- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: shauryavartanews2025@gmail.com
पिंपरी चिंचवड : ( प्रतिनिधी : अमोल बेडके ) : शहरात दिवसा ढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. भावेश ककराणी (वय २०) या युवकावर त्याच्याच किराणा दुकानात घुसून अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली. या हल्ल्यात भावेशच्या मांडीवर गोळी लागून तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मोटारसायकलवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने दुकानात शिरताच जवळून गोळीबार केला आणि लगेचच घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत भावेशला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली…
पंढरपूर : ( प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे ): पंढरपूर हे संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान. श्रीविठ्ठल व रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येथे गर्दी करतात. मात्र, हेच मंदिर सध्या पान, तंबाखू, गुटखा खालून थुंकणाऱ्यांच्या घाणेरड्या प्रवृत्तीमुळे अपवित्र होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी स्वतः पाहिला असून, त्यांनी या घटनेचा व्हिडीओ आणि छायाचित्रांसह सोशल मीडियावर सार्वजनिक पर्दाफाश केला आहे. त्यांनी मंदिर प्रशासन, समिती आणि जिल्हा यंत्रणेवर गंभीर आरोप करत तातडीने चौकशी व कडक कारवाईची मागणी केली आहे. ❝ पावित्र्याला गालबोट लावणारे हे प्रकार असह्य! ❞ गणेश अंकुशराव हे नुकतेच…
चिंचवड : ( प्रतिनिधी : शुभम जाधव ) : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज, चिंचवड येथे शनिवार, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा आणि सहाय्यक सेक्रेटरी श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया उपस्थित होते. त्यांनी शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमात चि. प्रकाश गुजर, चि. प्रथमेश ढवळे आणि चि. शिवराज चौबे यांनी वीर जवानांची वेशभूषा परिधान करून त्यांच्या शौर्याचे दर्शन घडविले. चि. कुशल बोरा या विद्यार्थ्याने ‘कारगिल विजय दिनाचे महत्त्व’ यावर मनोगत सादर…
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : अमोल बेडके ) : आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पियुष अशोक कवडे (वय २३) या तरुण आयटी अभियंत्याने कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. २८ जुलै) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष गेल्या एक वर्षापासून हिंजवडी फेज-वनमधील ‘ॲटलस’ या नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. सोमवारी सकाळी त्याची मिटिंग सुरू असताना त्याने छातीत दुखत असल्याचे सांगितले आणि बाहेर पडला. काही क्षणातच त्याने थेट सातव्या मजल्यावरून उडी घेत आपले प्राण गमावले. या घटनेनंतर कंपनीत आणि परिसरात एकच खळबळ उडाली. पियुषने आत्महत्या करण्यापूर्वी एक…
पिंपरी : ( प्रतिनिधी : संजय वाईकर ) : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित सेट श्री आर. व्ही. गोसलिया शिशुविहार व श्री गुरु गणेश बालक मंदिरात ‘बाहुला-बाहुली विवाह’ सोहळा मोठ्या उत्साहात, पारंपरिक थाटात आणि बालमित्रांच्या आनंदाच्या कल्लोळात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासोबतच त्यांना सामाजिक व संस्कारक्षम शिक्षण देण्याचा उद्देश यामागे होता. कार्यक्रमात हळद, मेंदी, रुखवत, सासरवाडी, वरात, लग्न विधी अशा पारंपरिक गोष्टींचे रूपांतर बालसुलभ कृतीतून विद्यार्थ्यांनी सादर केले. गोजिरी बाहुली आणि हसऱ्या बाहुल्याच्या विवाहात मुलांनी वरातीत नाचत, गात, रंगतदार पोशाखात सहभाग घेतला. वर्गखोल्यांचे रुपांतर मांडवात आणि मंडपात झाले होते. रुखवतामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेली कलाकृती, हस्तकला, आणि सजावट विशेष लक्षवेधी…
