Author: shauryavartanews2025@gmail.com

प्रतिनिधी : अमोल बेडके पिंपरी चिंचवड :  दि. २४ जून २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने शिताफीने सापळा रचून एक मोठी कामगिरी केली आहे. खून व खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांमध्ये फरार असलेला एक कुख्यात आरोपी देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगताना वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे अटक करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार देवा राऊत व जयवंत राऊत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विशाल सुनिल काळे (वय २९, रा. ढोरआळी, शिरूर, जि. पुणे) हा शस्त्रासह हॉटेल रानमळा जवळ फिरत आहे. विशाल काळे हा शिरूर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 514/2016, भादंवि…

Read More

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिवासी भागातील दुर्गावाडी येथील प्रसिद्ध कोकणकड्याच्या १२ फूट खोल दरीत चाळीस वर्षीय तलाठी आणि एका महाविद्यालयीन तरुणीचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हे दोघेही बेपत्ता होते आणि त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत व्यक्तींची ओळख रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) आणि रुपाली संतोष खुटाण (आंबोली, ता. जुन्नर) अशी पटली आहे. जुन्नर पोलिसांनी आणि स्थानिक बचाव पथकाने प्रतिकूल परिस्थितीत हे मृतदेह दरीतून बाहेर काढले. नेमकं काय घडलं ? रामचंद्र पारधी हे मूळचे दुर्गावाडीचे असून, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते…

Read More

पुणे :  संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये नागरिकांचे मोबाईल व महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय व परजिल्हयातील टोळीला पुणे शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 23 लाख 91 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चांदणी शक्ती कांबळे (वय ३२ , रा. मौलानी शाळेजवळ, गांधीनगर, उदगीर ता. उदगीर जि. लातुर ), रिटा ऊर्फ गंगा नामदेव कांबळे (वय ३५ वर्षे, रा. अंबिका कॉलनी, चंद्रमा देवी नगर उदगीर, ता. उदगीर, जि. लातुर), बबीता सुरज उपाध्ये (वय. ५७, रा. चंद्रमा देवी नगर, उदगीर, ता. उदगीर जि. लातुर), पुजा धिरज कांबळे (वय. ३५ ,…

Read More

लातूर :  रस्त्यावर ट्रिपल सीटने प्रवास करणाऱ्या तीन तरुणींना ‘झिपरे’ असे म्हणत शिवीगाळ करून कानफटात मारणं एका महिला ट्रॅफिक पोलिसावर महागात आलं आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संतप्त झालेल्या तरुणींनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत महिला पोलिसाविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना लातूर शहरातील असून, आरोपी वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल प्रणिता मुसने या ड्युटीवर जात असताना त्यांनी स्कुटीवरून ट्रिपल सीट जात असलेल्या तीन तरुणींना रस्त्यात थांबवत अश्लील भाषेत शिवीगाळ केली व एका मुलीला कानफटात मारली. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ एका नागरीकाने शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला. पाहता पाहता तो व्हायरल झाला आणि वादाला तोंड…

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || चिंचवड : २१ जून २०२५ रोजी ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिंचवडे लॉन्स येथे एक भव्य योग साधना व योगाभ्यास प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. महिलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांनी सकाळी लवकर उठून या योग शिबिरात सक्रिय सहभाग घेतला. योगप्रकार, प्राणायाम आणि ध्यान यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. या विशेष शिबिरात राज्यसभेचे मा, खासदार अमरजी साबळे, चिंचवडच्या मा ,आमदार सौ. अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, तसेच चिंचवड व वाल्हेकरवाडी परिसरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजन योगपीठ, हरिद्वार व…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : चिंचवड गावातील शांतिबन सोसायटीत गुरुवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. पूर्वी सोसायटीत हाऊसकिपिंगचे काम करणाऱ्या व्यक्तीने सोसायटीच्या मुख्य गेटवर ड्युटीवर असलेल्या वॉचमनवर चाकूने सपासप वार करत गंभीर जखमी केले. या हल्ल्यानंतर आरोपीने सिमेंटचा गट्टू देखील वॉचमनच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, चिंचवड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० जून २०२५ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास शांतिबन सोसायटी, चिंचवडगाव, पुणे येथे घडली. या प्रकरणी सुदाम नारायण कामिटे (वय ५६ वर्षे, व्यवसाय – सिक्युरिटी गार्ड, रा. जय गणेश कॉलनी, चिंचवडे…

Read More

|| प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे || पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने गेल्या दहा वर्षांपासून निष्ठेने सेवा देणाऱ्या कामगारांना अचानक कामावर येण्यास मनाई केली आहे. या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांच्या स्थानावर समितीने आपल्याच मर्जीतील लोकांना कामावर घेतले आहे. या अन्यायाविरोधात जुन्या कामगारांनी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांविरोधात जोरदार बोंबाबोंब आंदोलन छेडले. “न्याय द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. कामगारांच्या भावना व त्यांची आर्थिक अडचण लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी देखील संतप्त कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी चिंचवड : 15 जून 2025 रोजी दुपारी चिंचवडे नगर परिसरात एका भंगार दुकानाला लागलेल्या आगीने मोठे रौद्ररूप धारण केले. ही आग इतकी भयानक होती की तिच्या आहारी शेजारील फर्निचर दुकान, डेकोरेशनचे गोडाऊन आणि काही अंतरावर असलेली रहिवासी इमारतही आली. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर व उष्णता निर्माण झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीचा भडका इतका प्रचंड होता की काही रहिवाशांना घाबरून पहिल्या मजल्यावरून उड्या माराव्या लागल्या. महिलांनी व घरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत घरातील सिलेंडर, फ्रीज, वायरींग व महत्त्वाचे साहित्य तातडीने बाहेर काढले. यामुळे मोठी जीवितहानी टळली, परंतु शेकडो नागरिकांच्या जिवावर बेतलेली ही परिस्थिती…

Read More

मावळ तालुक्यात कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील (Indrayani River) पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेले होते. यापैकी चार पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. रविवारी रात्री उशीरापर्यंत एनडीआरएफकडून (NDRF Team) बचावकार्य सुरु होते. सध्या याठिकाणी बचावकार्य थांबवण्यात आले असून ड्रोनद्वारे नदीत आणखी कोणी नागरिक अडकला आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारच्या दुर्घटना घडल्यानंतर सरकार एकाच छापाच्या प्रतिक्रिया देते. मात्र, त्यापूर्वी सरकार काय करते, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं? काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ…

Read More

पुणे : दौंडहून पुण्याला येणाऱ्या डेमू (DEMU) ट्रेनमध्ये सोमवारी सकाळी एक थरारक घटना घडली. सकाळी 07:05 वाजता दौंडवरून निघालेल्या शटल ट्रेनच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेमुळे ट्रेनमध्ये काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. डेमू (DEMU) ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आग लागली त्याचवेळी एक प्रवासी आत होता. दुर्दैवाने दरवाजा लॉक झाल्यामुळे तो बाहेर पडू शकत नव्हता. काही वेळातच टॉयलेटमधून धूर बाहेर येऊ लागला आणि आतमधील व्यक्तीचा आरडा-ओरडा ऐकू येऊ लागला. हे लक्षात येताच गाडीत असलेल्या काही सतर्क प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्या दरवाज्याकडे धाव घेतली. यानंतर काही प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला.…

Read More