चिंचवड : ( प्रतिनिधी : शुभम जाधव ) : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज, चिंचवड येथे शनिवार, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा आणि सहाय्यक सेक्रेटरी श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया उपस्थित होते. त्यांनी शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली.

कार्यक्रमात चि. प्रकाश गुजर, चि. प्रथमेश ढवळे आणि चि. शिवराज चौबे यांनी वीर जवानांची वेशभूषा परिधान करून त्यांच्या शौर्याचे दर्शन घडविले. चि. कुशल बोरा या विद्यार्थ्याने ‘कारगिल विजय दिनाचे महत्त्व’ यावर मनोगत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यालयाच्या मा. उपमुख्याध्यापिका सौ. मनीषा जैन यांनी विद्यार्थ्यांकडून देशभक्तिपर घोषणा देऊन वातावरण राष्ट्रभक्तीने भारून टाकले. सन्माननीय प्राचार्या सौ. सुनीता नवले यांनी विद्यार्थ्यांना देशसेवा म्हणजेच खऱ्या अर्थाने देशप्रेमाचे उदाहरण समजावले.

कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक मा. श्री. राजेंद्र पितळीया, मा. श्री. संजीव वाखारे आणि पर्यवेक्षिका मा. सौ. मनीषा कलशेट्टी यांचीही उपस्थिती लाभली. त्यांनीही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका सौ. मीनाक्षी ताम्हणे यांनी प्रभावीपणे केले.
