- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: shauryavartanews2025@gmail.com
|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे || पंढरपूर : पंढरपूर शहरात पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मटन मार्केट ते अंबाबाई पटांगण दरम्यानच्या नवीन पुलावर रात्री अंदाजे नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. नारायण कोंडीबा बुरांडे (रा. तारापूर) हे आपल्या गावाकडे जात असताना गाडीचा कट घेण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला आणि मागून येणाऱ्या डिझेल टँकरच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासोबत असलेली एक तरुणी देखील जखमी झाली असून तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातावेळी पाऊस सुरू होता. मोठ्या पावसामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने शव वाहक वाहन घटनास्थळी वेळेवर पोहोचू शकले नाही. डिझेल टँकर…
मुंबई : अहमदाबाद विमान दुर्घटनेत एअर इंडियाच्या (Air india) बोईंग 171 फ्लाईटमधील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुदैवाने 1 प्रवासी बचावला आहे. अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटनेनं देश शोकसागरात बुडाला असून 241 प्रवाशांच्या कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे. एअर इंडिया ही कंपनी टाटा ग्रुपने (Tata) घेतल्याने या विमान दुर्घटनेनंतर टाटा ग्रुपकडूनही दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि सामाजिक जाणीव ठेऊन टाटा ग्रुपने विमान दुर्घटनेतील (ahmedabad plane crash) जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींचा वैद्यकीय खर्च देखील टाटा ग्रुपकडूनच करण्यात येणार असून आवश्यक ती सर्व काळजी आणि…
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || चिंचवडे नगर : दगडोबा चौक परिसरात भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आज शेखर अण्णा चिंचवडे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीत त्यांनी विक्रेत्यांशी संवाद साधत काही महत्त्वाचे मार्गदर्शन केले. शेखर अण्णा यांनी स्पष्टपणे सांगितले की, ज्यांच्याकडे वैध लायसन्स आहे आणि जे विक्रेते दगडोबा चौक परिसरातच राहतात, त्यांनीच येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करावा. शिवनगरी , बिजलीनगर, वाल्हेकर वाडी या परिसरातील व्यक्तींनी आपल्या-आपल्या भागातच व्यवसाय करावा. त्यांनी सांगितले की, “जर प्रत्येकाने आपल्या भागातच व्यवसाय केला, तर कोणत्याही कुटुंबाला त्रास होणार नाही. उलटपक्षी, प्रत्येक भागात विक्रेत्यांना संधी मिळेल व स्थानिक नागरिकांनाही सहजपणे भाजीपाला उपलब्ध होईल. यामुळे परस्पर हितसंबंध…
पुणे : गंगाधाम चौकात गतवर्षी ट्रकने दोन महिलांना चिरडले होते. त्यात एका महिलेचा बळी गेला होता. त्यानंतर बुधवारी पुन्हा एका महिलेचा बळी गेला. या चौकातील अशा जीवघेण्या दुर्घटनांना नेमके कोण जबाबदार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. गेल्या वर्षी दुर्घटनेनंतर नागरिकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विविध पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून अवजड वाहनांवरील बंदीची अंमलबजावणी करून वाहतूक सुरक्षित करण्याची मागणी केली. खासदार मेधा कुलकर्णी यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले होते. यानंतरही महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई झालेली नाही. त्यामुळे महिलेच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण? असा जाब नागरिकांनी प्रशासनाला…
📌 शुभेच्छुक : शौर्य वार्ता न्यूज परिवार { संपादकीय : दिलीप सोनकांबळे } आपल्या आजूबाजूला अशी काही तरुण मंडळी असतात, ज्यांचं विचारचक्रच वेगळं असतं. अशाच धाडसी, वेगळ्या वाटेवरून चालणाऱ्या आणि स्वतःचा स्वतंत्र मार्ग शोधणाऱ्या व्यक्तिमत्त्वात नाव ठरावं – अरविंद श्रीधर भोंगळे. कधी बँजोवर संगीताची मैफल रंगवणारा, शिक्षणाच्या प्रवासात नेहमीच नवे वळण घेणारा, आणि आयुष्यात संधी मिळाल्यावर त्याचं सोनं करणारा हा तरुण, आज दोन कंपन्यांचा यशस्वी संचालक आहे. कुणाला वाटलं असेल की हा ‘वेडा पोरगा’ वाट चुकला आहे, पण वास्तवात तो आयुष्याचं नवं परिमाण शोधणारा एक कर्तबगार उद्योजक ठरला. आज अरविंद भोंगळे हे केवळ यशस्वी उद्योजकच नाही, तर शौर्य वार्ता न्यूज…
