Author: shauryavartanews2025@gmail.com

पिंपरी चिंचवड : (प्रतिनिधी : शुभम जाधव ) पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने धाडसी कारवाई करत २४ गंभीर गुन्ह्यांमध्ये वांछित असलेल्या कुख्यात सराईत गुन्हेगार गणेश उर्फे “मॅड गण्या” कांबळे (वय २४, रा. भाटनगर, पिंपरी) याला जेरबंद केले. त्याच्याकडून दोन देशी बनावटीच्या पिस्टल, दोन जिवंत काडतुसे व धारदार शिकारी चाकू जप्त करण्यात आले. श्रेणी पोलिस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी व पोलिस हवालदार देवा राऊत यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक सराईत गुन्हेगार कमरेला पिस्टल लावून निराधारनगर परिसरात फिरत आहे. माहिती खात्रीशीर असल्याचे दिसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना करण्यात आले. निराधारनगर परिसरात पोलिसांनी सापळा रचला असता, आरोपी गणेश उर्फे…

Read More

|| पंढरपूर प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे || पंढरपूर : पंढरपूर शहरातील शिंदे-नाईक नगर, कुंभार गल्ली येथे दिनांक १७ जुलै रोजी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाला आज ४५ दिवस उलटून गेले आहेत. माय–लेकरांचा निर्घृण खून होऊनही आरोपींचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. तपास ठप्प असल्यामुळे संपूर्ण पंढरपूर तालुका हादरलेला असून पोलिस यंत्रणेवर संशयाची छाया आहे. या हत्याकांडातील जगताप कुटुंब आजही भीतीच्या सावटाखाली दिवस काढत आहे. “आमच्यावरही लपून-छपून हल्ला होईल, अशी भीती कायम आहे. पोलिसांकडे चौकशीसाठी गेल्यावर फक्त ‘तपास सुरू आहे’ अशीच उडवाउडवीची उत्तरे मिळतात,” अशी तक्रार संजय जगताप यांनी व्यक्त केली. तसेच, “न्याय हवा असेल तर या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत व्हावी,” अशी मागणीही त्यांनी…

Read More

|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे || पंढरपूर :  मागील काही महिन्यांपासून पंढरपूर शहर व तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. पोलिसांच्या कमालीच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगार पुन्हा डोके वर काढत असून नागरिक भयभीत झाले आहेत. कुणाचे हाणामाऱ्यांचे आरोपी मोकाट फिरत आहेत, तर शहरातील ट्रॅफिक जाम, रस्त्यावरील अतिक्रमणे आणि डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. कुंभार गल्लीतील आई-मुलाच्या निर्घृण खुनाच्या प्रकरणातील आरोपी आजतागायत हाती लागले नाहीत. विजेच्या प्रखर प्रकाश आणि आवाजामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला, मात्र अद्याप संबंधितांवर कारवाई झालेली नाही. दरम्यान, खुनातील आरोपीस जामीन मिळाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात जल्लोष केला. शहरातील मिरवणुकांमध्ये आरोपींचे फोटो झळकवले जात आहेत.…

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी चिंचवड : आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी न्यू इंग्लिश स्कूल आणि आबासाहेब चिंचवडे कनिष्ठ महाविद्यालय येथे 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. राष्ट्रध्वजाला सलामी देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गायले आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या निमित्ताने शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. विशेष म्हणजे लहान मुलांनी दिलेली देशप्रेमाने ओथंबलेली भाषणे सर्वांचे लक्ष वेधून घेतली. त्यांच्या ओजस्वी शब्दांनी उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानाचे आणि आनंदाचे अश्रू तरळले. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सेनानींचा संघर्ष, त्याग आणि…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी-चिंचवड : स्वातंत्र्य, एकता आणि देशभक्तीचा संदेश देणाऱ्या देशभक्ती गीतांच्या सुरांनी दगडोबा चौक दुमदुमून गेला. दगडोबा चौक व्यापारी संघटना आणि लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे ७९वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण सोहळ्याने झाली. मान्यवर शेखर अण्णा चिंचवडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत, “स्वातंत्र्य ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे, ती जपणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे,” असा संदेश दिला. यानंतर लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य, भाषणे आणि रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे…

