Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
पिंपरी चिंचवड

रावेत येथील ओजस्वी सोसायटी, येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comJanuary 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||

रावेत : येथील ओजस्वी सोसायटीमध्ये दिनांक २६ जानेवारी रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सोसायटीच्या आवारात राष्ट्रीय ध्वजवंदन करून संविधानाच्या मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली.

सोसायटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील मान्यवर डॉक्टर, वकील, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांना ध्वजवंदनाचा मान देण्यात येतो. यावर्षीचा कार्यक्रम विशेष ठरला तो संरक्षण दलातील माजी सैनिकांच्या उपस्थितीमुळे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक व संरक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये
श्री. पुष्करसिंग अमरसिंग जाधव (नाईक, मराठा लाइट इन्फेंट्री),
सुभेदार श्री. विनायक भाऊराव महाजन
आणि श्री. अनिलदत्त सोनार साहेब यांचा समावेश होता.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या देशसेवेतील अनुभव कथन करत समाजाला मार्गदर्शन केले. तरुण पिढीने शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यभावना आणि राष्ट्रप्रेम जपावे, असे मौल्यवान विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोसायटीचे सेक्रेटरी श्री. विपुल घोलप यांनी केले. तसेच यावेळी श्री. पाटील काका यांनी कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संरक्षण या विषयांवर मार्गदर्शन केले.

पाण्याचा योग्य वापर, कचरा न करणे, झाडे लावणे, सिंगल युज प्लास्टिक टाळणे व कापडी पिशव्यांचा वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या सोहळ्यात लहान मुलांची भाषणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम उत्स्फूर्तपणे सादर झाले. सर्व सभासदांनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव व सामाजिक जबाबदारी यांचा संदेश दिला.

कार्यक्रमाचा समारोप सोसायटीचे अध्यक्ष श्री. अरुण खरमाळे यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला. उपस्थित प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, रहिवासी आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवाल्हेकरवाडी लक्ष्मीनगर येथील आगीच्या घटनेत नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांची तात्काळ धाव; महापालिकेच्या मदतीमुळे कुटुंबाला दिलासा.
Next Article अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रात ३ दिवसाचा दुखवटा, आज शासकीय सुट्टी जाहीर; CM देवेंद्र फडणवीस गहिवरले.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळीकांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद.

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?