Author: shauryavartanews2025@gmail.com

पुणे : राज्यातील गड-किल्ल्यांवर दरवर्षी हजारो शिवप्रेमी आणि पर्यटक भेट देत असतात. दुर्गम डोंगररांगा, कडे-कपारी आणि कठीण चढाईमुळे अनेकदा अपघातांच्या घटना घडतात. अशा वेळी जीव धोक्यात घालून अपघातग्रस्तांना सुरक्षितस्थळी पोहोचविणारे आपत्ती व्यवस्थापनातील स्वयंसेवक, मावळे आणि स्थानिक कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. या धाडसी कार्यकर्त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर स्मारक, सिंहगड रोड येथे आयोजित कार्यक्रमात गड-किल्ल्यांवरील आपत्कालीन बचाव कार्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या विविध संस्था व कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये शिवदुर्ग रेस्क्यू टीम, शिवजन्मभूमी रेस्क्यू टीम (जुन्नर), हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम तसेच राजगड पुरातत्त्व विभागातील बापू साबळे, विशाल पिलावरे, दीपक पिलावरे, किल्ले विसापूर येथील रोहित…

Read More

महाबळेश्वर : आंबेनळी घाटातील बावली टोक येथे गुरुवारी (दि. १२) पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास एका वॅग्नर कारचा भीषण अपघात होऊन वाहन तब्बल ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमने धाडसी बचावकार्य करून सुटका केली. अपघाताची माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य संकेत सावंत व ऋषिकेश जाधव यांनी तातडीने टीमला कळवले. त्यानंतर अजित जाधव, अनिकेत वागदरे, संकेत सावंत व ऋषिकेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचाव पथकाने आवश्यक सुरक्षा साहित्य व रोपच्या सहाय्याने…

Read More

|| प्रतिनिधी : प्रभू कांगणे || चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रावेत बंधाऱ्यात सांडपाणी व मैला सोडण्याचा गंभीर प्रकार सुरू असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना उपशहर प्रमुख सागर एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे लेखी निवेदन देत तात्काळ संयुक्त पाहणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या रावेत बंधाऱ्याच्या परिसरात काही भागांतून बेकायदेशीर नाले जोडण्यात आले असून त्यामधून सांडपाणी थेट बंधाऱ्यात मिसळत आहे. परिणामी बंधाऱ्यातील पाणी दूषित होत असून याच पाण्यावर पुढील शुद्धीकरण प्रक्रिया करून शहरवासीयांना पुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत धोकादायक…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या वाल्हेकरवाडी परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत असून, उलट बांधकामे अधिक वेगाने सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रभाग क्रमांक १७ मध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर इमारती उभारल्या जात असून, त्यातील फ्लॅट विक्रीही सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या बांधकामांकडे संबंधित विभाग, बीट मार्शल व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे उघड दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. गोरगरीबांवर कारवाई, मोठ्यांना मोकळे रान सामान्य नागरिकांनी लहान शेड टाकले…

Read More

|| प्रतिनिधी : जुबेर शेख || पिंपरी-चिंचवड : 23 जानेवारी 2026 – सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसालिया इंग्लिश व मराठी मिडीयम स्कूलमध्ये आज पारंपरिक शेकोटीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेच्या प्रांगणात रंगलेला हा उत्सव केवळ बालकांसाठी नव्हे तर शिक्षक आणि पालकांसाठीही आनंदाचा सोहळा ठरला. शाळेतील लहान मुले शेकोटी व रानमेव्याचा आनंद घेण्यात गढून गेली. हुरड्याचा खेळ, पारंपरिक गाणी, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण सजीव केले. बालकांनी उत्साहाने शेकोटीच्या गाणी गायली, रंगीत पोशाखात नृत्य सादर केले आणि त्यांच्या आनंदाने उपस्थितांची मने भारावून गेली. पालकांनाही या कार्यक्रमात सक्रिय सहभागी म्हणून पाहता आले. त्यांनी आपल्या मुलांच्या उत्साहात सहभागी होऊन कार्यक्रमाला अधिक…

