, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे, त्यानुसार, किरण परशुराम गवळी (३६. रा. पारशी चाळ, देहूरोड), सचिन देशपांडे (४०, रा. तळेगाव दाभाडे), धनराज शिंदे (५२, रा. देहूरोड बाजार) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप चव्हाण यांचे रावेत येथे तत्त्व रेसिडेन्सी नावाने गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. आरोपींनी बांधकाम…

Read More