Author: shauryavartanews2025@gmail.com

म्हसळा जि. रायगड : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात रविवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मेंदडीकोंड गावातील दोन सख्ख्या भावांनी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. म्हसळा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी नरेश महादेव कांबळे (वय 63, मजूर) आणि चंद्रकांत महादेव कांबळे (वय 60, निवृत्त कर्मचारी) या दोघांना अवघ्या 12 तासांत अटक केली. मृतांची नावे महादेव कांबळे (वय 95) आणि विठाबाई कांबळे (वय 83) अशी असून, दोघांचे मृतदेह घरातच आढळले. मुलगी अर्चना भालचंद्र पाटील (वय 40, रा. शिस्ते, ता. श्रीवर्धन) हिने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेने म्हसळा परिसरासह संपूर्ण रायगड जिल्हा…

Read More

शिरूर : शिरूर तालुक्यातील जांबूत आणि पिंपरखेड परिसरात बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले असून, गेल्या पंधरवड्यातील बिबट्याच्या हल्ल्यांत तिसरा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनांनंतर संतप्त नागरिकांनी वनविभागाच्या वाहनाला आग लावून निषेध नोंदविला होता. अजूनही आंदोलन आणि रास्ता रोकोची परिस्थिती शांत झालेली नसतानाच सोमवारी (दि. ३) शिरूर तालुक्यातील जांबूत परिसरातील नऊ शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडल्या. पालकांनी बिबट्याच्या भीतीमुळे मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला असून शिक्षक मात्र शाळेत हजर राहिले. ही बाब अधिक धक्कादायक ठरते कारण शिक्षण विभागालाही या नऊ शाळा बंद असल्याची माहिती नव्हती. शिरूर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना याची कल्पना नसल्याचे समोर आले…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी-चिंचवड :  चिंचवडमध्ये घडलेल्या नकुल आनंदा भोईर हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी नव्या आरोपीला अटक केली आहे. मयताच्या पत्नीचा प्रियकर सिद्धार्थ दिपक पवार याचा या खुनात सहभाग असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. घटनेचा तपशील असा की, दि. २४ ऑक्टोबर रोजी फिर्यादी तुषार आनंदा भोईर (वय ४३, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ नकुल आनंदा भोईर (वय ४०) याची पत्नी चैताली नकुल भोईर (वय २८) हिने वारंवार दारू पिणे, इतर पुरुषांसोबत फिरणे आणि कर्ज काढणे यावरून होणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर रागातून त्याचा गळा दाबून खून केला होता. या प्रकरणी चिंचवड पोलिस…

Read More

 || प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाकडून राबविलेल्या जाणा-या विविध योजनांमधून सुमारे १२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून मतदारसंघातील नागरिकांच्या सेवा-सुविधांशी निगडीत कामे होणार आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने एकप्रकारे हे चिंचवड विधानसभेत दिवाळी गिफ्ट मिळाले असून हा शासन निधी पिंपरी-चिंचवड शहरासोबतच विशेषतः वाकड, पुनावळे,मामुर्डी आणि किवळे या झपाट्याने वाढणाऱ्या भागाला अधिकचा निधी देऊन तेथील विकासाला हातभार लागला आहे. राज्यातील महायुती सरकार विकासाचे उदिष्ट साध्य करणारे व जनतेच्या मनातील आशा-आकांक्षा पूर्ण करणारे आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शंकर जगताप यांच्याकडून सातत्याने शासनाच्या माध्यमातून विविध कामांसाठी…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || चिंचवड  : पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेतल्यामुळे पत्नीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमध्ये घडली असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नकुल आनंद भोईर (वय ४०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, चैताली भोईर असे संशयित पत्निचे नाव आहे. ही घटना आज पहाटे पावणे तीनच्या सुमारास घडली. चारित्र्यावरून झालेल्या वादातून संतापाच्या भरात पत्नीने नकुलचा गळा कापडाने आवळून खून केला. या दाम्पत्याला दोन लहान मुले आहेत — एक पाच वर्षांचे व दुसरे दोन वर्षांचे. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चैताली भोईर हिला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड आणि सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण विद्यालय परिसर दिवाळीच्या रंगांनी आणि आनंदाने उजळून निघाला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ऑनररी जनरल सेक्रेटरी मा. ॲड. श्री. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा, सहाय्यक सेक्रेटरी व शालेय शिक्षण समितीचे चेअरमन मा. प्रा. श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया, तसेच मा. श्री. आनंदरामजी उत्तमचंदाजी धोका, कार्यकारिणी सदस्य, हे मान्यवर अतिथी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दिवाळीच्या पारंपरिक सणांविषयी — वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज — या सणांचे महत्त्व आणि…

