Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
गुन्हेगारी

तीन वर्षाचं लिव्ह इन रिलेशनशीप, 3 मिनटांत सगळं संपलं ! क्राइम ब्रँचने प्रियकराच्या आवळल्या मुसक्या.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comApril 30, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Oplus_131072
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

डोंबिवली : प्रेम प्रकरणातून हत्या किंवा बलात्कारासारख्या गंभीर घटना सातत्याने समोर येत आहेत. आता, डोंबवली शहरातील टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 22 तारखेला एका इमारतीमधील घरात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता.

पोलिसांनी (Police) या प्रकरणी तपास सुरू केला, काल या मयत तरुणीच्या नातेवाईकांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर, कल्याण क्राईम ब्रांचने प्रियकर सुभाष भोईर याला कल्याण दुर्गाडी पुलाच्या परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. सुभाष भोईर हा या तरुणीसोबत गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. काही महिन्यांपासून या दोघांमध्ये व्यक्तिगत वाद सुरू होते, त्याच वादातून सुभाषने तरुणीचा गळा आवळून तिची हत्या केली आणि तेथून पळ काढल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक अजित शिंदे यांनी दिली. विशेष म्हणजे कल्याण क्राईम ब्रांचने अवघ्या 20 तासात आरोपी सुभाषला बेडा ठोकल्या.

ठाकुर्ली येथील सुभाष भोईरचे मृत तरुणीशी प्रेमसंबंध होते, त्यातूनच दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या तीन वर्षापासून हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होत होते. 22 तारखेला या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला, त्यामुळे संतापलेल्या सुभाष भोईर याने या तरुणीचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने घरातून पळ काढला. याप्रकरणी घरात तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. टिळक नगर पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल करत पुढील तपास सुरू केला.

विशेष म्हणजे आठवडाभराने मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. कल्याण क्राईम ब्रँच देखील या प्रकरणी समांतर तपास करत होती. या तरुणीचा प्रियकर सुभाष भोईर याच्यावर कल्याण क्राईम ब्रांचला संशय होता. मात्र, सुभाष भोईर पसार झाला होता, अखेर तांत्रिक तपास व खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुभाष भोईर हा कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी ब्रिजजवळ आल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रांचने दुर्गाडी किल्ला परिसरात सापळा रचत सुभाष भोईर याला बेड्या ठोकल्या. दरम्यान, सुभाष भोईर हा पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्यापूर्वीच कल्याण क्राईम ब्रँच पथकाने त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसूरजला प्रेक्षकांनी दिली गुलिगत धोका ? ‘झापुक झुपूक’ची पाचव्या दिवशीची कमाई किती, आकडा वाचून बसेल धक्का !
Next Article कल्याणमध्ये ड्रग्जचा सुळसुळाट, इराणी लेडी डॉनकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त, परिसरात खळबळ.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक

June 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?