- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: shauryavartanews2025@gmail.com
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनानिमित्त प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळ, थेरगाव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2025, बेहरेन मध्ये सुवर्णपदक विजेती बॉक्सर चंद्रिका बोरेशी पुजारी हिचा भव्य सत्कार करण्यात आला. चंद्रिकाने 54 किलो वजनी गटातील बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले. ती आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, पुणे व युवा विकास मंच यांच्या वतीने भारताचे प्रतिनिधित्व करत होती. ताडीवाला रोडच्या झोपडपट्टीत दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत राहून प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत तिने अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आज सुवर्णपदक जिंकले. तिच्या…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील एका जमीन खरेदी प्रकरणात घोटाळ्याचे आरोप होत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी पार्थ पवारांवर आरोप केले आहेत. तब्बल १८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटींना खरेदी करण्यात आली आणि अवघी ५०० रुपये स्टॅम्पड्यूटी भरल्याचा दावा दानवेंनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत आणि तहसीलदार व सहाय्यक निबंधकांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान आता या प्रकरणावर पार्थ पवार यांचे वडील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाला पहिली प्रतिक्रिया देत, आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री अजित…
पुणे : पूर्वी झालेल्या भांडणातून तिघांनी एका तरूणावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास बाजीराव रस्त्यावर घडली. या हल्ल्यात मृत तरुणाचा मित्रही जखमी झाला आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी फरार झालेल्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. रहदारीच्या रस्त्यावर भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मयंक सोमदत्त खरारे (१७ रा. साने गुरुजीनगर, आंबीलओढा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर अभिजित संतोष इंगळे (१८, रा. दांडेकर पूल) असे हल्ल्यात जखमी झालेल्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक आणि त्याचा मित्र अभिजित हे मंगळवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान बाजीराव रस्त्यावरील टेलीफोन भवनजवळ थांबले होते.…
पिंपरी चिंचवड : फसवणूक प्रकरणात अटक असलेल्या संशयिताला मदत करण्यासाठी दोन कोटींची लाच मागणारा पोलिस उपनिरीक्षक आणि संबंधित विभागाचे पोलिस निरीक्षक यांच्यावर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी कठोर कारवाई केली आहे. उपनिरीक्षकाचे निलंबन केले आहे. तर पोलिस निरीक्षकांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चार कोटींच्या फसवणुकीचा एक गुन्हा तपासासाठी आहे. त्या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांनी संशयिताला मदत करण्यासाठी संशयिताच्या वकिलाकडे लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर ‘एसीबी’ने पुणे येथील रास्तापेठ येथे कारवाई करत पोलिस उपनिरीक्षक चिंतामणी याला रंगेहाथ पकडले. पिंपरी-चिंचवडचे…
म्हसळा जि. रायगड : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात रविवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मेंदडीकोंड गावातील दोन सख्ख्या भावांनी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. म्हसळा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी नरेश महादेव कांबळे (वय 63, मजूर) आणि चंद्रकांत महादेव कांबळे (वय 60, निवृत्त कर्मचारी) या दोघांना अवघ्या 12 तासांत अटक केली. मृतांची नावे महादेव कांबळे (वय 95) आणि विठाबाई कांबळे (वय 83) अशी असून, दोघांचे मृतदेह घरातच आढळले. मुलगी अर्चना भालचंद्र पाटील (वय 40, रा. शिस्ते, ता. श्रीवर्धन) हिने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेने म्हसळा परिसरासह संपूर्ण रायगड जिल्हा…
शिरूर : शिरूर तालुक्यातील जांबूत आणि पिंपरखेड परिसरात बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले असून, गेल्या पंधरवड्यातील बिबट्याच्या हल्ल्यांत तिसरा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनांनंतर संतप्त नागरिकांनी वनविभागाच्या वाहनाला आग लावून निषेध नोंदविला होता. अजूनही आंदोलन आणि रास्ता रोकोची परिस्थिती शांत झालेली नसतानाच सोमवारी (दि. ३) शिरूर तालुक्यातील जांबूत परिसरातील नऊ शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडल्या. पालकांनी बिबट्याच्या भीतीमुळे मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला असून शिक्षक मात्र शाळेत हजर राहिले. ही बाब अधिक धक्कादायक ठरते कारण शिक्षण विभागालाही या नऊ शाळा बंद असल्याची माहिती नव्हती. शिरूर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना याची कल्पना नसल्याचे समोर आले…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी-चिंचवड : चिंचवडमध्ये घडलेल्या नकुल आनंदा भोईर हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी नव्या आरोपीला अटक केली आहे. मयताच्या पत्नीचा प्रियकर सिद्धार्थ दिपक पवार याचा या खुनात सहभाग असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. घटनेचा तपशील असा की, दि. २४ ऑक्टोबर रोजी फिर्यादी तुषार आनंदा भोईर (वय ४३, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ नकुल आनंदा भोईर (वय ४०) याची पत्नी चैताली नकुल भोईर (वय २८) हिने वारंवार दारू पिणे, इतर पुरुषांसोबत फिरणे आणि कर्ज काढणे यावरून होणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर रागातून त्याचा गळा दाबून खून केला होता. या प्रकरणी चिंचवड पोलिस…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाकडून राबविलेल्या जाणा-या विविध योजनांमधून सुमारे १२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून मतदारसंघातील नागरिकांच्या सेवा-सुविधांशी निगडीत कामे होणार आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने एकप्रकारे हे चिंचवड विधानसभेत दिवाळी गिफ्ट मिळाले असून हा शासन निधी पिंपरी-चिंचवड शहरासोबतच विशेषतः वाकड, पुनावळे,मामुर्डी आणि किवळे या झपाट्याने वाढणाऱ्या भागाला अधिकचा निधी देऊन तेथील विकासाला हातभार लागला आहे. राज्यातील महायुती सरकार विकासाचे उदिष्ट साध्य करणारे व जनतेच्या मनातील आशा-आकांक्षा पूर्ण करणारे आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शंकर जगताप यांच्याकडून सातत्याने शासनाच्या माध्यमातून विविध कामांसाठी…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || चिंचवड : पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेतल्यामुळे पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमध्ये घडली असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नकुल आनंद भोईर (वय ४०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, चैताली भोईर असे संशयित पत्निचे नाव आहे. ही घटना आज पहाटे पावणे तीनच्या सुमारास घडली. चारित्र्यावरून झालेल्या वादातून संतापाच्या भरात पत्नीने नकुलचा गळा कापडाने आवळून खून केला. या दाम्पत्याला दोन लहान मुले आहेत — एक पाच वर्षांचे व दुसरे दोन वर्षांचे. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चैताली भोईर हिला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड आणि सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण विद्यालय परिसर दिवाळीच्या रंगांनी आणि आनंदाने उजळून निघाला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ऑनररी जनरल सेक्रेटरी मा. ॲड. श्री. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा, सहाय्यक सेक्रेटरी व शालेय शिक्षण समितीचे चेअरमन मा. प्रा. श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया, तसेच मा. श्री. आनंदरामजी उत्तमचंदाजी धोका, कार्यकारिणी सदस्य, हे मान्यवर अतिथी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दिवाळीच्या पारंपरिक सणांविषयी — वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज — या सणांचे महत्त्व आणि…