मुंबई : १७ ऑक्टोबर २०२५ रोजी रमा एकादशी व वसु बारस या पवित्रदिनी मुंबईतील मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री मा. श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची विशेष बैठक पार पडली.

या बैठकीत संघटनात्मक घडामोडी, आगामी निवडणुका, पक्षाची धोरणात्मक दिशा आणि कार्यकर्त्यांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षशिस्त, संघटनवृद्धी आणि जनतेशी जोडलेले राहण्यावर मा. उद्धवजी ठाकरे यांनी विशेष भर दिला.

या प्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने मा. पक्षप्रमुखांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. समितीचे सदस्य व शिवसेना जिल्हाप्रमुख (पंढरपूर विभाग) तसेच पंढरपूर पंचायत समिती सदस्य श्री संभाजी शिंदे यांच्या हस्ते “श्री” ची प्रतिमा, उपरणे, हार व दैनंदिनी प्रदान करण्यात आली.
या वेळी शिवसेना नेते श्री चंद्रकांत खैरे, सोलापूर संपर्क प्रमुख श्री अनिलभाऊ कोकीळ, सोलापूर जिल्हा प्रमुख (माढा विभाग) श्री धनंजय डिकोळे, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा. उद्धवजी ठाकरे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे अभिनंदन करताना सांगितले की, “पंढरपूर हे महाराष्ट्राचे आध्यात्मिक हृदय आहे. श्री विठ्ठलाची कृपा आणि शिवसेनेची निष्ठा एकत्र आल्यास महाराष्ट्र आणखी बळकट होईल,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व जिल्हाप्रमुखांनी मा. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आणि येणाऱ्या निवडणुकांत शिवसेनेचा भगवा झेंडा पश्चिम महाराष्ट्रात अधिक जोमाने फडकवण्याचा निर्धार केला.