पिंपरी चिंचवड : एक व्हिडीओ ज्याने सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेतलं. व्हिडीओमध्ये एका झाडाच्या खोडातून पाणी वाहताना दिसत आहे. अचानक झाडाच्या खोडातून पाणी वाहू लागल्याने लोकांना तो चमत्कार वाटला आणि पूजा करायला सुरूवात झाली. लोकांनी झाडाला हार घातले. पाया पडायला गर्दी होऊ लागली. पण, जेव्हा झाडातून पाणी वाहण्याचे कारण शोधण्यात आले. तेव्हा कथित चमत्काराचं पितळ उघडं पडलं. सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय, तो आहे पिंपरी चिंचवड शहरातील. प्रेमलोक पार्कमध्ये रस्त्याकडेला एक झाड आहे. त्या झाडाच्या खोडातून अचानक पाणी येऊ लागले. झाडाच्या खोडातून पाणी येत असल्याचे पाहून लोकांना तो चमत्कार वाटला. अंधश्रद्धेचा कळस, लोकांनी झाडाची केली पूजा अचानक झाडातून…
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी चिंचवड : अजंठा नगर येथील रहिवासी यास्मीन जमील पठाण यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज सादर करत, माजी नगरसेवक विश्वास गजरमल व त्यांच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दिनांक ०१ जून २०२५ रोजी रात्री यास्मीन पठाण यांचे पती जमील अब्दुल पठाण यांच्यावर माझी नगरसेवक विश्वास गजरमल व त्यांच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केला. आरोपींमध्ये विजय धेंडे, राहुल साळुंखे, भैय्या उर्फ बाबासाहेब गजरमल, दत्ता गायकवाड, अज्जू महाकाली, अशीफ शेख व अन्य पाच-सहा गुंडांचा समावेश असल्याचा आरोप यास्मीन पठाण यांनी केला आहे. पीडितांचे म्हणणे आहे की,…
|| प्रतिनिधी : क्षितिजा देव || पुणे : सेल्समनने सोन्याची चोरी करुन सराफी पेढीला घातला तब्बल 4 कोटी 58 लाख रुपयांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्समधील सेल्समनचा हा प्रताप आहे. विश्रामबाग पोलिसांनी सेल्समनला अटक केली आहे. दोन महिन्यात सेल्समनने सराफी दुकानातील अंगठी, कॉइन, वेडणी असे तब्बल 4 कोटी 58 लाख 13 हजार 679 रुपयांचे सोने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत नितीन इरप्पा डांगे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी प्रतिक नगरकर याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक हा नीलकंठ ज्वेलर्स या सराफी दुकानात कामाला होता. त्याच्याकडे…
भावाच्या घरी जायला निघाली, वाटेत बसची जोरदार धडक, मामाचा मृत्यू, माय-लेक जखमी, रायगडमध्ये भीषण अपघात
|| प्रतिनिधी : राजेश वाइकर || रायगड : रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका ही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. माणगाव येथील मुंबई-गोवा महामार्गावरील गुरुकृपा हॉटेलसमोर भरधाव खाजगी बसने एका प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात एका वृद्धाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला असून दोन अल्पवयीन मुलींसह एक महिला जखमी झाली आहे. ही घटना 2 जून 2025 रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कालिदास बाबुराव कोकरे (रा. कुभारमाट ता मालवण. जि. सिंधुदुर्ग) हा खासगी ट्रॅव्हल्सवर चालक म्हणून कार्यरत असून तो मुंबई येथून खासगी ट्रॅव्हल्स बस घेऊन सायंकाळच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या दिशेने…
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी-चिंचवड : अवघ्या दीड वर्षांची निरागस चिमुरडी गॅलरीतून पडून मृत्युमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना 31 मे 2025 रोजी किवळे येथील पटेल रेसिडेन्सी येथे घडली. मृत मुलीचे नाव निरवी जगदीश नाकरानी असून ती आई-वडिलांसोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेली होती. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास, फ्लॅट पाहत असताना आठव्या मजल्यावरील गॅलरीतून निरवीचा तोल गेला आणि ती थेट खाली कोसळली. अपघातानंतर तिला तातडीने उपचारासाठी सूर्या हॉस्पिटल, वाकड येथे नेण्यात आले. मात्र दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. निरवीचे वडील जगदीश नाकरानी हे सप्तर्षी सोसायटी, वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे राहत असून मुलगी आई-वडिलांसोबत फ्लॅट पाहण्यासाठी किवळे येथे…