Read More

मुंबई : १७ ऑक्टोबर २०२५ रोजी रमा एकादशी व वसु बारस या पवित्रदिनी मुंबईतील मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री मा. श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक घडामोडी, आगामी निवडणुका, पक्षाची धोरणात्मक दिशा आणि कार्यकर्त्यांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षशिस्त, संघटनवृद्धी आणि जनतेशी जोडलेले राहण्यावर मा. उद्धवजी ठाकरे यांनी विशेष भर दिला. या प्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने मा. पक्षप्रमुखांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. समितीचे सदस्य व शिवसेना जिल्हाप्रमुख (पंढरपूर विभाग) तसेच पंढरपूर पंचायत समिती सदस्य श्री…

Read More

दसऱ्याच्या निमित्ताने ट्रॅक्टर धुवायला गेले, नियतीनं घात केला, चौघांचा बुडून मृत्यू; घटनेनं छत्रपती संभाजीनगर हळहळलं. छत्रपती संभाजीनगर : दसरा सणानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील वाळूज परिसरातील गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथे आज दुपारच्या सुमारास घडली आहे. मुले होती. ट्रॅक्टर धुवून झाल्यानंतर ही तीन लहान मुले आंघोळीसाठी पाण्यात उतरली. अचानक ती मुले बुडत असल्याचं बघून इमरान त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, पाणी जास्तच खोल असल्यामुळे चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने व मुलांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी…

Read More

गडचिरोली : अल्पवयीन मतीमंद मुलीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना बुधवारी(ता.१) कोरची येथे घडली. याप्रकरणी कोरची पोलिसांनी बंडू सहारे(५५) रा.हेटळकसा, ता.कोरची यास अटक केली आहे. बुधवारी दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास बंडू सहारे याने अल्पवयीन मतीमंद मुलीला फूस लावून सायकलवर बसवून नेले. त्यानंतर बांधकाम सुरु असलेल्या एका घरात नेले. ही बाब एका चहाटपरी चालविणाऱ्या महिलेने बघितली. तिने ही बाब फिर्यादीस सांगितली. त्याने रस्त्याने येत असलेल्या दोन परिचित आशा वर्कर्सना सांगितल्यानंतर तिघेही बांधकाम सुरु असलेल्या घरात गेले. तेथे आरोपी बंडू सहारे हा त्या मतीमंद मुलीवर अतिप्रसंग करताना आढळून आला. तिघांनीही पीडित मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवले. मात्र, आरोपी बंडू सहारे…

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || चिंचवड : चिंचवड परिसरातील नागसेननगर झोपडपट्टीत जुन्या वादातून २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवार (दि.२२) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. वैभव भागवत थोरात (वय २५) असे मयत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव थोरात हा आपल्या खोलीत इतर चार जणांसोबत बसला असताना आरोपी अचानक आत शिरले. आरोपींमध्ये योगेश अनंत गायकवाड, अनिल आनंद बनसोडे, महेश अप्पालाल कोळी आणि एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. आरोपींपैकी योगेश गायकवाड आणि वैभव यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता. त्याच रागातून आरोपींनी वैभववर अचानक कोयत्याने हल्ला…

Read More