Author: shauryavartanews2025@gmail.com

|| प्रतिनिधी : प्रभु कांगणे || पुणे : सिक्युरिटी गार्डने सोसायटी मध्ये येताना एंट्री करायला सांगितल्याच्या कारणावरुन त्याचा साथीदार असलेल्याने खुन करुन पळून गेला होता. २६ मे २००९ मध्ये रहाटणी येथे झालेल्या या खुनानंतर आरोपी तब्बल १६ वर्षे फरार होता. पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने गोवा येथून जेरबंद केले. सुनिल अशोकराव कांगणे (वय ३९, रा. ओल्ड हेजिटेज मंगल कार्यालय, आकसी मार्केटजवळ सुलाभट, गोवा, मुळ रा. हिब्बट, पो. मोटरगा, ता. मुखेड, जि. नांदेड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. घटना घडली तेव्हा सुनिल कांगणे हा २८ वर्षाचा होता. त्याने सुभाष सोपान धाकतोंडे (वय ५५, रा. सिद्धार्थनगर, राहटणी) यांचा…

Read More

|| प्रतिनिधी : किरण अडागळे || लोणावळा : पोलीस दलातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाने लोणावळ्यात जाऊन आपलं जीवन संपवलं आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ एका झाडाला गळफास घेत त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. टायगर पॉईंटजवळच त्यांची कार सापडली असून त्यात एक डायरीही पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यातून आत्महत्येच्या कारणाचा खुलासा होऊ शकतो. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अण्णा गुंजाळ असं आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव असून त्यांनी नेमकी आत्महत्या का केली याबाबतचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून गुंजाळ कामावर गेले नव्हते. त्यांचा काहीच पत्ता नव्हता. फोन देखील लागत…

Read More

पिंपरी चिंचवड : रात्र झाली होती… घर शांत होतं… आई-वडील खालच्या मजल्यातील खोलीत झोपले होते. भाऊही नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत होता. पण, वरच्या मजल्यावर एका बंद दरवाजामागे, एका हसर्‍या चेहर्‍यामागे लपलेल्या खोल वेदना शेवटचा श्वास घेत होत्या. शिरीष महाराज मोरे… श्री संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज… हिंदुत्वाचा प्रचार करणारा, वारीचा अभिमान बाळगणारा, किल्ले भ्रमंती करणारा एक तेजस्वी तरुण. पण, त्याच्या मनाचा किल्ला मात्र कोसळला होता. महाराजांनी टेबलावर बसून पेन उचललं. हात थरथरत होते. शब्द फुटत नव्हते. पण, भावनांची दाटी झाली होती. चार चिठ्ठ्या… आई-वडील, बहीण, मित्र आणि होणार्‍या पत्नीच्या नावाने. त्यात कधी शब्दांचं आवर्तन होत होतं, तर कधी अश्रूंची ओल…

Read More

पैठण : पैठण तालुक्यातील नवगाव येथे शेतातील रस्त्याच्या वादातून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना गुरुवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली. कृष्णा जनार्दन साटोटे (वय ३२) रा. नवगाव ता. पैठण, असे तरूणाचे नाव आहे. तालुक्यातील नवगाव येथील मृत कृष्णा जनार्दन साटोटे, अमोल कल्याणराव साटोटे, सुरेश अनंतराव चौधरी, ज्ञानदेव रामा साटोटे यांचा बाबासाहेब काशिनाथ ससाणे रा. तुळजापूर ता.पैठण यांच्याशी शेतातून रस्ता काढण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. या वादातून दोन्ही गटांमध्ये मारामारी झाल्याने बाबासाहेब ससाणे यांनी पैठण पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यामुळे कृष्णा साटोटे याच्यासह पाच जणाविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान,…

