Author: shauryavartanews2025@gmail.com

नागपूर : नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यातून तुफान दगडफेक झाली. वाहनं फोडण्यात आली. वाहनांना आगी लावण्यात आल्या. जाळपोळ झाली. अनियंत्रित जमावाला आवरताना पोलीस, अग्निशमन दलाचे जवानही या हिंसाचारात जखमी झाले. या हिंसाचारामुळे नागपूरच्या अनेक भागात अजूनही संचारबंदी कायम आहे. नागपूरमधील या राडा प्रकरणात फहीम खान हे नाव समोर आलय. फहीम खान या सगळ्या हिंसाचारामागचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे. या फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फहीम खानसह 50 आरोपींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय. नागपूर सायबर पोलिसांनी मध्यरात्री हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || हिंजवडी : हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स या ‘आयटी’ कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला (टेम्पो ट्रॅव्हलर) अचानक आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले. पुढील बाजूस बसलेले कर्मचारी आणि चालक पेटत्या बसमधून बाहेर पडले, मात्र मागील दरवाजा उघडला न गेल्याने अडकून पडलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. फेज एकमधील विप्रो सर्कलजवळ बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेच्या पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात नसून घात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चालकाने केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला असल्याची माहिती समोर…

Read More

|| प्रतिनिधी : किरण अडागळे || हिंजवडी : पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये चार जणांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज बुधवारी सकाळी हिंजवडी परिसरातील फेज वन मध्ये टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागली होती. या भीषण आगीमध्ये ट्रॅव्हलमध्ये असणाऱ्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. चार जण आतमध्ये कसं अडकले? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. दुर्दैवी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. टेम्पो ट्रॅव्हलला सकाळी अचानक आग लागली. आतमध्ये बसलेल्या चार प्रवासांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आज सकाळी आठ वाजता हिंजवडी येथे घडली दुर्दैवी दुर्घटना घडली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दुर्घटेनची…

Read More

अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आपल्या सहकाऱ्यांसोबत तब्बल 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतल्या आहेत. स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने त्यांचे फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग झाले. त्या गेल्या 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्या होत्या. त्यांचा हा प्रवास केवळ 8 दिवसांचाच होता. मात्र, काही तांत्रिक समस्यांमुळे तो लांबला आणि त्यांना तब्बल 9 महिने तेथेच थांबावे लागले. यानंतर आता त्या पुन्हा पृथ्वीवर परतल्या आहेत. आपल्या या मोहिमेत त्यांनी अंतराळात बरीच महत्वाची कामे केली आहेत. सुनिता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकावरील आपल्या 9 महिन्यांच्या काळात, साधारणपणे फुटबॉल मैदानाच्या आकाराच्या या अंतराळ स्थानकाची देखभाल आणि स्वच्छता केली. याशिवाय, त्यांनी येथील…

Read More

नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू झालाय. नासा आणि इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सचे यान ड्रॅगनमधून आंतराळवीर परतणार आहेत. स्पेसक्राफ्टचे अनडॉकिंग झाले असून पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू झालाय. भारतीय प्रमाणवेळेनुसार सुनिता विल्यम्स पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी पृथ्वीवर पोहोचेल. सुनिता विल्यम्ससह चारही अंतराळवीर परत येणार आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी जून महिन्यात आठवड्याभरासाठी अंतराळात गेले होते. मात्र गेल्या ८ महिन्यांपासून ते अडकून पडले होते. नासा आणि स्पेसएक्सने दोघांना परत आणलं. त्यांच्यासोबत इथर दोन अंतराळवीरही असणार आहेत. नासाने सुनिता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासाचे शेड्युल जारी केलंय. शेड्युल ठरलेलं असलं तरी हवामानामुळे किंवा…

