Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
पुणे

पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे खरे ‘दादा’ हरपले ! अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर शोककळा – आमदार शंकर जगताप.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJanuary 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड : “आपली जन्मभूमी बारामती असली तरी माझी कर्मभूमी पिंपरी-चिंचवड आहे,” असे निक्षून सांगणारे आणि पिंपरी-चिंचवड शहरावर पुत्रवत प्रेम करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली झालेले अपघाती निधन मनाला चटका लावून जाणारे आहे,” अशी भावना आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे ते खरे ‘दादा’ होते असेही आमदार जगताप पुढे म्हणाले.

आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले, “अजित पवार हे केवळ ज्येष्ठ नेते नव्हते, तर चणाक्ष राजकारणी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि प्रशासकीय कारभाराचा दांडगा अनुभव असलेले कर्तबगार नेतृत्व होते. अशा व्यक्तिमत्त्वाचे आपल्या मधून जाणे हे केवळ पिंपरी-चिंचवडसाठी नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रासाठी मोठी पोकळी निर्माण करणारे आहे.”

१९९२ ते आजतगायत् सातत्याने या शहराबरोबर अजितदादांचा स्नेह जोडलेला होता. “पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीचे, प्रगतीचे आणि विकासाच्या वाटचालीचे ते खरे शिल्पकार होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आमचे वडीलबंधू दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत तब्बल तीस वर्षे शहरासाठी काम केले. शहराचा कायापालट करण्यासाठी झपाटून काम करणारी ही दोन व्यक्तिमत्त्वे होती. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी व्यथित करणारी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

आमदार जगताप पुढे म्हणाले, “अजित दादांसारखे धडाडीचे, निर्णयक्षम आणि झपाटून काम करणारे नेतृत्व पुन्हा तयार होण्यासाठी मोठा कालावधी लागतो. असा नेता पुन्हा होणे शक्य नाही . या शहरातील प्रत्येक कार्यकर्ता, नेता, पदाधिकारी यांचा अजित दादांशी स्नेह होता, ऋणानुबंध होते. राजकारणातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम करणारे ते व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही,” असेही त्यांनी भावुक शब्दांत सांगितले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रात ३ दिवसाचा दुखवटा, आज शासकीय सुट्टी जाहीर; CM देवेंद्र फडणवीस गहिवरले.
Next Article दादांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार; मोदी-शाह उपस्थित राहणार.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

सागर मारणे यांच्या पाठपुराव्याला यश; मुळशीतील शाळेलगतच्या MBBM कंपनीच्या प्रदूषणाची MPCBकडून चौकशी.

August 8, 2026

मिसिंग लिंक बोगद्यात फॉर्च्युनरचा भीषण अपघात; वाकडच्या युवा उद्योजकाचा मृत्यू.

August 7, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.

June 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?