Read More

तुम्ही भारतामध्ये कोणत्याही गावात, शहरामध्ये जा, तुम्हाला एक गोष्ट पाहायला भेटते ती म्हणजे, तुम्ही जर गाडी चालवत असाल आणि त्या परिसरामध्ये कुत्रे असेल तर ते तुमच्या गाडीमागे पळते. इतरांच्या वाहनामागे देखील धावते. मात्र आश्चर्याची बाब ही आहे की तुम्ही रस्त्यानं चालले असाल तर काहीवेळा अपवाद वगळता कुत्रे तुमच्या मागे धावत नाही.काही वेळेला तर कुत्रे गाडीचा काही किलो मीटरपर्यंत देखील पाठलाग करतात. कुत्रे पाठिमागे धावल्यानं अनेकदा बाईकचा अपघात देखील होतो. साहाजिकच तुम्हालाही अनेकदा असा प्रश्न पडलाच असेल की कुत्रे बाईकमागे का धावतात? आज आपण त्याचं उत्तर जाणून घेणार आहोत. कुत्रे तुमच्या गाडीमागे का पळतात त्या मागे असं काही निश्चित कारण…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : त्याच बरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने केलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सुद्धा दुपारी 12 वाजता जाधववाडी येथील CNG पेट्रोल पंपासमोर होणार आहे. या कार्यक्रमासाठी *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंपदामंत्री राधकृष्ण विखे पाटील, गृह निर्माण ( शहरी ) राज्यमंत्री योगेश कदम* हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. *या कार्यक्रमाचे होणार भूमिपूजन* * पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय इमारत , * महाळुंगे औद्योगिक पोलिस संकुल, * देहूरोड पोलिस विश्रामगृह, * पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालया भूमिपूजन * पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मध्यवर्ती अग्निशमन केंद्र…

Read More

लोणावळा : पुणे ग्रामीण पोलीस दलाचे वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांना दिनांक ३१/१/२०२५ रोजी सायंकाळी बातमीदार मार्फत बातमी मिळाली की लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील श्री संतोष बोत्रे यांच्या पडीक जमिनीमध्ये झाडाचे खाली काही इसम कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच पोलीस पथक व पंचाना बातमीचा आशय सांगून छापा टाकला असता सदर ठिकाणी 1) गोरख रघूनाथ मोहीते, वय 65 वर्षे, रा. टाकवे खुर्द, ता. मावळ, जि.पुणे, 2) सुनिल आप्पा बंडगर, वय 30 वर्षों, रा.न-हेगाव ता हवेली जि पुणे मुळ रा काश्टी ता…

Read More

|| प्रतिनिधी : आशुतोष कातवरे || लोणावळा : अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात व जुगार अड्ड्यावर कारवाई करत केले वेगवेगळे ३ गुन्हे दाखलपु णे ग्रामीण पोलीस दलाचे वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांना दिनांक २२/१/२०२५ रोजी पहाटे लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जी वार्ड लोणावळा येथे इसम नामे ताबान जायर पठाण वय २८ रा जी वार्ड इराणी चाळ हा मेफेड्रॉन पावडर (एम डी) ची ओळखीच्या लोकांना विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी लागलीच पंच व पोलीस पथकासह बातमी मिळाले ठिकाणी छापा टाकला असता इसम नामे ताबान पठाण याच्या अंगझडतीमध्ये…

Read More

निगडी : पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात बिबट्या शिरला आहे. निगडी प्राधिकरणात बिबट्या वावरत असल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. शहरातील मुख्य नागरिक वस्ती परिसरात दिवटे शिरल्याने नागरिकां मध्ये मोठ भीतीच वातावरण आहे स्थानिक नागरिकांनी बिबट्या याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल झाली आहे

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (अर्थसंकल्प 2025) सादर केला, ज्यामध्ये मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला. नोकरदार वर्गाला 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही आयकर भरावा लागणार नाही. त्याच वेळी, स्टँडर्ड डिडक्शनसह, 12.75 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. नवीन कर प्रणालीमध्ये केलेल्या बदलांनुसार, 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 80,000 रुपयांची कर सूट मिळणार आहे. त्यांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही. याचा अर्थ असा की 8 ते 10 लाख रुपये कमावणारे लोक, जे नवीन कर प्रणालीमध्ये 10% कराच्या कक्षेत येतात, त्यांना संपूर्ण रकमेतून सूट मिळू शकेल. जर 12 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार असेल…

Read More