Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

सागर मारणे परिवाराचा माणुसकीचा दिवा; उरवडेतील सुरक्षा व स्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी केली गोड!

November 7, 2026

“रावेतमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प नकोच! नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचा महापालिकेला इशारा”

October 28, 2026

स्मार्ट सिटीमध्ये सांडपाण्याचा त्रास!”शाळा आणि मंदिराजवळ सांडपाणी” वाल्हेकरवाडीत आठ दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर; नगरसेवक गप्प का?”

October 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
सामाजिक

“गौरीचे आगमन आणि निसर्गाची आरती — महिलांनी झाडांवरील खिळे काढून दिला संवेदनशीलतेचा संदेश”

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comSeptember 1, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : क्षितिजा देव ): गणेशोत्सवानंतर गौरीचे मंगल आगमन झाले. घराघरांत देवीचे आगमन होऊन वातावरण भक्तिभावाने उजळते, तसेच निसर्गालाही आपली देवी-देवता मानून जपले पाहिजे, या संदेशाने स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान आणि अंघोळीची गोळी संस्था यांच्या वतीने ‘खिळेमुक्त झाडं’ हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे महिलांनी एकत्र येऊन झाडांवर ठोकलेले खिळे व स्टेपलर पिन काढल्या. एकूण २० झाडांना खिळेमुक्त करून तब्बल ५० पेक्षा अधिक खिळे व पिना काढण्यात आल्या. झाडांची साफसफाई करून महिलांनी त्यांच्या पायाशी नैवेद्य ठेवला, पूजा केली आणि आरतीही म्हटली. त्यामुळे परिसर भक्तिभाव, श्रद्धा आणि निसर्गप्रेमाने उजळून निघाला.

संस्थेच्या अध्यक्षा निर्मला जगताप म्हणाल्या, “झाडांनाही जीव असतो. आपण दररोज तुळशीला पाणी घालतो तसेच झाडांचीही पूजा केली पाहिजे. झाडांना खिळे ठोकणे म्हणजे त्यांच्या जिवाला इजा करणे होय. आपण त्यांच्यावर जाहिरातींचे बोर्ड लावतो, पिन ठोकतो पण यामुळे झाडे हळूहळू कोमेजतात. म्हणूनच या सणाच्या निमित्ताने झाडांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.”

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये झाडांबद्दल संवेदनशीलता निर्माण झाली. महिलांनी गौरीप्रमाणेच झाडांनाही आईचे स्वरूप देत त्यांची आरती केली. “गौरीचे आगमन झाले की घर आशीर्वादाने भरते, तसेच झाडांचेही आपल्या जीवनात आगमन झाले तरच हवा, पाणी व सावली यांचे वरदान आपल्याला लाभेल,” असा संदेश महिलांनी दिला.

या उपक्रमात उर्मिला चवरे, अनिता धाक्रस, जयश्री वीरकर, कमल टोणगे, अजित जाधव तसेच अंघोळीची गोळी संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे उपक्रमाला धार्मिक आणि पर्यावरणपूरक असे आगळे-वेगळे स्वरूप लाभले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदेहूरोड परिसरात डंपरची धडक बसून दुचाकीस्वार ठार; बंदी असतानाही जड वाहनांची वर्दळ
Next Article जय हनुमान गणेशोत्सव मंडळ भटुंबरे–९९९ : होम मिनिस्टर स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

नगरसेविका पल्लवीताई वाल्हेकर यांच्या पुढाकारातून वाल्हेकरवाडीत वृक्षारोपण; हरित भविष्यासाठी नागरिकांचा सामूहिक संकल्प.

June 8, 2026

माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांच्याकडून फुगेवाडीतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

June 6, 2026

वादळी पावसाचा तडाखा; विकास नगरात झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत — नगरसेवक निलेश तरस यांची तत्पर धाव.

March 31, 2026

गड-किल्ल्यांवरील बचाव कार्यकर्त्यांचा सन्मान; चार अत्याधुनिक ‘स्केड स्ट्रेचर’चे वितरण.

March 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
मुळशी

सागर मारणे परिवाराचा माणुसकीचा दिवा; उरवडेतील सुरक्षा व स्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी केली गोड!

By shauryavartanews2025@gmail.comNovember 7, 20260

मुळशी तालुक्यात गेल्या १० वर्षांपासून सामाजिक उपक्रमाची परंपरा कायम; कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटवस्तूंचे वाटप उरवडे (ता.…

“रावेतमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प नकोच! नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचा महापालिकेला इशारा”

October 28, 2026

स्मार्ट सिटीमध्ये सांडपाण्याचा त्रास!”शाळा आणि मंदिराजवळ सांडपाणी” वाल्हेकरवाडीत आठ दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर; नगरसेवक गप्प का?”

October 27, 2026

स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत पत्राशेडचे पेव? दगडोबा चौकात भंगार दुकान सुरू; महापालिका कारवाई करणार का?

October 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?