|| प्रतिनिधी : क्षितिजा देव ||
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य आणि पराक्रम सातासमुद्र पार पोहचले आहे. त्यामुळे महाराजांच्या मावळ्यांनी लढवलेले किल्ले पाहण्यासाठी देशभराच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाराष्ट्रात येत असतात.

तसेच परदेशी पर्यटकांनाही या किल्ल्याविषयी प्रचंड उत्सुकता असते. त्यामुळे परदेशी पर्यटक ही महाराजांचे किल्ले पाहण्यासाठी येत असतात. अशातच आता सिंहगड पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांसोबत महाराष्ट्रातील तरुणांनी गैरवर्तन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
न्युझीलँड येथून एक परदेशी पुण्यातील सिंहगड किल्ला पाहण्यासाठी आला असता गड सर करताना त्याला काही महाराष्ट्रतील तरुण भेटले. याप्रसंगी आपण कुठून आलो आहेत, कसे आलो आहोत? विदेशी पर्यटकांचा पाहुणचार करावयाचा सोडून त्या तरुणांनी विदेशी पर्यटकाला अश्लील भाषेत शिविगाळ करणयास सांगितलं. काही अश्लील मराठी शब्द सांगून त्या भाषेत शिवीगाळ करण्यास भाग पाडलं. मात्र आपण काहीतरी चुकीचं बोलत आहोत याची जाणीव त्या पर्यटकाला झाल्यानंतर आपण येथे पुन्हा कधीच येणार नाही अशी खंत त्यांने व्यक्त केली.महाराष्ट्राच्या अस्मितेवर कलंक लावण्याचा काम काही टवाळ तरुणांनी केल असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अतिथी देव भव आपली ही महाराष्ट्रची संस्कृती सांगते पण महाराष्ट्रातील तरुणांनी पर्यटकाला महाराजांचा अनुभव सांगण्याऐवजी शिवीगाळ करण्यास भाग पाडले. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला तडा गेल्याच दिसून येत आहे. आता या टवाळ तरुणांवर काही कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