Read More

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला असून सुनेत्रा अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपालांच्या उपस्थितीत त्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. या ऐतिहासिक क्षणाने राज्याच्या राजकारणात महिलांच्या नेतृत्वाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे. शपथविधीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार म्हणाल्या की, हा क्षण अत्यंत भावनिक असून मोठी जबाबदारी स्वीकारताना आदरणीय अजितदादांची आठवण सतत सोबत आहे. त्यांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक तसेच समाजातील वंचित घटकांसाठी दिलेला संघर्ष, कर्तव्यनिष्ठा आणि लोकाभिमुखतेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून न्यायप्रिय, समताधिष्ठित…

Read More

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बारामतीला जाताना दादांना घेऊन जाणाऱ्या चार्टर्ड प्लेनचा अपघात झाला यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या पार्थिवावर उद्या (दि.29) रोजी अंत्यसंस्कार केले जाणार असून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह अंत्यसंस्कारासाठी बारामती येथे येणार असल्याचे सांगितले जात आहे. उद्या होणार अजितदादांवर अंत्यसंस्कार अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार असून, त्याआधी अंतिम दर्शनासाठी पार्थिव शारदा प्रांगण येथे ठेवले जाणार आहे. अपघाताची बातमी समजताच शरद पवार मुंबईहून तर, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दिल्लीहून बारामतीत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे दादांवर प्रेम…

Read More

पिंपरी-चिंचवड : “आपली जन्मभूमी बारामती असली तरी माझी कर्मभूमी पिंपरी-चिंचवड आहे,” असे निक्षून सांगणारे आणि पिंपरी-चिंचवड शहरावर पुत्रवत प्रेम करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली झालेले अपघाती निधन मनाला चटका लावून जाणारे आहे,” अशी भावना आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे ते खरे ‘दादा’ होते असेही आमदार जगताप पुढे म्हणाले. आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले, “अजित पवार हे केवळ ज्येष्ठ नेते नव्हते, तर चणाक्ष राजकारणी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि प्रशासकीय कारभाराचा दांडगा अनुभव असलेले कर्तबगार नेतृत्व होते. अशा व्यक्तिमत्त्वाचे आपल्या मधून जाणे हे केवळ पिंपरी-चिंचवडसाठी नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रासाठी मोठी पोकळी निर्माण करणारे आहे.” १९९२ ते आजतगायत् सातत्याने या…

Read More

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं कधीही भरून न येणारी महाराष्ट्राची हानी झाली आहे. आज त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे अजित पवार महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता होता. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अतिशय संघर्षशील असं नेतृत्व होते. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत कठीण दिवस आहे अशी शोक भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. “आयुष्य नीट जगा, मस्तपैकी राहा अन्…”; मृत्यूपूर्वी अजित पवारांनी दिलेला ‘तो’ अखेरचा सल्ला अजित पवारांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवारांसारखे नेतृत्व तयार व्हायला अनेक…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || रावेत : येथील ओजस्वी सोसायटीमध्ये दिनांक २६ जानेवारी रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सोसायटीच्या आवारात राष्ट्रीय ध्वजवंदन करून संविधानाच्या मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली. सोसायटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील मान्यवर डॉक्टर, वकील, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांना ध्वजवंदनाचा मान देण्यात येतो. यावर्षीचा कार्यक्रम विशेष ठरला तो संरक्षण दलातील माजी सैनिकांच्या उपस्थितीमुळे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक व संरक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये श्री. पुष्करसिंग अमरसिंग जाधव (नाईक, मराठा लाइट इन्फेंट्री), सुभेदार श्री. विनायक भाऊराव महाजन आणि श्री. अनिलदत्त सोनार साहेब यांचा…

Read More