- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: shauryavartanews2025@gmail.com
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || आज १ मे, ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ – श्रमिकांचा , कष्टकऱ्यांचा सन्मान करण्याचा दिवस. हा दिवस कामगारांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी लढणाऱ्या तमाम कामगारांना समर्पित आहे. भारतात या दिवशी वेगवेगळ्या संघटना, संस्था आणि संघटनांनी श्रमिक वर्गाच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण केली जाते. या दिनाचे खरे मार्गदर्शक, कामगारांचा खरा नेता – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच होते. त्यांनी भारतीय कामगार वर्गाच्या हितासाठी महत्त्वपूर्ण कायदे तयार केले. आठ तासांचा कामाचा दिवस, कामगार सुरक्षा, वेतन संरक्षण, महिला कामगारांचे अधिकार, बालकामगार प्रतिबंध अशा अनेक सुधारणांची मुळे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीत आहेत. डॉ. आंबेडकर यांनीच भारतात सर्वप्रथम कामगार कायद्यात मूलभूत सुधारणांचा पाया घातला. त्यांच्या…
कल्याण : डीसीपी स्कॉडने आंबिवलीतील कुप्रसिद्ध इराणी वस्तीमध्ये धडक कारवाई करत ‘लेडी डॉन’ फिजा इराणीला अटक केली आहे. लेडी डॉनकडून पोलिसांनी कारवाई करत सुमारे १ लाख १६ हजार रुपये किमतीचे एम.डी. ड्रग्ज जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिजा इराणी ही आंबिवली परिसरातील रहिवासी असून तिच्यावर यापूर्वीही ड्रग्ज तस्करीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्ज तस्करांविरोधात पोलिसांकडून सातत्याने मोहीम राबवली जात आहे. ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणांमध्येही वाढ झाल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘लेडी डॉन’ फिजा इराणी विरोधात कारवाई केली आहे. डीसीपी स्कॉडला आंबिवली परिसरात एम.डी. ड्रग्जची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या…
डोंबिवली : प्रेम प्रकरणातून हत्या किंवा बलात्कारासारख्या गंभीर घटना सातत्याने समोर येत आहेत. आता, डोंबवली शहरातील टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 तारखेला एका इमारतीमधील घरात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी (Police) या प्रकरणी तपास सुरू केला, काल या मयत तरुणीच्या नातेवाईकांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर, कल्याण क्राईम ब्रांचने प्रियकर सुभाष भोईर याला कल्याण दुर्गाडी पुलाच्या परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. सुभाष भोईर हा या तरुणीसोबत गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. काही महिन्यांपासून या दोघांमध्ये व्यक्तिगत वाद सुरू होते, त्याच वादातून सुभाषने तरुणीचा गळा आवळून तिची हत्या…
सध्या चर्चा आहे ती म्हणजे सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाची. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 1 कोटीचा टप्पा जगभरातून पार केल्याचे कळते आहे. परंतु त्यातूनही हे कलेक्शन अधिक असू शकलं असतं, असं अनेकांचेही म्हणणे आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात ज्या मोठ्या संख्येने सूरज चव्हाणला प्रेक्षकांनी प्रेम दिलं ते पाहता हा चित्रपट पहिल्या दिवसापासून कोट्यवधींची कमाई करेल असे चित्र स्पष्ट दिसत होते. त्यातून या चित्रपटाच्या ट्रेलरही चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. किती आहे आतापर्यंतचे कलेक्शन ? सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाने पहिल्या व दुसऱ्या दिवशी 24 लाखांचा गल्ला जमावला होता. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाख तसेच चौथ्या दिवशी या…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : चिंचवड गावातील प्राचीन आणि ऐतिहासिक श्री क्षेत्र धनेश्वर महादेव मंदिरात वर्षानुवर्षांची परंपरा जपत सोमवारी (ता. २८) वैशाख शुद्ध प्रतिपदेला पारंपरिक चंदनउटी सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ ते ९ लघुरुद्र अभिषेक झाला. दुपारी ४ ते ६ श्रीराम व शारदा भजनी मंडळाच्यावतीने सेवा झाली. वैशाख महिन्यातील कडक उन्हाळ्यात थंडावा मिळावा या उद्देशाने महादेवासह इतर देवी देवतांसाठी औषधी गुणधर्म असलेल्या गुलाबपाणी, मुलतानी माती, अत्तर आणि ढोल कापूर मिसळून शुद्ध चंदन उगाळले जाते. या चंदनउटीचा पारंपरिक पद्धतीने लेप दिला जातो. त्यानुसार या घट्ट गंधाचे उटी स्वरूपात महादेवाच्या पिंडीवर व देवतांच्या…
