Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » माऊली व तुकोबांच्या पालखी सोहळ्यात सोन्याचे दागिने व मोबाईल चोरणाऱ्या 6 चोरट्यांना अटक; 23 लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

माऊली व तुकोबांच्या पालखी सोहळ्यात सोन्याचे दागिने व मोबाईल चोरणाऱ्या 6 चोरट्यांना अटक; 23 लाखांचा मुद्देमाल जप्त

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 24, 2025Updated:June 24, 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_0
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे :  संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये नागरिकांचे मोबाईल व महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय व परजिल्हयातील टोळीला पुणे शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 23 लाख 91 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चांदणी शक्ती कांबळे (वय ३२ , रा. मौलानी शाळेजवळ, गांधीनगर, उदगीर ता. उदगीर जि. लातुर ), रिटा ऊर्फ गंगा नामदेव कांबळे (वय ३५ वर्षे, रा. अंबिका कॉलनी, चंद्रमा देवी नगर उदगीर, ता. उदगीर, जि. लातुर), बबीता सुरज उपाध्ये (वय. ५७, रा. चंद्रमा देवी नगर, उदगीर, ता. उदगीर जि. लातुर), पुजा धिरज कांबळे (वय. ३५ , रा. भदाडे चौक, गांधीनगर उदगीर, ता. उदगीर जि. लातुर ), गणेश विलास जाधव (वय. ३० वर्षे, रा. बुशननगर झोपडपट्टी, आण्णासाहेब पाटील शाळेजवळ, सोलापुर मुळ रा. मु. पो. व्यागळी, ता. अक्कलकोट जि. सोलापुर), अरबाज नौशाद शेख (वय १९, रा. महाराजपुर, थाना तलझारी जि. साहेबगंज, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एका 17 वर्षीय विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेतले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. दर्शनाचे दरम्यान नागरिकांचे मोबाईल चोरीचे व चैन स्नॅचिंगचे गुन्हे घडत असतात. सदर गुन्हयांना प्रतिबंध होण्याकरीता अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांनी गुन्हे शाखा युनिट ०५ व युनिट ०६ पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांची नेमणुक केली होती.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखिले यांना चांदणी कांबळे, रिटा कांबळे, बबीता उपाध्ये, पुजा कांबळे व गणेश जाधव यांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन खाक्या दाखविल्या. तेव्हा त्यांच्याकडून सुमारे 19 लाख 41 हजार 310 रुपयांचे २२.५ तोळे वाजणाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तर हडपसर, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी पालखी सोहळ्या दरम्यान आरोपी अरबाज शेख व एका विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 4 लाख 50 हजार रुपये किंमतीचे १४ मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आले आहेत. तर आरोपींनी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक आशा तीन गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे. उर्वरीत मोबाईलच्या मुळ मालकांचा व सोन्याचे दागिन्यांच्या मुळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. पालखी सोहळा दरम्यान ज्या नागरीकांचे मोबाईल हॅण्डसेट किंवा ज्या महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने चोरीस गेलेले आहेत त्यांनी हडपसर व वानवडी ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन पुणे शहर पोलीसांकडुन आवाहन करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे युनिट पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार राजस शेख, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, बाळासाहेब सकटे, अकबर शेख, शेखर काटे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे, निलेश साळवे, सुहास डोंगरे, वैशाली इंगळे, ज्योती मुल्का, वैशाली खेडेकर, सारंग दळे, निर्णय लांडे व जावेद शेख यांच्या पथकाने केली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“‘झिपरे’ म्हणत कानफटात दिली ! महिला ट्रॅफिक पोलिसावर तीन तरुणींची तक्रार, व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ”
Next Article पुणे हादरलं, जुन्नरच्या कोकणकड्यावर सापडले तलाठी आणि महाविद्यालयीन तरुणीचे मृतदेह !
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

लोहगडावर अपघात नव्हे तर खून; भावी पत्नीने मित्राच्या मदतीने दरीत ढकलून केला खून.

June 23, 2026

साने चौकात कोयता गँगचा धुमाकूळ; तरुणावर जीवघेणा हल्ला, परिसरात दहशत.

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?