पंढरपूर : (प्रतिनिधी – ज्योतिराम कांबळे): लातूरमध्ये छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने पंढरपूर येथे जोरदार आंदोलक पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांना लेखी निवेदन पाठवण्यात आले असून, स्थानिक पातळीवर पोलीस उपविभागीय अधिकारी (SDPO) आणि तहसीलदार पंढरपूर यांना समक्ष निवेदन देण्यात आले.
निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तथाकथित प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यावर कलम 307 (हत्या करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा नोंदवून तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा छावा सेनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

या वेळी छावा क्रांतीवीर सेनेचे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश माने, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष हर्षद भोसले, युवक जिल्हाध्यक्ष मंगेश शिरसागर, पंढरपूर तालुका युवक अध्यक्ष संदीप झांबरे, तालुका उपाध्यक्ष प्रणव शिंदे, कल्याणराव ननवरे, प्रशांत गडदे, अतुल सुरवशे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून राज्य शासनाकडे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