पुणे : पोलीस खात्यातील प्रत्येक अंमलदाराला स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाकडून डीजी होम लोन योजना (पोलीस गृह बांधणी अग्रीम) राबविण्यात आली आहे. मात्र, ऑगस्ट २०२३ पासून आतापर्यंत सादर केलेले अर्ज प्रलंबित राहिल्याने राज्यातील ५ हजार ४५९ पोलीस अंमलदार आपल्या घराच्या स्वप्नापासून दूर आहेत. या योजनेतून पोलीस अंमलदारांना मूळ वेतनाच्या १२५ टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. ही रक्कम घर खरेदी किंवा बांधणीसाठी वापरण्याचा हेतू आहे. विशेषतः ज्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे स्वतःचे घर नाही, त्यांना मदत करण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात, ऑगस्ट २०२३ पासून आजतागायत कोणत्याही अंमलदाराचा अर्ज शासनाकडून मंजूर झालेला नाही. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचे गृहस्वप्न रखडले…
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी चिंचवड : श्री फत्तेचंद जैन विद्यालयास दुहेरी मुकुट श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ला सन 2024 25 चा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन पुणे जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक आणि ( तीन लाखाचे बक्षीस पात्र ) पुणे जिल्हा परिषद व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनामध्ये तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळाला. 24 एप्रिल 2025 रोजी गणेश कला क्रीडा रंग म्हणजे येथे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गजानन पाटील व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर , तसेच पुणे…
जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर एका लग्नसोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमामध्ये धडाधड गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे. तर जावई गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर, घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत सासराही जखमी झाला आहे. ही घटना चोपडा शहरातील डॉ.आंबेडकर नगर परिसरात काल शनिवारी (दि. २७६) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तृप्ती अविनाश वाघ (वय-२४) असं मृत विवाहितेचे नाव आहे. तर किरण अर्जुन मंगले (वय ४८, रा.शिरपूर) असं आरोपी वडिलांचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी…
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या ज दहशतवादी हल्ल्याच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहेत. भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त चौकशी समितीने मृतदेहांची अवस्था बघून गंभीर बाबी मांडल्या आहेत. तपास करणाऱ्यांना असं आढळून आलं की, २० मृतांची पँट खाली ओढलेली होती किंवा त्यांची चेन उघडली होती. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव, धर्म विचारून डोक्यात गोळी मारल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलंय की, दहशतवाद्यांनी पीडितांकडे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स मागितलं. कलमा वाचायला सांगितला आणि त्यानंतर पँट काढायला लावून ‘खतना’ तपासले. पर्यटक हिंदू आहेत की नाहीत हे पाहिल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांना जवळून गोळी मारली. पीडित कुटुंबियांना हल्ल्यामुळे…
|| प्रतिनिधी : किरण अडागळे || देहूगाव : देहूगाव ते देहूरोड कमान हा पाच किलोमीटरचा पालखी मार्ग आहे. माळीनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीपासून ते देहूरोडच्या कमानीपर्यंत तब्बल 21 गतिरोधक टाकण्यात आले आहेत. त्यातील अनेक गतिरोधक नियमबाह्य असल्याचे दिसत आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्यामुळे अनधिकृत गतिरोधक हटविण्याची मागणी नागरिक, वाहनचालकांकडून केली जात आहे. वाहनांचे नुकसान संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या नोंदीबाबत शासन दप्तरी संदिग्धता दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पावलोपावली छोटे-मोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. त्यातच अनावश्यक आणि नियमबाह्य गतिरोधकामुळे दररोज या रस्त्याने प्रवास करणारे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अनेक चालकांना मणक्याचा आजार…