Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » “‘झिपरे’ म्हणत कानफटात दिली ! महिला ट्रॅफिक पोलिसावर तीन तरुणींची तक्रार, व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ”
महाराष्ट्र

“‘झिपरे’ म्हणत कानफटात दिली ! महिला ट्रॅफिक पोलिसावर तीन तरुणींची तक्रार, व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ”

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJune 24, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_0
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

लातूर :  रस्त्यावर ट्रिपल सीटने प्रवास करणाऱ्या तीन तरुणींना ‘झिपरे’ असे म्हणत शिवीगाळ करून कानफटात मारणं एका महिला ट्रॅफिक पोलिसावर महागात आलं आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संतप्त झालेल्या तरुणींनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत महिला पोलिसाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ही घटना लातूर शहरातील असून, आरोपी वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल प्रणिता मुसने या ड्युटीवर जात असताना त्यांनी स्कुटीवरून ट्रिपल सीट जात असलेल्या तीन तरुणींना रस्त्यात थांबवत अश्लील भाषेत शिवीगाळ केली व एका मुलीला कानफटात मारली. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ एका नागरीकाने शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला. पाहता पाहता तो व्हायरल झाला आणि वादाला तोंड फुटले.

तक्रारीनंतर कॉन्स्टेबल मुसने यांनी स्वतःहून स्पष्टीकरण देत व्हिडिओच्या माध्यमातून हात जोडून माफी मागितली. “मी एका आईसारखा राग व्यक्त केला. भावनेच्या भरात घडलेला प्रकार होता. मला ड्युटीवर जायचे होते आणि वर्दी घातली होती. मी कोणालाही मुद्दाम मारहाण केली नाही,” असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, या घटनेवरून नेटकऱ्यांमध्ये मतभेद दिसून आले. काहींनी तरुणींनी नियम तोडल्याने पोलीस कारवाई झाली, असे म्हणत मुसने यांना पाठिंबा दिला. तर अनेकांनी सार्वजनिक ठिकाणी पोलीस कर्मचारी महिलांवर अश्लील भाषेत बोलणे आणि मारहाण करणे हे पूर्णपणे चुकीचे असून, अशा कर्मचाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू असून संबंधित महिला कॉन्स्टेबलविरोधात वरिष्ठ पातळीवरून कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“योग करा, आरोग्यदायी जीवन जगा” — चिंचवडे लॉन्स येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य योग शिबिर उत्साहात संपन्न
Next Article माऊली व तुकोबांच्या पालखी सोहळ्यात सोन्याचे दागिने व मोबाईल चोरणाऱ्या 6 चोरट्यांना अटक; 23 लाखांचा मुद्देमाल जप्त
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफियांवर मोठी कारवाई; 47 लाखांचा मुद्देमाल जप्त.

May 22, 2026

३ वर्षीय चिमुकल्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीस जन्मठेप; पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांची उल्लेखनीय तपासकामगिरी.
२०१७ मधील पंतनगरमधील खळबळजनक प्रकरणाचा निकाल; ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयाचा कठोर निर्णय

April 18, 2026

आंबेनळी घाटात कार दरीत; बचाव पथकाकडून जखमींची थरारक सुटका.

March 12, 2026

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांचा शपथविधी.

January 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?