Read More

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण संवेदनशील बनले आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमध्ये हिंसक संघर्ष उफाळला. औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे हा संघर्ष उफाळला असल्याचे सांगितले जात आहे. या संघर्षात दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली, तसेच काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. नागपूर पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत या भागात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. नागपूरच्या घटनेवर सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया या घटनेनंतर राज्यभरात विविध राजकीय आणि सामाजिक स्तरांवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विविध नेतेमंडळींनी या घटनेचा निषेध करत नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींनीही या घटनेबाबत प्रतिक्रिया देत…

Read More

|| प्रतिनिधी : क्षितिजा देव || पुणे : बेदरकारपणे वाहन चालवून रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकीला ठोकर मारल्याची घटना रविवारी (१६ मार्च) पहाटे एनआयबीएम रस्त्यावर घडली. या धडकेमुळे दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कोणी जखमी असल्याची माहिती नाही. याप्रकरणी दुचाकीचे मालक सोहेल शफिक शेख (वय ३३, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कारचालक क्षतिज राकेश मंगला (वय ३०, रा. मोहंमदवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी सोहेल शेख कोंढवा येथे राहण्यास आहेत. ते दुचाकीवरून दूध पार्सल करण्याचे काम करतात. रविवारी पहाटे ते दूध पार्सल घेऊन निघाले होते. पहाटे चार वाजता…

Read More

|| प्रतिनिधी : प्रभू कांगणे || पिंपरी चिंचवड : एका हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करत शस्त्राचा धाक दाखवून २० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मागणी पुर्ण नाही केल्यास तुला व तुझा मालक चंदन सिंग याचा मर्डर करील अशी धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि.१४) दुपारी अडीचच्या सुमारास रावेत येथील म्हस्के वस्ती येथील शौर्य रेसीडेन्सी लॉजिंग हॉटेल येथे घडली. याप्रकरणी रावेत पोलिसांनी हनुमंत भगवान शिंदे (वय ४०, रा. पारशी चाळ, देहुरोड) आणि प्रेम प्रेमनाथ ठाकुर (वय २०, रा. सिद्धीविनायक मंदिराजवळ, विकासनगर, देहुरोड) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत दिनेश भास्कर मराठे (वय ४१, रा. सिल्हरसिटी, जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली…

Read More

पुणे : न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या आदेशाची खोटी ऑर्डर आणि सही मुंबई उच्च न्यायालयात सादर करून फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपींनी जामीन मिळवल्याची घटना न्यायव्यवस्था हादरून टाकणारी आहे. मात्र खोटी सही करून न्यायालयाची दिशाभूल करणारे आरोपी अजूनही मोकाट कसे? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. दुसऱ्या बाजूला, जेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला त्यानंतर उच्च न्यायालयाने आरोपींचा जामीन रद्द केला खरा मात्र पुण्यातील संबंधित पोलिस ठाण्यात या आरोपींना पुन्हा अटक का नाही झाली? हा सुद्धा प्रश्न यानिमित्ताने अधोरेखित होतोय. फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुन्ह्यातून वगळले आहे, असा बनावट आदेश उच्च न्यायालयात सादर करत आरोपींनी जामीन मिळवण्याचा धक्कादायक…

Read More

|| प्रतिनिधी : किरण आडागळे || देहूरोड : धुळवड साजरी करण्यासाठी बाहेर पडलेल्या मित्रांपैकी एक मित्र बुडू लागल्याने त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. देहूरोड किन्हईजवळ इंद्रायणी नदीवरील बोडकेवाडी बंधाऱ्यात आज दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. राज दिलीप अघमे (वय २५, रा. घरकुल, चिखली), आकाश विठ्ठल गोरडे (वय २४, रा. घरकुल, चिखली) व गौतम कांबळे (वय २४, लोकमान्य हॉस्पिटल) अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीवरील बोडकेवाडी बंधाऱ्यात जल उपसा केंद्राजवळ सहा तरुण पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. त्यापैकी एक तरुण बुडत असताना त्याला वाचवायला त्याचे मित्र गेले. बुडणारा तरुण वाचला मात्र…

Read More