पंढरपूर : (प्रतिनिधी – ज्योतिराम कांबळे): लातूरमध्ये छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने पंढरपूर येथे जोरदार आंदोलक पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांना लेखी निवेदन पाठवण्यात आले असून, स्थानिक पातळीवर पोलीस उपविभागीय अधिकारी (SDPO) आणि तहसीलदार पंढरपूर यांना समक्ष निवेदन देण्यात आले. निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तथाकथित प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यावर कलम 307 (हत्या करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा नोंदवून तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा छावा सेनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. या वेळी छावा…
पंढरपूर (प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे): श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गैरकारभारावर महाराष्ट्रभरातून होणाऱ्या टीकेला आता पंढरपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनीही सुरात सूर मिसळत थेट श्रीविठ्ठलाच्या चरणी साकडे घातले आहे. मंदिर प्रशासनाविरोधात अंकुशराव यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आवाज उठवत विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे – दर्शन रांगेतील भाविकांना होणारी मारहाण, सुरक्षा रक्षकांची मुजोरी, व्हीआयपी दर्शनावरील वाद, गोशाळेतील गोमाता आणि गोवंशाच्या सुरक्षेचा प्रश्न, स्वच्छतेच्या टेंडरमधील कथित घोटाळे, तसेच मंदिर संवर्धनाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पावसाळ्यात होणारी गळती आदी बाबींवरून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याआधीही त्यांनी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत प्रशासनाच्या हलगर्जीपणावर वारंवार लक्ष…
चिंचवड : प्रतिनिधी : ( अमोल बेडके ) श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे गुरुवार, दिनांक २४ जुलै २०२५ रोजी दीप अमावस्येच्या निमित्ताने “दीप पूजन” व पारंपरिक आणि आधुनिक दिव्यांचे प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्र पठण, श्लोक व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. पवित्र वातावरणात दिव्यांची आरती देखील करण्यात आली. या विशेष कार्यक्रमासाठी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा आणि सहाय्यक सेक्रेटरी श्री अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांनी शुभेच्छा दिल्या. 🪔 “चंद्र प्रकाशाची शीतल छाया, …
निगडी | प्रतिनिधी : ( शुभम जाधव ) पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी वाढत असतानाच निगडी प्राधिकरणातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दि. १९ जुलै २०२५ रोजी रात्री ८.५५ ते १०.३० वाजताच्या सुमारास, प्लॉट नं. १८, सेक्टर नं. २७, निगडी प्राधिकरण, पुणे येथे राहणाऱ्या चंद्रभान छोटेराम अगरवाल (वय ७६) या ज्येष्ठ नागरिकाच्या घरात ४ अनोळखी पुरुष व १ महिला यांनी सशस्त्रपणे प्रवेश करत लुटमार केली. सदर आरोपींनी फिर्यादी हे घरात टीव्ही पाहत असताना त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून “तिजोरी किधर रखा है?” असा दम दिला. फिर्यादींनी “घरात तिजोरी नाही” असे सांगितले असतानाच आरोपींनी त्यांना मागील खोलीत नेऊन…
पंढरपूर : प्रतिनिधी ( ज्योतिराम कांबळे ) तीर्थक्षेत्र पंढरपूरात दरवर्षी राज्यभरातून तसेच परराज्यातून लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येत असतात. येथील धार्मिक परंपरेनुसार अनेक भाविक प्रथम चंद्रभागा नदीत स्नान करतात. मात्र, नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक दुर्दैवी घटना घडत असून भाविकांचे जीव गमावण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसाठी चंद्रभागा नदी पात्रात प्रशिक्षित व अनुभवी कायमस्वरूपी जीवनरक्षक (लाईफ गार्ड) नेमण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अशा उपाययोजनेमुळे भाविकांचा जीवितधोक्याचा प्रश्न सुटेल व भविष्यातील संभाव्य दुर्घटनांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सोलापूर यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी…