पिंपरी प्रतिनिधी : ( आशुतोष कातवरे ) दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी निगडी पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचिंगची घटना घडली. या घटनेनंतर मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ २ यांनी तातडीने फुटेज झोन टू ऑफिसर तसेच बीट मार्शल ग्रुपवर प्रसारित करून संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले.

देहूरोड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली परंडवाल चौक व के-टाऊन येथे पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली. रात्री साडेआठच्या सुमारास लाल-काळ्या रंगाची टू ट्वेंटी पल्सर मोटरसायकलवरून संशयित इसम जात असल्याचे दिसताच बीट मार्शल पाटील, वाकडे, खेडकर, माळी आणि भदाणे यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न फोल ठरला आणि पाठलाग करून परंडवल चौकात संशयितांना पकडण्यात आले.

पकडलेल्या इसमांकडून मिळालेल्या मोटरसायकल, कपडे व चपला या सर्व गोष्टी निगडी येथील चैन स्नॅचिंगच्या फुटेजशी मिळत्याजुळत्या असल्याने चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
1) ओंकार राजेंद्र नलावडे २३, रा. टावर लाईन, चिखली 2 ) अरुण मोहन राठोड २६, रा. ताम्हणे वस्ती, चिखली 3)अजित चंद्रकांत धायतोंडे २४, रा. रुपीनगर, निगडी. 4 ) अक्षय दगडू कोळेकर २२, रा. ताम्हणे वस्ती, चिखली या चौघांनी मिळून तीन मोटरसायकल – टू ट्वेंटी पल्सर, हिरो स्प्लेंडर आणि होंडा डिओ – चा वापर करून गुन्हा केला होता. पोलिसांनी चोरीस गेलेली चैन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या तीनही दुचाकी जप्त केल्या आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट मार्शल पथकाने यशस्वीरीत्या केली.
