Author: shauryavartanews2025@gmail.com

|| प्रतिनिधी : क्षितिजा देव || पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य आणि पराक्रम सातासमुद्र पार पोहचले आहे. त्यामुळे महाराजांच्या मावळ्यांनी लढवलेले किल्ले पाहण्यासाठी देशभराच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाराष्ट्रात येत असतात. तसेच परदेशी पर्यटकांनाही या किल्ल्याविषयी प्रचंड उत्सुकता असते. त्यामुळे परदेशी पर्यटक ही महाराजांचे किल्ले पाहण्यासाठी येत असतात. अशातच आता सिंहगड पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांसोबत महाराष्ट्रातील तरुणांनी गैरवर्तन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. न्युझीलँड येथून एक परदेशी पुण्यातील सिंहगड किल्ला पाहण्यासाठी आला असता गड सर करताना त्याला काही महाराष्ट्रतील तरुण भेटले. याप्रसंगी आपण कुठून आलो आहेत, कसे आलो आहोत? विदेशी पर्यटकांचा पाहुणचार करावयाचा सोडून त्या तरुणांनी विदेशी पर्यटकाला…

Read More

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा सराईत गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार आहे. एका गावच्या जत्रेत भरवलेल्या कुस्तीच्या मैदानात निलेश घायवळवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुस्तीच्या फडात अशाप्रकारे कुख्यात गुंडावरच हल्ला झाल्याने घटनास्थळी खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील घायवळ टोळीचा म्होरक्या आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ हा धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरूड गावात जत्रेनिमित्त आला होता. तो या जत्रेत भरवलेल्या कुस्तीच्या मैदानात पहिलवानांना भेटण्यासाठी गेला असता त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. हा हल्ला एका पहिलवानानेच केल्याची माहिती समोर आली आहे. कुस्तीचा आखाडा रंगला असताना कुख्यात गुंडावर झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली.या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला…

Read More

बुलढाणा : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून नागरिकांना गरम झळा सोसाव्या लागत आहेत. त्यात विदर्भात तापमानाने सर्वाधिक उच्चांकी गाठली असून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये इयत्ता 6 वीत शिकणाऱ्या संस्कार सोनटक्के या 12 वर्षीय विद्यार्थ्याला कडक उन्हामुळे त्रास झाला. त्यानंतर, पालकांनी त्याला अकोला येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान संस्कारचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं जिल्हा प्रशासनही खडबडून जागं झालं आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमान वाढले असून विदर्भ आणि मराठवाड्यात चटके देणारं ऊन पडलंय. सोलापूर जिल्ह्याने 42 अंश सेल्सियसचा…

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || चिंचवड : चिंचवडगावातील मुख्य बाजारपेठ असलेला गांधीपेठेतील चिंचवडचा राजा चौकात स्पीड ब्रेकर बसविण्यात आला त्याचे माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले यावेळी श्री संत ज्ञानेश्वर ‘चिंचवडचा राजा’ मित्र मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सायकर, कार्याध्यक्ष महेश मिरजकर, माजी अध्यक्ष प्रमोद बरडिया, स्थानिक व्यापारी प्रसाद संगमनेरकर, यश बरडिया व इतर मान्यवर उपस्थित होते. चिंचवडगावातील गांधीपेठ चिंचवडचा राजा चौक म्हणजे अत्यंत गजबजलेला परिसर व या चौकात सातत्याने वाहतूक कोंडी व छोटी मोठी वाहने जोरात चालवणे या प्रकारांमुळे अपघाताचे प्रकार सतत घडत होते. या सर्व घटनांमुळे गांधीपेठेतील नागरिक त्रस्त होते व या ठिकाणी चारी बाजूंनी…

Read More

|| प्रतिनिधी : किरण आडागळे || पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहरामध्ये काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पिंपरी चिंचवड काँग्रेसचे निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले सभागृह पिंपरी येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते एखाद्या आंदोलन मोर्चामध्ये एवढे काँग्रेसचे पदाधिकारी दिसत नाही अचानक काँग्रेसचे पदाधिकारी दिसल्यामुळे पत्रकार सभागृहा कडे गेले आणि बघितले तर धक्कादायक प्रकार उघड किस आला सभागृहाच्या शौचालय मध्ये जारमध्ये आणि बादली मध्ये पाणी भरतानाचा धकाधक प्रकार उघडकीस आला..! सदर पाणी कशासाठी भरतात अशी विचारणा केल्यानंतर पाणी भरणाऱ्या संबंधित व्यक्तीने सांगितले की आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठकीचा कार्यक्रम आहे येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जेवणाचा कार्यक्रम देखाली आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी भांडी…

