नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू झालाय. नासा आणि इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सचे यान ड्रॅगनमधून आंतराळवीर परतणार आहेत. स्पेसक्राफ्टचे अनडॉकिंग झाले असून पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू झालाय.

भारतीय प्रमाणवेळेनुसार सुनिता विल्यम्स पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी पृथ्वीवर पोहोचेल. सुनिता विल्यम्ससह चारही अंतराळवीर परत येणार आहेत.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी जून महिन्यात आठवड्याभरासाठी अंतराळात गेले होते. मात्र गेल्या ८ महिन्यांपासून ते अडकून पडले होते. नासा आणि स्पेसएक्सने दोघांना परत आणलं. त्यांच्यासोबत इथर दोन अंतराळवीरही असणार आहेत. नासाने सुनिता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासाचे शेड्युल जारी केलंय. शेड्युल ठरलेलं असलं तरी हवामानामुळे किंवा इतर गोष्टींमुळे यात बदलही होऊ शकतो. जवळपास १७ तासांचा हा प्रवास असणार आहे.
सुनिता विल्यम्सना घेऊन येणारं ड्रॅगन यानाची सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी अनडॉकिंग प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर काही टप्प्यात अंतराळयानाचा परतीचा प्रवास होईल. अनडॉकिंगमध्ये स्पेसक्राफ्ट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळं होईल.

स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या दिशेने येताना डीऑर्बिट बर्न सुरू करेल. ही प्रक्रिया बुधवारी पहाटे २ वाजून ४१ मिनिटांनी होईल. यातून इंजिन फायर केले जाईल. यामुळे स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या आणखी जवळ पोहोचेल. त्यानंतर स्पेसएक्सचं एअरक्राफ्ट २७ हजार किमी प्रतितास वेगाने पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश करेल. पृथ्वीपासून १८ हजार फूट उंचीवर दोन ड्रॅगन पॅराशूट उघडतील. त्यानतंर ६ हजार फुटावर मेन पॅराशूट उघडण्यात येतील.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, स्प्लॅशडाऊन किंवा अंतराळवीरांचे समुद्रात लँडिंग फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर होणार आहे. जर हवामान अनुकूल नसेल तर इतरत्र लँडिंग केलं जाईल. हे लँडिंग भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे साडेतीनच्या सुमारास होईल.