Read More

पिंपरी चिंचवड : ( प्रतिनिधी : अमोल बेडके ) पिंपरी मार्केट येथे भरदिवसा दुकानात घुसून व्यापाऱ्याला गोळी घालून सोन्याची चैन हिसकावणारा आणि तीन वाहन चोरीचे गुन्हे करणारा रवी पुजारी टोळीतील कुख्यात आरोपी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाच्या हाती लागला. पोलिसांनी तब्बल ७०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपीपर्यंत पोहोचत उल्लेखनीय कामगिरी बजावली. पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, १ ऑगस्ट रोजी दुपारी ओमकार जनरल स्टोअर्स, पिंपरी येथे आरोपीने ‘फ्रुटी’ मागण्याच्या बहाण्याने गळ्यातील सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रयत्न केला. चैन न तुटल्याने आरोपीने पिस्टल दाखवून धमकावत पुन्हा ओढली. यावेळी उर्वरित चैन मिळवण्यासाठी त्याने व्यापाऱ्याच्या पायावर गोळी झाडून गंभीर जखमी केले. घटनेनंतर पोलिस आयुक्त…

Read More

पंढरपूर प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील आमदार समाधान दादा आवताडे यांचे कट्टर समर्थक व समाजसेवक आकाश डांगे यांनी गाव वर्गणीतून एका गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या अकरा वर्षीय मुलीस आर्थिक मदत केली. मिरज येथील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेली ही मुलगी नंदेश्वर येथील रहिवासी आहे. आजाराची माहिती कळताच आकाश डांगे यांनी गावातील नागरिक, व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून जनसंपर्क साधून निधी उभारला. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांना भेट देऊन आमदार समाधान दादा आवताडे यांच्या सहकार्याने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. एका गरीब कुटुंबातील मुलीस गावातून उभारलेली ही मदत पोहोचविल्याबद्दल सर्वत्र आकाश डांगे यांच्या समाजकार्याचे कौतुक होत आहे.

Read More

गडचिरोली, चामोर्शी (प्रतिनिधी : प्रशांत शाहा)  रक्षाबंधन म्हणजे केवळ घरातील भावाला राखी बांधण्यापुरते मर्यादित नाही, तर हृदयाने जोडलेले नातेही तितकेच महत्त्वाचे असते, याचा सुंदर प्रत्यय चामोर्शी तालुक्यातील वाकडी गावातील आदितीने दिला आहे. बारावीची विद्यार्थिनी असलेली आदिती दररोज चामोर्शी येथे शिक्षणासाठी एसटी बसने प्रवास करते. शाळेत जाताना तिची सुरक्षितता, वेळेवर पोहोच आणि प्रेमळ काळजी घेणाऱ्या बस चालक व वाहकाला ती आपले “मोठे भाऊ” मानते. या रक्षाबंधनाच्या दिवशी आदितीने नेहमीप्रमाणे शाळेकडे जाणाऱ्या प्रवासातच, एसटी बसमध्ये उभे राहून चालक व वाहक यांच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधली. हसऱ्या चेहऱ्याने दिलेली ती राखी आणि त्यासोबतचा भावनिक क्षण पाहून बसमधील सर्व प्रवासी भारावून गेले. हा उपक्रम…

Read More

गडचिरोली चामोर्शी : तालुक्यातील रेगडी गावात रविवारी दुपारच्या सुमारास मासेमारीसाठी गेलेले रामा गोटा (रा. रेगडी) यांचा दुर्दैवीरीत्या तलावात बुडून मृत्यू झाला. रामा गोटा हे त्यांच्या घरातील एकमेव कर्ता पुरुष होते. त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. रामा यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे लक्षात येताच रेगडी येथील बजरंग दल शाखेच्या कार्यकर्त्यांनी तत्परतेने मदतीचा हात पुढे केला. रामा गोटा यांच्या अंतिम संस्काराची जबाबदारी उचलत त्यांच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी कुटुंबाचे सांत्वन करून त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची ग्वाही दिली. या उपक्रमात भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ शाहा, बजरंग…

Read More

चिंचवड : सकाळी शाळेच्या प्रांगणात देशभक्तीच्या गीतांचा नाद घुमत होता… तिरंगा फडकत होता… आणि प्रत्येक चेहऱ्यावर देशप्रेमाचा तेजोमय उत्साह झळकत होता. श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज, चिंचवड येथे आज (शुक्रवार) क्रांती दिनाच्या औचित्याने क्रांती सप्ताहाचा समारोप भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. यावेळी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी राजेंद्रकुमारजी मुथा व सहाय्यक सेक्रेटरी अनिलकुमारजी कांकरिया यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश दिला. उपविख्याध्यापिका मनीषा जैन यांनी प्रास्ताविक करत आठवडाभर चाललेल्या क्रांती सप्ताहातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या वेशभूषेत रंगून त्यांचा संघर्ष, त्याग आणि शौर्य…

Read More