Read More

पुणे : गेल्या १० वर्षांपासून नांदेड सिटीत रहात असताना सोसायटीचा स्टिकर गाडीवर नसल्याने नांदेड सिटी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी रहिवाशाला थांबून ठेवले. त्यांची पत्नी रहिवासी कार्ड घेऊन येईपर्यंत ८ ते १० सुरक्षा रक्षकाने घोळका करुन रहिवाशाला मारहाण केली. त्यांची पत्नी व मुलगा आल्यावर त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार नांदेड सिटी टाऊन शिपच्या मधुवंती सोसायटी मेनगेटवर मंगळवारी ८ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडला. याबाबत प्रेरणा प्रफुल्ल सोनकवडे (वय ४२, रा. मधुवंती सोसायटी, नांदेडसिटी टाऊनशिप, नांदेड गाव) यांनी नांदेड सिटी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी नांदेड सिटी टाऊनशिपचे सिक्युरिटी नेवरकर व आश्विनी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत…

Read More

मुंब्रा : मुंब्यातील ठाकूरपाडा भागातील सम्राटनगर परिसरामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासांत पोलिसांनी अटक केली. सम्राटनगर परिसरात इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहात असलेल्या असिफ अकबर मन्सूरी (वय 20) याने सोमवारी रात्री याच परिसरात मैत्रीसह खेळत असलेल्या एका 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला खेळणी देण्याचे आमिष दाखवून नराधमाने घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर त्याने तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर याबाबचचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याने मुलीला खिडकीतून इमारतीच्या डकमध्ये फेकले. व्हेंटिलेशन डकमध्ये काही पडले असल्याचा आवाज झाल्यामुळे इमारतीमधील एका रहिवाशाने पहिल्या मजल्यावरील खिडकीतून खाली बघितले असता, त्यांना…

Read More

छत्रपती संभाजीनगर : शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू मुघल बादशहा औरंगजेब छावा चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. औरंगजेबच्या कबरीवरुन महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे. औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्राच्या संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर आहे औरंगजेबच्या कबरीला एएसआय अर्थात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे संरक्षण मिळाले आहे.यामुळे कबर हटवता येत नाही. औंरगजेबची कबर ज्या जागेवर आहे ती जागा ज्याच्या मालकीची आहे त्याचे नाव जाणून धक्का बसेल. अत्यंत जुलमी आणि क्रूर मुघल शासक अशी औरंगजबेची ओळख होती. मार्च, 1707साली नगरच्या भिंगार किल्ल्यात औरंगजेबाचा मृत्यू  झाला. आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती. औरंगजेबने तसं मृत्यूपत्रच बनवून ठेवले होते. औरंगजेबच्या इच्छेनुसार त्याचा…

Read More

हिंगोली : देवदर्शनासाठी कर्नाटक राज्यातील भाविक घेऊन निघालेल्या बसने औंढा ते वसमत महामार्गावरील वगरवाडी जवळ अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालकाने वेळीच बस थांबवली. त्यानंतर आतील सर्व ५० प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यात्रेकरूंचे सामान आणि रोख रक्कम जाळून खाक झाली. कर्नाटक राज्यातील जामकंडी आसंगी गाव जिल्हा विजापूर येथून काशी, मथुरा, हरिद्वार, काटमांडू आदी ठिकाणी धार्मिक पर्यटनासाठी भाविकांना घेऊन एक खाजगी बस आज हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली. दुपारी ४ वाजेच्या सुमारास औंढा नागनाथ- वसमत -परभणी राज्यमहामार्गावरील वगरवाडी जवळ बसच्या (क्रमांक एम एच ०४ जी पी १२९७) केबिनमधील गिअर बॉक्स मधून अचानक धुराचे लोट यायला सुरुवात झाली.…

Read More

संगमनेर : कनिष्ठ महाविद्यालयीन १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने शारीरिक अत्याचार केले. पीडित मुलगी संबंधित डॉक्टरच्या रुग्णालयात उपचार घेत होती. ही घटना रविवारी (दि. ६) पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास शहरातील कर्पे हॉस्पिटल येथे घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात डॉ. अमोल कर्पे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. शुक्रवारी (दि. ४) ती महाविद्यालयात आली. त्यानंतर तिला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने डॉ. कर्पे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर तेथे उपचार सुरू होते. रविवारी पहाटे डॉ. कर्पे याने मुलीच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर त्याने मुलीला बाहेर बोलावून घेत टेरेसवर नेले. तिथे तिच्याशी गैरवर्तन…

Read More