- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: shauryavartanews2025@gmail.com
चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश बालक मंदिर, चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविणारा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर “ज्ञानोबा-तुकाराम” यांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रमाची सुरुवात शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्राचार्य मा. श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली. यावेळी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी मा. ॲड. श्री. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत वारकरी संप्रदायातील श्रद्धा, भक्ती, संस्कार आणि समतेचा संदेश आपल्या जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले. सोहळ्यात विद्यार्थ्यांनी…
पिंपरी-चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे माजी मानद सचिव तसेच पिंपरी-चिंचवडचे पहिले स्काऊट कमिशनर स्व. श्रीमान शंकरलालजी जोगीदासजी मुथा यांच्या १७ व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या स्काऊट पथकाने स्व. मुथा यांच्या प्रतिमेस मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. मुथा यांच्या प्रतिमेचे पूजन करून नवकार महामंत्र व ‘ॐ नमः शिवाय’ जप करण्यात आला. संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड. राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा, सहाय्यक सेक्रेटरी प्रा. अनिलकुमार मोतीलाल कांकरिया, कार्यकारिणी सदस्य प्रकाशचंद बंब व जयकुमार धोका यांच्या हस्ते विविध स्पर्धा दालनांचे उद्घाटन करण्यात आले.…
पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या अत्यंत संवेदनशील आणि राज्यभर संतापाची लाट उसळविणाऱ्या प्रकरणाचा निकाल गुरुवारी (दि. २५ जून) जाहीर होणार आहे. अवघ्या पावणेदोन महिन्यांच्या कालावधीत तपास, आरोपपत्र दाखल करणे आणि न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाल्याने हा खटला महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्यांपैकी एक मानला जात आहे. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आता आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला न्यायालय कोणती शिक्षा सुनावते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र दिनी…
लोणावळा, दि. 23 जून : लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचे सुरुवातीला समोर आले होते. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या सखोल तपासात हा अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात मृत तरुणाची होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केतन विशाल अगरवाल (वय 25, रा. गहुंजे, ता. मावळ) याचा मृतदेह 18 जून रोजी लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला झुडपांमध्ये आढळून आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या सिया प्रविण गोयल (वय 20, रा. मार्केट यार्ड, पुणे) हिने किल्ला फिरत असताना केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिस…
लोहगड : लोहगड किल्ल्यावरून पडून झालेला मृत्यू अपघात नसून नियोजित खून असल्याचे धक्कादायक वास्तव पोलिस तपासातून समोर आले आहे. होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगडावर गेलेल्या केतन विशाल अग्रवाल (वय 26, रा. गहुंजे) यांचा दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला जोरदार वाऱ्यामुळे तोल जाऊन ते दरीत पडल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासात केतन यांची भावी पत्नी सिया प्रवीण बसेसर गोयल आणि तिच्या मित्राने मिळून त्यांना दरीत ढकलून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन आणि घटनास्थळावरील परिस्थितीचे बारकाईने विश्लेषण केले. त्यातून हा अपघात नसून खून असल्याचा संशय बळावला. त्यानंतर सिया गोयल…
पिंपरी-चिंचवड : चिखली परिसरातील साने चौक येथे शनिवारी (दि. 21) सायंकाळी कोयता गँगने पुन्हा दहशत माजवत एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. पूर्वीच्या भांडणाच्या रागातून आरोपींनी तरुणाच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक ऊर्फ बाबू ननावरे (वय 24, रा. सुदर्शन नगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सिद्धार्थ धाईजे (वय 21), शिवशंकर श्रीमंगल (वय 20) व त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरसिंह ऑटो गॅरेज व जय अंबे इलेक्ट्रिकल्सजवळ झालेल्या या हल्ल्यात आरोपींनी फिर्यादीवर कोयत्याने सपासप वार केले. तसेच फिर्यादीचा मित्र ऋतिक कसाळकर यालाही मारहाण करण्यात आली.…
लोहगड : लोहगड किल्ल्यावर पत्नीसमवेत फिरण्यासाठी आलेल्या 25 वर्षीय तरुणाचा पाय घसरून सुमारे 250 फूट खोल दरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 18 जून) सकाळी घडली. मृत तरुणाचे नाव केतन विशाल अगरवाल (वय 25) असे असून ते प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचे पुत्र होते. मिळालेल्या माहितीनुसार, केतन अगरवाल हे पत्नीसमवेत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आले होते. सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा पाय घसरून ते किल्ल्याच्या दक्षिण बाजूला असलेल्या सुमारे 250 फूट खोल दरीत कोसळले. या घटनेची माहिती सकाळी 10.45 वाजता लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळताच शिवदुर्ग रेस्क्यू टीमने तातडीने बचाव पथक तयार करून घटनास्थळी रवाना केले. तसेच…
पिंपरी-चिंचवड : वाल्हेकरवाडी परिसरात कार रस्त्यात का थांबवली, याबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचे संचालक व प्रशिक्षक यांना मारहाण केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शरद सुभाष भोसले (वय ३५, रा. ग्रीन पार्क सोसायटी, जिजामाता चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश राजू शिंदे (वय २२), प्रविण बडे (वय २४), सागर अनिल गावडे (वय २६), हितेश सुधीर चौधरी (वय २२) आणि तेजस हगवणे (वय २०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जून २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास…
पिंपरी-चिंचवड : रावेत परिसरातील एका स्पा सेंटरचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत स्पा व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रावेत पोलिसांनी दोन नामनिर्देशित आरोपींसह अन्य दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक ज्योतीराम कोल्हापुरकर (वय ३८, रा. म्हाळुंगे) हे रावेत येथील मस्के वस्ती परिसरात स्पा सेंटर चालवतात. आरोपी स्वाती गायकवाड आणि विष्णू सुरवसे (रा. हडपसर) व इतर दोन अनोळखी व्यक्तींनी स्पा सेंटरमध्ये परवानगीशिवाय प्रवेश करून तेथील व्हिडीओ चित्रित केले. त्यानंतर हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत स्पा सुरू ठेवायचा असेल तर पैसे द्यावे लागतील, अशी मागणी केली.…
पुणे : शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शेषनागाच्या विविधरंगी पुष्पप्रतिमांची भव्य सजावट करण्यात आली. शेषनागाच्या प्रतिकृतींमध्ये विराजमान झालेल्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय दर्शन घेण्यासाठी गुरुवारी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली. गाणपत्य संप्रदायात महत्त्वाचे स्थान असलेल्या शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे ३ वाजता ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर पहाटे ४ वाजता विदुषी शैला दातार यांनी स्वराभिषेकातून गणरायाच्या चरणी स्वरसेवा अर्पण केली. याशिवाय दिवसभर अभिषेक आणि गणेश यागाचेही आयोजन करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील…